Friday, 12 May 2023

मराठवाडयात पुढील 24 तासात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. वाढ होईल व त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 24 तासात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. वाढ होईल व त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 12 ते 18 मे 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी व कमाल तापमान सराएवढे ते सरापेक्षा कमी व दिनांक 19 ते 21 मे 2023 दरम्यान कमाल तापमान सराएवढे ते सरापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 17 ते 23 मे 2023 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा लागवड केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. पिकाच्या आवश्यकतेनुसार व उपलब्धेनुसार सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी  व्यवस्थापन करावे.  ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. नविन लागवड केलेलया हंगामी ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.  हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

सध्या आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी संत्रा/मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच फळवाढीसाठी 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाणी व  जिब्रॅलिक ॲसिड 2 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही. आंबे बहार डाळींब बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. डाळींब बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. फळवाढीसाठी 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही.  चिकू बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. चिकू बागेत पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही.

चारा पीके

उन्हाळी चारा पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. उन्‍हाळी हंगामासाठी लागवड केलेल्‍या चारापिकात सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज व खरबूज पिकाची काढणी सकाळी लवकर करावी.

फुलशेती

फुल पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर करावी.

 

 

तुती रेशीम उद्योग

किटक संगोपन गृहालगत 10 फुट अंतरावर चारही बाजूने तुती वृक्ष लागवड किंवा मोठे झाडे लावावी. त्यामूळे 5 अं. से. तापमान कमी मदत मिळते. कच्च्या शेडनेट गृहातील तापमान 28 अं.से. च्यावर जाता कामा नये. हिवाळयात 20 अं.से. च्या खाली व उन्हाळयात 35 अं.से. च्या वर तापमान गेल्यास रेशीम किटक पाने खात नाहीत. तुती पाने खाण्याची ‍क्रिया मंदावते. किटक उपाशी राहतात व जास्त काळ उपाशी राहिले तर रोगास बळी पडतात. त्यामूळे उन्हाळयात 3 ते 4 वेळा तुती फांद्या खाद्य द्यावे व रॅकवर निळी नायलॉन जाळी किंवा निळी पॉलीथीन पट्टी आच्छादन करावे. आतील चारही बाजूने 22.5X 15 सेंमी लांबी खोलीची नाली असावी. वरच्या बाजूस सिमेंट पत्रे किंवा बेंगलोर टाईल्स टाकून त्यावर कोल्ड गार्ड पांढरा रंग द्यावा म्हणजे तापमान 5 ते 7 अं.से ने कमी होते.

पशुधन व्यवस्थापन

जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. पशुधनाकडुन सकाळी 11 ते दूपारी 4 या दरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठयाच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर पाणी शिंपडावे किंवा त्यांना पाणोठयावर न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चरण्यासाठी सोडावे.

सामुदायिक विज्ञान

मानवी जीवनातील सुरूवातीच्या आठ वर्षाच्या काळात बालकांचा विकास अत्यंत झपाट्याने होत असतो. तेव्हा या काळात बालकांच्या सर्वांगीण विकासाला पूरक, चालना देणारे वातावरण पुरवणे ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे.

कृषि अभियांत्रिकी

रब्बी पिकांची काढणी झाल्यानंतर शेतात लवकरात लवकर खोल नांगरणी करून घ्यावी. त्यामूळे जमिन तापन्यास मदत होऊन किडींचे कोष व घातक बूरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील मातीचे माती परिक्षण करून घ्यावे.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक12/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक – 12.05.2023

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 18 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात, दिनांक 19 जून रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात, दिनांक 20 जून रोजी नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात, तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 17 ते 21 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...