प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार दिनांक 13 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तर दिनांक
14 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड व परभणी जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी
वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून
हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाडयात दि. 14 मार्च
रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 10 ते 16 मार्च 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त,
कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी तर किमान तापमान सरासरीएवढे ते
सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे तर दिनांक 17 ते 23 मार्च 2023 दरम्यान पाऊस
सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी तर किमान
तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी
झालेला आहे तर जमिनीतील ओलावा किंचित कमी झालेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 15 ते 21
मार्च 2023 दरम्यान कमाल व
किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची
शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
काढणी केलेल्या हरभरा, करडई, गहू,
रब्बी ज्वारी पिकाची मळणी लवकरात लवकर करून घ्यावी. मळणी केलेल्या मालाची सुरक्षित
ठिकाणी साठवणूक करावी. तूरळक ठिकाणी झालेल्या पावसामूळे काढणी केलेले पिक भिजले
असल्यास वाळल्यानंतर मळणी करावी. दि. 13 व 14 मार्च रोजी तूरळक ठिकाणी वादळी
वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी/मळणी केलेला माल पावसात भिजणार नाही
याची दक्षता घ्यावी. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे,
वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत.
दि. 13 व 14 मार्च रोजी तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, हळदीची उघडयावर साठवण करू नये.
फळबागेचे व्यवस्थापन
दि. 13 व 14 मार्च रोजी तूरळक ठिकाणी
वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या मृग बहार
फळांची, द्राक्ष फळांची , काढणी करून
घ्यावी. फळधारणा सुरू असलेल्या अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार सकाळी
किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान
संतुलित राहण्यासाठी संत्रा/मोसंबी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. वादळी वारा व
पाऊस यामूळे फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. तसेच मोडलेल्या फांद्यांची
छाटणी करून त्यावर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा
संध्याकाळी पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान
संतुलित राहण्यासाठी द्राक्ष बागेत आच्छादन करावे. वादळी वारा व पाऊस यामूळे
फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे. सध्या आंबा बागेत वटाणा व सुपारीच्या आकाराच्या आंबा फळांची गळ
दिसून येत आहे. याच्या व्यवस्थापनासाठी बागेत एनएए 15 पीपीएम ची फवारणी करावी.
वादळी वारा व पाऊस यामूळे फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.
चारा पिके
दि. 13 व 14 मार्च रोजी तूरळक ठिकाणी
वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा पावसात
भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण पावसात भिजल्यास त्याची प्रत खालावून
साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.
भाजीपाला
दि. 13 व 14 मार्च रोजी तूरळक ठिकाणी
वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची
तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. भाजीपाला
पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार
सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
दि. 13 व 14 मार्च रोजी तूरळक ठिकाणी
वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी
बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा
नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व
पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबु नये.
सामुदायिक विज्ञान
स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी : दररोज
संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि
मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका.
जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 99/2022
- 2023 शुक्रवार,
दिनांक –
10.03.2023
No comments:
Post a Comment