Monday, 2 January 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 3 दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंत किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये  पुढील 3 दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंत किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 06 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहे तर जमिनीती ओलावा किंचित कमी झालेला आहे. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करावी व काढणी केलेल्या तूरीची वाळल्यानंतर मळणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. रब्बी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. उशीरा पेरणी केलेल्या भुईमूग पिकात मावा, फुलकिडे याचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकास पोटरी येण्याच्या आवस्थेत पाणी द्यावे. उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी सूर्यफूल दाणे भरण्याच्या अवस्थमध्ये असतांना पाणी द्यावे. गहू पिकास फुटवे फुटण्याच्या आवस्थेत पाणी द्यावे. गहू पिकावरील तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत तण नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे. बागेतील वाळलेली पाने काढून टाकावीत. मृग बाग धरलेल्या केळी बागेत घड बाहेर पडण्याच्या अवस्थेत झाडांना काठीचा आधार द्यावा. आंबा बागेत पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बाग सध्या फुलधारण अवस्थेत आहे, बागेत परागीकरण व्यवस्थीत होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या किटकनाशकाची फवारण करू नये. सध्या कमाल व किमान तापमानातील तफावतीमूळे द्राक्ष बागेत पाणी व्यवस्थापन करावे जेणेकरून बागेत मणी तडकण्याची समस्या उद्भवणार नाही.  द्राक्ष बागेत घडावर पिंक बेरीची समस्या होऊ नये म्हणून द्राक्ष घड वर्तमान पत्राच्या साहाय्याने झाकून घ्यावेत.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या (शेवंती, निशीगंध, ग्लॅडिओलस) फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव ऑगस्ट 2022 पासून चालू आहे व त्याची तिव्रता लसीकरणामूळे कमी झाली असली तरीही आजही  नवीन नवीन पशु व वासरांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होत आहे. यासाठी (1) राहीलेल्या पशुधनास तात्काळ लसीकरण करणे. (2) महाराष्ट्र शासन राबवत असलेल्या “माझा गोठा-स्वच्छ गोठा” याची माझ्या गोठ्यामध्ये अमलबजावणी व दैनंदिन स्वच्छता आमलात आणणे. (3) गोचीडाचा प्रादुर्भाव रोखणे. गोचीड या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत आहेत. (4) लागण झालेल्या पशुचे विलगीकरण-आजारी पशुस ईतर पशुपासून दुर विलगीकरणामध्ये ठेवणे. (5) रोगी पशु असलेला गोठा सोडीयम हायपोक्लोराईट ने निर्जंतुकीकरण करणे हे उपाय सलग चालू ठेवावेत.

सामूदायीक विज्ञान

लोह समृध्द पदार्थ-कुटुंबाच्या दैनंदिन आहारात बदल करून लोहाच्या कमतरतेमूळे उद्भवणाऱ्या समस्येवर उपाय म्हणून विविध पाककृती मदत करतात. आपल्याकडे अनेक हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात त्या खनिज समृध्द असून या भाज्यांची  विविध पाककृतीमध्ये उपयोग करावा. ताज्या भाज्यांच्या तुलनेत सुकवलेल्या भाज्यांच्या पावडर मध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे वापरातील पालक, कोथिंबीर, शेवग्याची पाने आणि कढीपत्याची पाने सुकवून त्याची पावडर बनवून लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी विविध पाककृतीमध्ये वापरावी.

सौजन्य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषि मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक80/ 2022 - 2023    मंगळवार, दिनांक – 03.01.2023

 

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 व 15 एप्रिल रोजी मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 12 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 13 व 14 एप्रिल रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

    हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...