Tuesday, 20 June 2023

दिनांक 23 जून रोजी हिंगोली, नांदेड व परभणी जिल्हयात तर दिनांक 24 जून रोजी औरंगाबाद, जालना, हिंगोली, व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 23 जून रोजी हिंगोली, नांदेड व परभणी जिल्हयात तर दिनांक 24 जून रोजी औरंगाबाद, जालना, हिंगोली, व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 23 ते 29 जून 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण कमी झालेले आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 25 जून ते 01 जूलै 2023 दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

अद्याप मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झाले नसून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कोरडवाहू बिटी कापसाची लागवड 120 X 45 सें.मी. अंतरावर करता येते. लागवडीसाठी 2.5 ते 3.0 कि. ग्रॅ. प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. कापूस पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. कोरडवाहू तूरीची लागवड 90 X 20 ते 30 सें.मी. अंतरावर करता येते. बागायती तूरीची लागवड 90 X 90 सें.मी. टोकन पध्दतीने करता येते. कोरडवाहूसाठी हेक्टरी 12 ते 15 कि.ग्रॅ. बियाणे तर बागायती टोकन पध्दतीने लागवडीसाठी 5 ते 6 कि.ग्रॅ. प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. तुर पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. मूग व उडीद पिकाची पेरणी 30 X 10 सें.मी. अंतरावर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 12 ते 15 कि.ग्रॅ. बियाणे वापरावे. मूग/उडीद पिकाची पेरणी जूलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. भुईमूग पिकाची पेरणी 30 X 10 सें.मी. (उपट्या) तर 45 X 15 सें.मी. (पसऱ्या) अंतरावर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 100 ते 200 कि.ग्रॅ. उपटया तर 80 कि.ग्रॅ. पसऱ्या जातीचे बियाणे वापरावे. भुईमूग पिकाची पेरणी 7 जूलै पर्यंत करता येते. मका पिकाची पेरणी 60 X 30 सें.मी. अंतरावर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे. मका पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत करता येते.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नवीन केळी, आंबा, सिताफळ लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. केळीच्या घडांना काठीचा आधार द्यावा. केळी केळी, द्राक्ष, आंबा, सिताफळ बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. केळी, आंबा, सिताफळ, द्राक्ष बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

भाजीपाल्याचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना आधार द्यावा.

फुलशेती

फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

पशुधनात (गाय, म्हैस) यांना लसीकरणाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. 1. लाळ्या खुरकूत रोगाचे लसीकरण वर्षातून दोन वेळा लसीकरण करावे. 2. घटसर्प आणि फऱ्या रोगाचे (एकत्रित किंवा स्वतंत्र) पावसाळा सुरू होण्यापूर्वी लसीकरण करावे. 3. ब्रुसेललोसीस कॉटन प्रजाती 19 (3 ते 4 महिने) वयोगटातील वासरांसाठी. 4. फाशी रोग होत असलेल्या विभागात फाशी रोगाची लस 2 ते 3 किलोमिटर परिसरातील पशुधनास चक्राकार पध्दतीने करावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.  

सामुदायिक विज्ञान

शेतात कामे करतांना संपूर्ण हात, पाय, मान, सुती कापडाने झाकलेले ठेवावे अन्यथा कडक उनहामूळे त्वचा भाजली जाते.

ईतर

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी हंगामातील पहिला पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात.

 

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक23/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक – 20.06.2023

 

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 04 एप्रिल रोजी बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी जिल्हयात तर दिनांक 05 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 06 ते 08 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील चोवीस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 3 ते 4 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चोविस तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

    हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...