Friday, 28 June 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 28 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 28, 29 व 30 जून रोजी काही ठिकाणी तर दिनांक 01 व 02 जूलै रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 28 जून 04 जूलै व 05 ते 11 जूलै दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 03 ते 09 जूलै 2024 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास (परभणी जिल्हा : पूर्णा ; हिंगोली जिल्हा : वसमत, सेनगाव ; लातूर जिल्हा : जळकोट ; नांदेड जिल्हा : नांदेड, बिलोली, हतगाव, देगलूर, उमरी, भोकर, हिमायतनगर, नायगाव) शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. इतर तालूक्यात पेरणी करण्यास हरकत नाही.

संदेश :

मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. सर्वसाधारणपणे 15 जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची (मूग, उडीद, भुईमूग सोडून) पेरणी करता येते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच सोयाबीन पिकाची पेरणी करावी. सोयाबीन पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतो बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने करावी ज्यामूळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन मिळते. वेळेवर पेरणी केलेल्या सोयाबीन पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच खरीप ज्वारी पिकाची पेरणी करावी. खरीप ज्वारी पिकाची पेरणी 07 जुलैपर्यंत करता येते. वेळेवर पेरणी केलेल्या खरीप ज्वारी पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच बाजरी पिकाची पेरणी करावी. बाजरी पिकाची पेरणी 30 जुलैपर्यंत करता येते. वेळेवर पेरणी केलेल्या बाजरी पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. सुरू ऊसाची पक्की बांधणी केली नसल्यास ती करून घ्यावी व नत्र खताचा चौथा हप्ता द्यावा. हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये पालेभाज्या सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

पाऊस झालेल्या ठिकाणी नविन संत्रा/मोसंबी बागेची लागवड करावी. नवीन संत्रा/मोसंबी लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत असल्यास चिलेटेड झिंक 50 ग्रॅम + 13:00:45 150 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी नविन डाळींब बागेची लागवड लागवड करावी. नवीन डाळींब लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी नविन चिकू बागेची लागवड करावी. नवीन चिकू लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.

भाजीपाला

पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

पाउस झालेल्या ठिकाणी  जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी.  काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.

चारा पिके

पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच मका चारा पिकाची पेरणी करावी. मका या चारापिकासाठी 80:40:40 नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी खत मात्रा पेरणीच्यावेळी द्यावी.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयात ढगाळ व दमट वातावरणामूळे बाह्य परोपजिवी उदा. माशा, पिसवा, डास यांचा प्रादूर्भाव वाढतो. याच्या व्यवस्थापनासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या साहाय्याने उपाययोजना कराव्यात.

तुती रेशीम उद्योग

महाराष्ट्र शासनाने तुती लागवडी करीता तुती बेणे सरळ शेतात लागवड न करता तुती रोपवाटीका तयार करून 3 महिने कालावधी झालेल्या वयाची रोपे आखणी करून 6X3X2 फुट पट्टा पध्दत लागवड करावी. या पध्दतीत 12345 झाडे प्रति हेक्टरी लागतात. रोपाने लागवड केली तर लागवडीत तूट होत नाही. अन्यथा तुट झाली तर पुन्हा तुती बेणे न लावता तुती रोपेच लावावीत. तुती बेणे पुन्हा येत नाही व तूट कायम राहते. दुसऱ्या वर्षी झाडांची संख्या प्रति हेक्टर शिफारशीप्रमाणे किंवा 90 % च्या वर राहीली तरच मनरेगा योजनेत मंजूरी मिळते.

कुक्कुट पालन

पावसामुळे कुक्कुटपालकांना पोल्ट्री बऱ्यापैकी रोगाचा सामना करावा लागत आहे. कमी तापमान आणि उच्च आर्द्रता रोगजनक आणि परजीवींच्या वाढीसाठी परिस्थिती अतिशय अनुकूल बनवते. पावसाळ्यात तुमच्याय पोल्ट्री शेडचा कंदील (छताच्या बाहेरील भाग) पाऊस झाकण्यासाठी शेड करण्यासाठी 4 ते 5 फूट पुढे असणे आवश्यक आहे. पावसाळ्यात खाद्याचे बुरशीजन्य दूषित होणे ही एक सामान्य समस्या आहे. पावसाळ्यात खाद्य कोरडया जागी साठवा. पाण्याची बॅक्टेरियोलॉजिकल तपासणी करणे आवश्यक आहे. पावसाळ्याच्या दिवसात हवेत दमटपणा वाढतो तसेच रक्ती हगवणीसारख्या रोगाचा प्रादुर्भाव होतो यासाठी लीटर नेहमी कोरडे राहील याची काळजी घ्यावी. कोलिबॅसिलोसिस, मायको टॉक्सिकोसिस याविरूध्द औषधांचे प्रतिबंधात्मक डोस, विशेषत: neodox-1 ग्रॅम/2 लिटर पाण्यातून देणे.

सामुदायिक विज्ञान

पावसाळयात हिरव्या भाजी-पाल्याचा, स्वच्छ धूवून कमी प्रमाणात वापर करावा. याशिवाय फळभाज्या, जसे की कारले, दोडके, दिलपसंद, दुधीभोपळा, बटाटा, शेंगा यांचा जास्त वापर करावा.

