Friday, 9 June 2023

दिनांक 09 जून रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड व नांदेड जिल्हयात तर दिनांक 10 जून रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्हयात तर दिनांक 11 जून रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, औरंगाबाद, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तर दिनांक 12 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 09 जून रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड व नांदेड जिल्हयात तर दिनांक 10 जून रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्हयात तर दिनांक 11 जून रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, औरंगाबाद, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तर दिनांक 12 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 09 ते 15 जून 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त व दिनांक 16  ते 22 जून 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी व कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा किंचित कमी झालेला आहे.

सध्याचा होणारा पाऊस हा पूर्व मौसमी पाऊस असल्यामूळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीन + तुर हे आंतरपीक 2:1 किंवा 4:2 या प्रमाणात घ्यावे. तसेच ओलीताखाली सोयाबीन + कापूस हे आंतरपीक 1:1 किंवा 2:1 या प्रमाणात घेता येते. सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. आंतरपीक पध्दतीमध्ये खरीप ज्वारी + सोयाबीन 2:4 किंवा 3:6 या प्रमाणात दोन ओळीतील अंतर 45 सेंमी ठेवावे. तसेच खरीप ज्वारी + तुर 3:3 ‍किंवा 4:2 या प्रमाणात आंतरपीक घेता येते. सोयाबीन, मुग, उडीद ही कमी कालावधीची पिके आंतरपीके म्हणून घेताना 2:4 या आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा. खरीप ज्वारी पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. बाजरी पिकामध्ये बाजरी + तुर हे आंतरपीक 2:1, 3:3 किंवा 4:2 या प्रमाणात घ्यावे. बाजरी पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. ऊस पिकास पाण्याचा ण बसणार नाही याची काळजी घ्यावी. ऊस पिकास सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. पाण्याची उपलब्धता असल्यास हळद पिकाची लागवड करून घ्यावी. हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये पालेभाज्या सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नविन फळ बाग लागवडीसाठी घेतलेले खड्डे अर्धा किलो सुपर फॉस्फेट, तिन ते चार घमेले शेणखत किंवा कम्पोस्ट खत मातीत मिसळून खड्डे भरावेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे लहान झाडांना आधार द्यावा. नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेला पाण्याचा  ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे.

चारा पीके

मका या चारापिकाच्या लागवडीसाठी आफ्रीकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगासफेद, विजय इत्यादी जातींची निवड करावी.

भाजीपाला

पाण्याची उपलब्धता असल्यास भाजीपाला (वांगी, मिरची, टोमॅटो इत्यादी) पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना आधार द्यावा.

 

फुलशेती

पाण्याची उपलब्धता असल्यास फुल पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळा ऋतुच्या आगमनासोबतच अनेक आजारांचे देखील आगमन होते. म्हणून पशुधनाच्या आरोग्यासाठी त्रिसुत्री 1) भौतीक सुविधा म्हणजेच व्यवस्थीत गोठा ज्यायोग्य किटक व पावसापसून संरक्षण. 2) जैविक सुविधा जसेकी लसीकरण, जंतनाशकाची मात्रा आणि 3)रासायनीक सुविधा म्हणजे आजाराची लागण झाल्यास तात्काळ पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार  लसीकरण आणि पावसाच्या आगमनासोबतच तात्काळ शेळी मेंढी मध्ये तसच वासरांना वयाच्या सातव्या दिवशी द्यावयाची जंतनाशकाची मात्रा आवश्यक ठरते. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.  

तुती रेशीम उद्योग

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात तुतीची बेण्यापासून लागवड केली असेल अशा शेतात मोठया प्रमाणावर 20-25 % पर्यंत तुट राहते. मनरेगा योजनेअंतर्गत दुसऱ्या वर्षात 90 टक्के झाडांची संख्या असणे आवश्यक आहे त्यामुळे तुतीची लागवड बेण्याएवजी 3 महिने वयाच्या रोपांपासून करण्याची महाराष्ट्र शासनाने सक्ती केली आहे. लागवउ केल्यानंतर ठिबक सिंचनाची सुविधा केल्यास ढाडे मरण्याचे प्रमाण नगण्य राहते त्यामुळे झाडांची वाढ चांगली होऊन अपेक्षित तुती पानांचे उत्पादन मिळते.

सामुदायिक विज्ञान

हाडाच्या मजबुतीसाठी कॅल्सीयम युक्त अन्नपदार्थ नियमित घ्यावेत, उदा. दूध व दूधाचे पदार्थ, शेवग्याची पाने, फुलकोबीची पाने, नाचणी, बीट, हरभऱ्याची पाने, चमकुरा, कडीपत्ता, तीळ इत्यादी.

ईतर

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी हंगामातील पहिला पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक20/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक – 09.06.2023

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 19 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, परभणी,नांदेड व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे तर लातूर जिल्हयात वादळी वारासह मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 20 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, परभणी व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर इतर जिल्ह्यात हलक्या पाऊसाची शक्यता आहे. दिनांक 21 ते 23 ऑगस्ट कालावधीत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पाऊसाची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...