Tuesday 28 March 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर पुढील तिन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर पुढील तिन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

मराठवाडयात दिनांक 31 मार्च ते 06 एप्रिल 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 02 ते 08 एप्रिल 2023 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे उन्हाळी भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा. काढणी केलेल्या गहू पिकाची मळणी यंत्राच्या सहाय्याने करावी. मळणी करतांना दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.  काढणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. आंबा बागेत फळगळ दिसून येत असल्यास  2 % 13:00:45 + एनएए 15 पीपीएम ची फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष फळांची काढणी करून घ्यावी.

भाजीपाला

काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करावी. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका (निदान तिव्र उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले). पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन वेळेस पाजावे. पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन) होणार नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम क्षार मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे. अति उष्ण काळामध्ये जनावरांच्या पाठीवर पोते टाकून ते पाण्याने  भिजवून ठेवावे.

सामुदायिक विज्ञान

स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी : दररोज संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात  साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका. जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक104/ 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 28.03.2023

 

 


No comments:

Post a Comment

दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात व दिनांक 15 मे रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दिनांक 14 मे रोजी लातूर, धाराशिव, जालना व परभणी जिल्हयात तर दिनांक 15 मे बीड, धाराशिव व जालना जिल्हयात तर दिनांक 16 मे रोजी धाराशिव, लातूर, बीड जिल्हयात व दिनांक 17 मे रोजी धाराशिव, लातूर व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर ज...