Friday, 1 September 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात 01 सप्टेंबर रोजी तूरळक ठिकाणी, दिनांक 02 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक 03, 04 व 05सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. ‍दिनांक 02 व 03 सप्टेंबर रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 04 सप्टेंबर रोजी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात 01 सप्टेंबर रोजी तूरळक ठिकाणी, दिनांक 02 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक 03, 04 व 05 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. ‍दिनांक 02 व 03 सप्टेंबर रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 04 सप्टेंबर रोजी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील एक ते दोन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यांनतर तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात 01 सप्टेंबर रोजी तूरळक ठिकाणी, दिनांक 02 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक 03, 04 व 05सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 01 ते 07 सप्टेंबर 2023 व दिनांक 08 ते 14 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 06 ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

मागील काही दिवसात पावसाने दिलेल्या दिर्घ खंडामूळे, सोयाबीन, खरीप ज्वारी व बाजरी पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. पाण्याची उपलब्धता असल्यास पिकास तुषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे पाणी शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी द्यावे. पावसाच्या खंड काळात सोयाबीन पिकावर किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, सोयाबीन पिकावरील किडींच्या व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर किंवा थायामिथोक्झाम 12.6% + लँबडा सायहॅलोथ्रिन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली प्रति एकर किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3% + लँबडा सायहॅलोथ्रिन 4.6% 80  मिली प्रति एकर (पूर्वमिश्रित किटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% 100 ते 120 मिली प्रति एकर किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 140 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक फवारावे. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून  फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. मागील काही दिवसात पावसाने दिलेल्या दिर्घ खंडामूळे, ऊस व हळद पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पिकास ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे पाणी शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी द्यावे. पावसाच्या खंडामूळे ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी. ऊस पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. पावसाच्या खंड काळात ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मागील काही दिवसात पावसाने दिलेल्या दिर्घ खंडामूळे, हळद पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. हळद पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत हलकी कोळपणी करावी जेणेकरून बागेतील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. मागील काही दिवसात पावसाने दिलेल्या दिर्घ खंडामूळे, संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे पाणी शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी द्यावे. लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 20 मिली किंवा प्रोपरगाईट 20 ईसी 10 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 20 मिली किंवा अबामेक्टिन 1.9 ईसी 3.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 20 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 30 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. अंबे बहार धरलेल्या मोसंबी फळबागेत फळगळ थांबविण्यासाठी 100 लिटर पाण्यात एक किलो यूरिया + 30 मिली प्लॅनोफिक्स द्रावणाची फवारणी करावी. संत्रा/मोसंबी फळबागेत फळवाढीसाठी 13:00:45 1.5 किलो + जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू फळ बागेत ओलाव्याचा ताण सहनशीलतेसाठी बॅसिलस लिचिनोफॉरमीस या द्रवरूप जिवाणू खताची एकरी 2 लिटर प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी किंवा ठिबक संचाद्वारे द्यावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. मागील काही दिवसात पावसाने दिलेल्या दिर्घ खंडामूळे, भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे पाणी शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी द्यावे. मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

नविन लागवड केलेल्या फुल पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. मागील काही दिवसात पावसाने दिलेल्या दिर्घ खंडामूळे, फुल पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे पाणी शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी करून घ्यावी.

चारा पिके

मागील काही दिवसात पावसाने दिलेल्या दिर्घ खंडामूळे, चारा पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे पाणी शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी द्यावे. चारा  पिकासाठी उशीरा लागवड केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. 

तुती रेशीम उद्योग

रेशीम कोषाचा बाजारातील भाव कोषातील रेशीम धागा टक्केवारीवर अवलंबून असतो. तेव्हा ए ग्रेड कोष उत्पादन करण्यासाठी तुतीच्या पानाची प्रत उत्तम असावी लागते. त्यासाठी विषमूक्त व सेंद्रीय खत देणे गरजेचे आहे. एक किलो कोष होण्यासाठी कमीत कमी कोषाची संख्या हवी. साधारणपणे 550 ते 600 कोष एक किलोत बसले तर ए ग्रेड, 600 ते 700 कोष बसले तर बी ग्रेड, 700 ते 800 कोष बसले तर सी ग्रेड व 800 च्या वर बसले तर डी ग्रेड. एक कि.ग्रॅ. रेशीम धागा तयार होण्यासाठी लागणार कोष संख्या (किलो) त्यास रिनडाटा असे म्हणतात. मागील दशकात 8.5 किलो कोष वरून सध्या 6.5 किलो पर्यंत रीनडाटा ने मजल मारली आहे.

पशुधन व्यवस्थापन

गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी स्कीन रोगाचा प्रादूर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. याची सर्वात जास्त झळ लहान वयातील वासरांना जाणवत असून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी नियंत्रणासाठी व त्यांची शारिरीक प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 1) वासरांना चिक पाजावा. 2) वयाच्या सातव्या दिवशी जंतनाशक औषधीची मात्रा द्यावी. 3) महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक तत्वानूसार लसीकरण करून घ्यावे. 4)आजारी आणि निरोगी वासरे, गोधन स्वतंत्र पणे विलगीकरण करावे. 5) सर्वात महत्वाचे म्हणजे 20% सूश्रूषा व 80% काळजी (ज्यामध्ये पाणी, सकस चारा, जखमांची सुश्रुषा ईत्यादी) गोष्टी कराव्यात. 6) “माझे पशुधन माझी जबाबदारी” या सुत्रानूसार आपल्या गोवंशीय पशुधनाची या कालावधीमध्ये जास्तीत जास्त काळजी घ्यावी.

सामुदायिक विज्ञान

लहानपणापासूनच बालकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात दिसणाऱ्या गोष्टींची आकर्षक व रंगीत गोष्टीची चित्रमय पुस्तके, पोस्टर्स, कार्डस इ. उपलब्ध करून देणे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लाभदायी असते. अशा बालसाहित्यामूळे त्यांचा शब्दसंग्रह, सामान्यज्ञान, जिज्ञासा व कल्पनाशक्ती वृध्दींगत होऊन त्यांच्यात  अभ्यासाची आवड निर्माण होते.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक44/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक – 01.09.2023

 

 

 


No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवसात मराठवाड्याच्या दक्षिण- पूर्व भागात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 08 व 09 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी रात्र उबदार राहील. मराठवाडयात पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची तर पुढील तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...