Friday 21 July 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 21 जूलै रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार ते खूप मुसळधार पावसाची तर हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची तर औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 जुलै रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची तर बीड व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 23 जूलै रोजी नांदेड, हिंगोली व परभणी तसेच दिनांक 24 जूलै रोजी नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर जिल्हयात तर दिनांक 25 जुलै रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 21 व 22 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी, दिनांक 23 ते 27 जुलै दरम्यान बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 21 जूलै रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार ते खूप मुसळधार पावसाची तर हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची तर औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 जुलै रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची तर बीड व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 23 जूलै रोजी नांदेड, हिंगोली व परभणी तसेच दिनांक 24 जूलै रोजी नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर जिल्हयात तर दिनांक 25 जुलै रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 21 व 22 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी, दिनांक 23 ते 27 जुलै दरम्यान बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 21 ते 27 जूलै 2023 दरम्यान व दिनांक 28 जूलै ते 04 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 26 जूलै ते 01 ऑगस्ट 2023 दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा दर कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे.

पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी खत देणे किंवा फवारणी करणे टाळावे.

मराठवाडयात मागील 15 दिवसात ज्या तालूक्यात पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास (जालना जिल्हा : बदनापूर ; बीड जिल्हा : धारूर, परळी वैजनाथ, पाटोदा, वडवणी) शेतकऱ्यांनी दोन दिवसानंतर वापसा आल्यास पेरणी करावी.

पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाला असल्यास सूर्यफुल, तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तूर (4:2), बाजरी + तूर (3:3), एरंडी, कारळ आणि तिळ, एरंडी + धने, एरंडी + तूर ही पिके घ्यावीत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

मागील काही दिवसात झालेला पाऊस व पुढील पावसाच्या अंदाजानूसार, जास्त पाऊस झालेल्या भागातील सोयाबीन, खरीप ज्वारी, बाजरी, ऊस व हळद पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. सोयाबीन पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मागील काही दिवसात झालेला पाऊस व पुढील पावसाच्या अंदाजानूसार, जास्त पाऊस झालेल्या भागातील  संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फळ बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.

भाजीपाला

मागील काही दिवसात झालेला पाऊस व पुढील पावसाच्या अंदाजानूसार, जास्त पाऊस झालेल्या भागात भाजीपाला पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

 

 

फुलशेती

मागील काही दिवसात झालेला पाऊस व पुढील पावसाच्या अंदाजानूसार, जास्त पाऊस झालेल्या भागातील फुल पिकात  अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

चारा पिके

मागील काही दिवसात झालेला पाऊस व पुढील पावसाच्या अंदाजानूसार, जास्त पाऊस झालेल्या भागातील चारा पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

तुती रेशीम उद्योग

पावसाळयात ढगाळ हवामानात रेशीम कीटक संगोपन ग्रहातील आर्द्रता 95 ते 99 टक्के पर्यंत राहते. अशा वेळी बाल्य तथा प्रोढ कीटक संगोपन क्रहात अनुक्रमे तापमान 28 ते 26 अं.से. व आर्द्रता 85 ते 65 टक्के च्या वर गेली तर ग्रासरी रोगाची व फ्लॅचरी रोगाची बाधा कीटकांना होते. त्यामूळे संगोपन ग्रहात स्वच्छता राखणे, आजूबाजूला शेडनेटच्या दरवाजा तेथे 0.3 % चुना + 2% ब्लीचींग पावडर द्रावण पाण्यात तयार करून शिंपडावे. संगोपन साहित्य ट्रे स्वच्छता जाळया, अच्छादन जाळया 2% फॉर मॅलीन मध्ये निर्जंतूक करून कडक उन्हात वाळवून पुन्हा वापराव्यात.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयात ढगाळ व दमट वातावरणामूळे बाह्य परोपजिवी उदा. माशा, पिसवा, डास यांचा प्रादूर्भाव वाढतो. याच्या व्यवस्थापनासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या साहाय्याने उपाययोजना कराव्यात.

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्यामूळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी.

सामुदायिक विज्ञान

पावसाळयात पचनक्रिया मंदावल्याने अन्नाचे पचन योग्य प्रकारे होत नाही. यासाठी यासाठी पावसाळयात पचनास हलका, ताजा आणि गरम आहार घ्यावा.

ईतर

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात. कापूस व सोयाबीन या सारख्या पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.

 

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक32/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक – 21.07.2023

 

 

 


No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...