मराठवाडयात दिनांक 02 ते 08 डिसेंबर दरम्यान किमान तापमान
सरासरी ते सरासरी पेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे व दिनांक 09 ते 15 डिसेंबर दरम्यान किमान तापमान
सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला
तर
जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
हरभरा पिकाची पेरणी करून 25 ते 30 दिवस
झाले असल्यास 19:19:19 या खताची 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. लवकर पेरणी केलेल्या हरभरा पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी
शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी
प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5%
(एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी
20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10
लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या हरभरा पिकात मानकूजव्या आणि मर यांच्या
व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी
करावी किंवा बायोमिक्सची आळवणी करावी. बायोमिक्सच्या आळवणीसाठी पंपाचा नोझल काढून
200 ग्रॅम (पावडर) / 200 मिली (लिक्वीड) प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी
करावी. वेळेवर लागवड केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास
त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा
असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. करडई पिकात तणांच्या प्रादूर्भावानूसार पेरणीनंतर 25 ते 50 दिवसापर्यंत एक
ते दोन कोळपण्या व खूरपण्या घ्याव्यात. लवकर पेरणी केलेल्या करडई पिकात
आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. उशीरा लागवड केलेल्या हळद पिकात
आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी बायोमिक्स
150 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. हळदीवरील कंदमाशीच्या
व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली
किंवा डायमिथोएट 30 % 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद
पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत
संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). ऊस पिकावर
खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 %
25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली
प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे
करून तण नियंत्रण करावे. बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
संत्रा/मोसंबी बागेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 10 मिली किंवा
इमिडाक्लोप्रिड 17.8% 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10
हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक
नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2
ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. डाळींब बागेत
अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. डाळींब बागेत आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे. बागेतील पडलेली फळे गोळा करून व रोग ग्रस्त फांद्या काढून नष्ट
कराव्यात. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून
तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मिरची पिकावर सध्या
फुलकिडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रिड 20 % एस.पी. 100 ग्रॅम
किंवा सायअँन्ट्रानिलीप्रोल 10.26 ओ.डी. 600 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5%
एस. जी. 200 ग्रॅम प्रति हेक्टर फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या
भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण
नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी
करावी.
तुती रेशीम
उद्योग
तुती लागवड पट्टा पध्दतीने 6X3X2 (लांबीXरंदीXउंची) फुट या अंतरावर करण्याची शिफारस असून
हेक्टरी 12345 झाडे बसतात आणि दुसऱ्या वर्षापासून पुढे एकरी 25 टन तर हेक्टरी 65
टन तुती पानाचे उत्पन्न मिळते. तुती बागेत रोपे लावल्यानंतर 3 महिण्यात तुती पाने
उपलब्ध होतात व कोषाचे पीक घेता येते. पहिल्या वर्षात 50 अंडिपूजाचे 2 पिके
निघतात. दूसऱ्या वर्षा पासून 5 ते 6 कोषाची पिके दिड महिण्याच्या अंतराने मिळतात.
100 अंडिपूजासाठी 9 ते 10 क्विंटल तुती
पाने लागतात. वर्षासाठी एकरी 300 अंडिपूजाचे 6 पिके निघायला हवी म्हणजे एकरी 1800
अंडिपूज शेतकऱ्याला घेता यावेत.
पशुधन
व्यवस्थापन
गोवंशीय पशुधनामध्ये सध्या लम्पी स्कीन
डीसीज होत आहे. यांचा प्रसार अनेक मार्गापैकी एक म्हणजे किटकवर्गीय चावणाऱ्या
माशांमार्फत होतो. त्या किटकवर्गीय माशा व त्यांचे नियंत्रण : किटकवर्गीय माशा : यामध्ये
सर्वात जास्त हिमॅटोबीया प्रजातीची माशी, त्यानंतर टॅबॅनस, स्टोमोक्षीस,
क्यूलिफॉईडस आणि डास, या सर्व प्रजातीच्या माशा रक्त शोषण करतात व लम्पी स्कीन
डिसीजचे विषाणू यांत्रीक पध्दतीने प्रसारीत करतात. हिमॅटोबीया ही माशी पशुधनास
अठ्ठेचाळीस वेळेस चावे व टाकलेल्या ताज्या शेणावरती अंडी घालते. अ) शेणाची योग्य
विल्हेवाट लावणे व शेणाचा खड्डा
पॉलीथीन/ताडपत्रीने आच्छादित करणे. ब) पशुधनाच्या शरीरावर वनस्पतीजन्य अथवा
रासायनिक किटकनाशकाच्या द्रावणाची फवारणी करणे. टॅबॅनस ही माशी आकाराने मोठी असून
गाय/म्हैस यांना प्रखर सुर्यप्रकाशामध्ये चावा घेते व त्याजागी रक्त वाहते. अ)
पशुधनास प्रखर सुर्यप्रकाशामध्ये (सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत) चरावयास सोडू नये व
गोठयात ठेवावे. स्टोमोक्सीस या प्रजातीच्या माशा मुत्राने माखलेल्या वैरणीवरती
आपली अंडी घालतात. अ) गोठयातील अर्वरीत वैरण शेणाच्या खड्डयामध्ये टाकावी. ब) या
माशा देखील प्रखर सुर्यप्रकाश असताना चावतात म्हणून प्रखर सुर्यप्रकाशाच्या वेळा
सोडून पशुधनास चरावयास सोडावे.
पुढील काळात थंडी पासुन पशुधनाचे
संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे
लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल.
सामुदायिक
विज्ञान
आयूष्यातील उत्तम ध्येय सिध्दीसाठी
जीवन चक्राच्या सुरूवातीच्या टप्प्यात जीवनाची दीर्घकालीन उद्दिष्टे विचारपूर्वक
निश्चित केली पाहिजेत.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 71/2022
- 2023 शुक्रवार,
दिनांक –
02.12.2022
No comments:
Post a Comment