Tuesday, 1 August 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 01 ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्हयात तर दिनांक 02 ऑगस्ट रोजी परभणी, हिंगोली, लातूर, जालना जिल्हयात तर दिनांक 03 ऑगस्ट रोजी औरंगाबाद, जालना, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर दिनांक 02 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 01 ते 03 ऑगस्ट दरम्यान बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 04 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी तर 05 ऑगस्ट रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार  दिनांक 01 ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्हयात तर दिनांक 02 ऑगस्ट रोजी परभणी, हिंगोली, लातूर, जालना जिल्हयात तर दिनांक 03 ऑगस्ट रोजी औरंगाबाद, जालना, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर दिनांक 02 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 01 ते 03 ऑगस्ट दरम्यान बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 04 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी तर 05 ऑगस्ट रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 04 ते 10 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 06 ते 12 ऑगस्ट 2023 दरम्यान कमाल तापमान, किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे.

दिनांक 02 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पाऊस झाल्यास पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

उशीरा लागवड केलेल्या कापूस पिकात विरळणी व तूट भरून काढणे ही कामे करून घ्यावीत. उशीरा पेरणी केलेल्या तूर पिकात विरळणी व नांग्या भरणे ही कामे करून घ्यावीत. कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. कापूस, तूर, मुग/उडीद, भुईमूग व मका पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. मागील आठवडयात ढगाळ वातावरण असल्यामूळे कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा ॲसिटामॅप्रिड 20 % 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकाची लागवड करून एक महिना झाला असल्यास कोरडवाहू कापसास 36 किलो नत्र प्रति हेक्टरी तर बागायती कापूस पिकास 60 किलो नत्र प्रति हेक्टरी वरखताची मात्रा द्यावी. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नवीन केळी, आंबा व सिताफळ बाग लागवड केली नसल्यास ती लवकरात लवकर करून घ्यावी, नवीन केळी, आंबा व सिताफह लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. केळी, आंबा व सिताफळ बागेत जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी. आंबा व सिताफळ बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.  पावसामूळे द्राक्ष बागेत आर्द्रता वाढण्यास मदत होऊन वेलींची वाल जोमात होईल. त्यामूळे शूट पिंचिंग करणे खूप महत्वाचे ठरते. सध्याच्या ढगाळ व दमट वातावरणामूळे द्राक्ष बागेत ऍन्थ्रॅकनोज रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम किंवा थायोफेनेट मिथाईल 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सात दिवसानंतर दूसरी फवारणी करावी. द्राक्ष बागेत अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत असल्यास 19:19:19 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

 

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. भाजीपाला पिकात शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करून घ्यावी. फुल पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळा ऋतूमध्ये अनेक वनस्पती सोबतच विषारी वनस्पती उदा. निळी फुली व माठ/काटेमाठ या देखील वाढतात. या वनस्पती पशुधनाच्या खाण्यामध्ये आल्यास विषबाधा होते. माठ/काटेमाठ खाण्यात आल्यास त्यातील नायट्रेटची विषबाधा होऊन श्वसन संस्थेवर परिणाम होऊन मृत्यू ओढवतो. निळीफुली ही वनस्पती खालल्यास किडणीवर परिणाम होतो म्हणून अशा वनस्पती खाण्यात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, व खाण्यामध्ये  आल्यास तात्काळ औषधोपचार करावा.

सामुदायिक विज्ञान

पावसाळयामध्ये पाणी दूषि‍त झालेले असते. अशा पाण्याचा वापर केल्याने, अतिसार, उलटया, गॅस्ट्रो, कावीळ, टायफाईड असे आजार होण्याची शक्यता असते. त्यामूळे असे घातक आजार टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्यात तूरटी फिरवून पाणी उकळून, गाळून आणि थंड करून त्याचा वापर करावा.

ईतर

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात. कापूस व सोयाबीन या सारख्या पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक35/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक – 01.08.2023

 

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 व 15 एप्रिल रोजी मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 12 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 13 व 14 एप्रिल रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

    हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...