हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात
आकाश अंशत: ढगाळ ते ढगाळ राहून दिनांक 20 सप्टेंबर रोजी मराठवाडयात तूरळक ठिकाणी
हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 21 सप्टेंबर रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव व
लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग
अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या
पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 सप्टेंबर रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात
तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30
ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 23
सप्टेंबर रोजी नांदेड, छत्रपती संभाजी नगर, जालना, धाराशिव व बीड जिल्हयात तूरळक
ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40
कि.मी.) राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दिनांक 24 सप्टेंबर रोजी जालना, छत्रपती संभाजी नगर, बीड व धाराशिव जिल्हयात तूरळक
ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40
कि.मी.) राहून बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात व किमान तापमानात फारशी तफावत
जाणवणार नाही.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 20 ते 26 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान
सरासरीपेक्षा जास्त तर दिनांक 27 सप्टेंबर
ते 03 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान
तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
संदेश : प्रादेशिक
हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त
झालेला पावसाच्या अंदाज पाहता ज्या शेतकऱ्यांनी पिकाची काढणी केली असल्यास काढणी
केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी न केलेल्या पिकाची काढणी
पुढे ढकलावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन पिकात करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पूर्व मिश्रीत बूरशीनाशक) 25 ग्रॅम किंवा
टेब्यूकोनॅझोल 25.9% 12.5 मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 7.5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड
बघून फवारणी करावी. सोयाबीन पिकावरील किडींच्या व्यवस्थापनासाठी
क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली किंवा इंडाक्झाकार्ब 15.8% 140 मिली किंवा असिटामाप्रीड 25% + बाईफेंन्थ्रीन 25%
100 ग्रॅम किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3% + लँबडा सायहॅलोथ्रिन 4.6% 80 मिली किंवा आयसोसायक्लोसिरम 9.2% 240 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक पावसाची उघाड
बघून फवारावे. सोयाबीन पिक भरण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति
लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, त्यामूळे शेंगामधील बियांचे वजन वाढून उत्पन्न
वाढेल. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के
4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत
असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. ऊस पिकात हूमणीच्या
अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक
बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10
किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा.
ऊस पिकावर खोड किडीचा
प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 %
25 मिली किंवा
क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस
पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव
दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25%
20 मिली किंवा डायमिथोएट 30
% 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ
शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत.
हळद पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. हरभऱ्याच्या पेरणीसाठी मध्यम ते
भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. चोपन व आम्ल जमिनीत हे पीक बरोबर
येत नाही. पाणी साठवून ठेवणाऱ्या जमिनीत लागवड केल्यास हे पीक उमळते. या पिकास
कोरडे व थंड हवामान मानवते. करडई पिकाला मध्यम ते भारी, उत्तम निचरा आणि ओलावा
टिकवून ठेवणारी जमीन निवडावी. खरीपातील मुग, उडीद
किंवा सोयाबीन काढणीनंतर करडई पीक घ्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेत
आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. संत्रा/मोसंबी बागेत अन्नद्रव्याची
कमतरता दिसून येत असल्यास चिलेटेड झिंक 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची
उघाड बघून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी व फळगळ होऊ नये म्हणून
जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी
घ्यावी. संत्रा/मोसंबी बागेत किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 25-30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड
बघून फवारणी करावी. डाळींब
बागेतील अतिरिक्त फुटवे काढून टाकावेत. डाळींब बागेत आंतरमशागतीची कामे करून तण
नियंत्रण करावे. डाळींब बगेत
फळवाढीसाठी जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणे पावसाची उघाड
बघून फवारणी घ्यावी. चिकू बागेत
आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
भाजीपाला
भाजीपाला पिकात आंतरमशागतीची
कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार
असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार
पाणी व्यवस्थापन करावे.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची
काढणी करून घ्यावी. फुल पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. फुल पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
तुती रेशीम उद्योग
एकात्मिक शेती पध्दतीमध्ये शेती
व्यवस्थापन बरोबर पशुपालव व दुग्ध व्यवसाय सर्व शेतकऱ्यांना परिचीत आहे. दुधाच्या
व्यवसायामूळे संसारात मदत हाते, तसेच लहाण व मध्यम शेतकऱ्यांच्या उत्पादनात
स्थिरता येण्यासाठी आणि उत्पन्नामूळे आर्थीक बाजू बळकट होण्यासाठी शेतकरी रेशीम
उद्योगाकडे वळू लागले आहेत. रेशीम उद्योगात कौशल्य आत्मसात नसल्यामूळे व
अपारंपारिक उद्योग असल्याने लहाण शेतकऱ्यांना अडचण येत आहे. मनरेगा योजने अंतर्गत
आपल्याच शेतात केलेल्या कामाचा मोबदला पैसे व साहित्याच्या रूपात या उद्योगात एकरी
रू. 4 लक्ष 18 हजार तीन वर्षात मिळतात.
शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग गटामध्ये करून लाभ घ्यावा.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळयात पशुचे खाद्य नियोजन
व्यवस्थित ठेवावे व जनावरांचे खाद्य स्वच्छ व कोरडे असावे. पशुधनास पशुवैद्यकाच्या
सल्ल्याने जंतनाशकाची औषधी देण्यात यावी.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 50/2024
- 2025 शुक्रवार, दिनांक
– 20.09.2024
No comments:
Post a Comment