प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस
दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या
पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली
जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक
(ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे
रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना,
विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात 3 ते 4
अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 18 मे नंतर किमान तापमानात
वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 17 ते 23 मे दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा
कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी ते सरासरीएवढे राहण्याची व 24 ते 30 मे
दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान
सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या
उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार
मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहे.
संदेश :
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 18 मे 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता
सभागृह कृषि महाविद्यालय, वनामकृवि, परभणी येथे खरीप पीक परिसंवाद आयोजन करण्यात आला आहे तरी
सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी
वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्याय पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणी
केलेल्या उन्हाळी तीळ व उन्हाळी भुईमूग पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या
हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरु आहेत. पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्याय पावसाचा अंदाज लक्षात घेता, हळदीची उघड्यावर साठवण करू नये. काढणी
केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
पुढील पाच दिवसात कमाल तापमानात 3
ते 4 अं.से. ने वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी
व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी व आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन
करावे. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी
द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. नविन लागवड केलेल्या फळबागेमध्ये रोपांना
शेडनेटच्या साहाय्याने सावली करावी जेणेकरून लहान रोपांचे प्रखर उन्हापासून
संरक्षण होईल. पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्याय पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या केळी घडांची व आंबा
फळांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. मागील
आठवडयात तूरळक ठिकाणी झालेल्या वादळी वारा, पाऊस यामूळे बागेत पडलेली फळे गोळा
करून नष्ट करावीत. मोडलेली झाडे बागेबाहेर काढावी. मागील आठवडयात तूरळक ठिकाणी झालेल्या वादळी
वारा, पाऊस यामूळे बागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. मोडलेल्या फांद्यांची
छाटणी करावी. द्राक्ष बागेमध्ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते.
द्राक्ष बागेत एप्रिल छाटणी केली नसल्यास लवकरात लवकर पूर्ण करावी.
भाजीपाला
पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी
वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्याय पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणीस
तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची, कांदा, टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी लवकरात
लवकर करावी. नविन लागवड केलेल्या व लहान
वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा. पुढील
पाच दिवसात कमाल तापमानात 3 ते 4 अं.से. ने वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील
ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी
देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा. मागील आठवडयात
तूरळक ठिकाणी झालेल्या वादळी वारा, पाऊस यामूळे प्रादूर्भाव ग्रस्त भाजीपाला गोळा
करून नष्ट करावा.
फुलशेती
पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी
वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्याय पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणीस
तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजार पेठेत पाठवावी. पुढील पाच दिवसात कमाल तापमानात 3 ते 4 अं.से. ने वाढ होण्याचा अंदाज
लक्षात घेता, फुल पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
पुढील पाच दिवसात कमाल तापमानात 3
ते 4 अं.से. ने वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, जनावरांना सावलीत बांधावे आणि
पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. पशुधनाकडून सकाळी 11 ते दूपारी 4
यादरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या
छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास
त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त,
खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर
पाणी शिंपडावे किंवा त्यांना पाणोठ्यावर
न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे. पुढील पाच दिवसात तूरळक
ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्याय पावसाचा अंदाज लक्षात घेता, चेतावनीच्या
काळात जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे.
कुकुटपालन
उन्हाळयात वाढलेल्या तापमानामुळे
कोंबड्यांना उष्माघाताचा त्रास होतो कोंबड्यांना उष्माघाताच्या त्रासापासून
वाचवण्यासाठी कोंबड्यांच्या शेडवर वाळलेले गवत टाकावे शेडच्या छतावर स्प्रिंकलर
किंवा तुषार बसवावेत कोंबड्यांना खाद्यातून खाण्याचा सोडा 150 ते 200 ग्रॅम प्रति
100 कि.ग्रॅ. खाद्य या प्रमाणात द्यावा खाद्य पुरवठा सकाळी लवकर करावा. खाद्यावर
थोड्या प्रमाणात पाणी शिंपडावे दुपारच्या उष्ण वातावरणात पक्षांना हाताळू नये
कोंबड्यांना अविरत थंड पाण्याचा पुरवठा करणे आवश्यक आहे तसेच पिण्याच्या पाण्यातून
जीवनसत्व क, इ आणि अ यांचा समावेश करावा.
रेशीम शेती
रेशीम किटक संगोपन करतांना अळीच्या
वाढीच्या तीसऱ्या व चौथ्या अवस्थेत उझी माशी अळीच्या शरीरावर बसून 2 किंवा 3 अंडी
टाकते दोन ते तिन दिवसात त्या अंडीमधून उझी माशीची अळी (ग्रब) बाहेर पडून तोंडातील
हूकच्या साहाय्याने रेशीम अळीच्या पोटात प्रवेश करते. तीन दिवसात रेशीम अळी मृत
पावते. अळीच्या पाचव्या वाढीच्या अवस्थेत उझी माशीचा प्रादूर्भाव झाला तर अळी कोष विणन
करते व तयार शंखी मधून तयार झालेल्या रेशीमा कोषांना छिद्र पाडून उझी माशी बाजार
पेठेत बाहेर पडते व कोषांना कमी भाव लागतो. शेतकऱ्यांचे नुकसान होते. वेळीच नियंत्रणर
करण्यासाठी उझी माशीवर उपजिवीका करणारा टॅक्निड फ्लाय निसोलायनेक्स थायमस
(एन.टी.पाउच) परपरोपजिवी किडींची निर्मिती रेशीम संशोधन योजना, वनामकृवि, परभणी
येथे सुरू करण्यात आली असून प्रति शंभर अंडी पूंजासाठी दोन एनटी पाउच शिफारस करण्यात
आली आहे.
सामुदायिक विज्ञान
स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी :
दररोज संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि
मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका.
जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.
कृषि अभियांत्रिकी
शेतात लवकरात लवकर खोल नांगरणी
करून घ्यावी. त्यामूळे जमिन तापन्यास मदत होऊन किडींचे कोष व घातक बूरशीचा नायनाट
होईल. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील मातीचे माती परिक्षण करून घ्यावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 14/2024
- 2025 शुक्रवार, दिनांक
– 17.05.2024
No comments:
Post a Comment