प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 3 ते 4 दिवसात कमाल व किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने
वाढ होण्याची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 03 ते 09 फेब्रुवारी 2023 दरम्यान कमाल
व किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे तर दिनांक
10 ते 16 फेब्रूवारी 2023 दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची
शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला
आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण किंचित कमी झालेले आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकास
आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पिकात पाणी साचणार नाही याची
काळजी घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत
असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20
पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे
लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई)
निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा
इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. करडई पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी
डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद पिकाच्या काढणीस साधारणत:
फेब्रूवारी महिन्या सूरूवात होते काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे. ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी
द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5%
4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हंगामी/सुरू ऊस
पिकाची लागवड 15 फेब्रुवारी पर्यंत करता येते. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी 30 X
10 सें.मी. किंवा 45 X 7.5 सें.मी. अंतरावर 3
ते 4 सें.मी. खोलीवर करावी. बी जास्त खोल पेरल्यास उगवण कमी होते. पेरणीसाठी
हेक्टरी 3 ते 4 किलो बियाणे वापरावे.
फळबागेचे व्यवस्थापन
मृग बहार संत्रा/मोसंबी बागेस
आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मृगबहार धरलेल्या लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा
प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन
(10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक
नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2
ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. अंबे बहार
धरण्यासाठी शेतकऱ्यांनी ताण तोडला नसल्यास बागेस हलके पाणी देऊन ताण तोडावा व
शिफारसीत खतमात्रा द्यावी. डाळींब बागेत अंबे बहार धरण्यासाठी छाटणी करून घ्यावी. काढणीस
तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी
द्यावे. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार
असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ
पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे
गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे
लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20%
एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11
मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो पिकावरील नाग अळीच्या
व्यवस्थापनासाठी ब्रोफ्लॅनिलीड 1.25 ग्रॅम किंवा सायॲन्ट्रानिलीप्रोल 18 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. फुल
पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची
काढणी करून घ्यावी.
तुती रेशीम उद्योग
तुती बागेत केसाळ अळी (बिहार हेअरी
केंटर पिलर) याचा प्रादुर्भाव हिवाळयात जाणवतो. पानांवर पुंजक्यात 200 ते 300 अळया
अंडयातुन फुटून बाहेर येतात व पानांवर उपजिवीका करतात यामुळे पानांची चळणी झालेली
दिसते. याच्या व्यवस्थापनासाठी किटकनाशक न फवारता भौतीक पध्दतीने म्हणजे हाताने
प्रादुर्भावग्रस्त पाने तोडावेत व अळया रॉकेलमध्ये बुडवून नियंत्रण करावे.
सामुदायिक विज्ञान
मानवी जीवनातील सुरूवातीच्या आठ
वर्षाच्या काळात बालकांचा विकास अत्यंत झपाट्याने होत असतो. तेव्हा या काळात
बालकांच्या सर्वांगीण विकासाला पूरक, चालना देणारे वातावरण पुरवणे ही प्रत्येक
कुटुंबाची जबाबदारी आहे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 89/2022
- 2023 शुक्रवार,
दिनांक –
03.02.2023
No comments:
Post a Comment