कृषि अभियांत्रिकी

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक26/2024 - 2025         शुक्रवार, दिनांक 28.06.2024

Tuesday, 25 June 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 25 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या तर दिनांक 26 जून रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या तर दिनांक 27 जून रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 28 जून रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 29 जून रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 28 जून 04 जूलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 30 जून ते 06 जुलै 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास (परभणी जिल्हा : पूर्णा ; हिंगोली जिल्हा : वसमत, सेनगाव ; लातूर जिल्हा : जळकोट ; नांदेड जिल्हा : नांदेड, बिलोली, हतगाव, भोकर, देगलूर, हिमायतनगर, उमरी, नायगाव) शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. इतर तालूक्यात पेरणी करण्यास हरकत नाही.

संदेश :

मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकास हेक्टरी 30 किलो नत्र + 60 किलो स्फुरद + 30 किलो पालाश + 20 किलो ग्रॅम गंधक खताची मात्रा पेरणीच्यावेळी द्यावी. सोयाबीन पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतो बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने करावी ज्यामूळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन मिळते. खरीप ज्वारीस 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रति हेक्टरी खतमात्रा शिफारस केली आहे. त्यापैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणी करताना द्यावे. खरीप ज्वारी पिकाची पेरणी  जुलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. बाजरी पिकास हलक्या जमिनीत 40:20:20 व मध्यम ते भारी जमिनीत 60:30:30 पैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणी करताना द्यावे. बाजरी पिकाची पेरणी 20 जुलैपर्यंत करता येते. सुरू ऊसाची पक्की बांधणी केली नसल्यास ती करून घ्यावी व नत्र खताचा चौथा हप्ता द्यावा. हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये पालेभाज्या सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

पाऊस झालेल्या ठिकाणी नविन संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेची लागवड करावी. नवीन संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.

भाजीपाला

पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

पाउस झालेल्या ठिकाणी  जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी.  काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.

चारा पिके

मका या चारापिकासाठी 80:40:40 नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी खत मात्रा पेरणीच्यावेळी द्यावी.

पशुधन व्यवस्थापन

पीपीआर या विषाणूजण्य रोगाचा प्रादूर्भाव पावसाळयाच्या सुरुवातीस वाढत जातो. म्हणून या रोगावर उपलब्ध असलेल्या लसीचे तिन महिने व त्यावरील वयोगटातील शेळी-मेंढीच्या पिल्लांमध्ये लसीकरण करून घ्यावे. ही लस गर्भ धारण शेळी-मेंढी मध्ये करू नये.

तुती रेशीम उद्योग

प. बंगाल राज्यातून स्‍थलांतरीत झालेली व कर्नाटक, आंध्र प्रदेशात हाहाकार माजवत असलेली व रेशीम कीटकावर प्रादूर्भाव करणार किड उझी माशी सन 2018 पासून महाराष्ट्रातील जालना, बीड, लातूर व परभणी जिल्हयात रेशीम कोष पिकाचे 20 ते 30 टक्के नुकसान करत असल्याचे अढळून आले आहे. भारतात 80 टक्के कच्चे रेशीम कीटक संगोपनगृह असून महाराष्ट्र राज्यात 98 टक्के कच्चे शेडनेट गृहच रेशीम कीटक संगोपनासाठी शिफारस करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी हळूहळू 1 ते 1.5 एकर तुती बागेसाठी पक्के संगोपनगृह बांधुन घ्यावीत म्हणजे रेशीम कोष उत्पादनात सातत्य आणि शाश्वतता टिकून राहील. उझी माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पाने साठवण गृह (अंधार खोली) ॲन्ट रूम असावी. सरळ तुती फांद्या संगोपनगृहात नेवून खाद्य न देता अंधार खोलीत 2 तास ठेवून नंतर खाद्य द्यावे.

सामुदायिक विज्ञान

पावसाळयात हिरव्या भाजी-पाल्याचा, स्वच्छ धूवून कमी प्रमाणात वापर करावा. याशिवाय फळभाज्या, जसे की कारले, दोडके, दिलपसंद, दुधीभोपळा, बटाटा, शेंगा यांचा जास्त वापर करावा.

कृषि अभियांत्रिकी

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक25/ 2024- 2025    मंगळवार, दिनांक – 25.06.2024

Friday, 21 June 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 23 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मूसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 21 जून रोजी नांदेड, हिंगोली, जालना, परभणी जिल्हयात काही ठिकाणी तर दिनांक 22 जून रोजी बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 23 जून रोजी बीड, धाराशिव व लातुर जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 24 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 23 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मूसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 21 जून रोजी नांदेड, हिंगोली, जालना, परभणी जिल्हयात काही ठिकाणी तर दिनांक 22 जून रोजी बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 23 जून रोजी बीड, धाराशिव व लातुर जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 24 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व किमान तापमानात पुढील दोन दिवसात 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 21 ते 27 जून दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची व 28 जून 04 जूलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग  किंचित वाढलेला आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 26 जून ते 02 जूलै 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास (परभणी जिल्हा : पूर्णा, पालम ; हिंगोली जिल्हा : वसमत, सेनगाव ; लातूर जिल्हा : जळकोट ; नांदेड जिल्हा : नांदेड, बिलोली, हतगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, नायगाव) शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.

संदेश :

मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. सर्वसाधारणपणे 15 जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची (मूग, उडीद, भुईमूग सोडून) पेरणी करता येते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कोरडवाहू बिटी कापूस पिकास 120:60:60 किलो ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी शिफारशीत रासायनिक खतमात्रापैकी 48 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 60 किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. बागायती बिटी कापूस पिकास 150:75:75 किलो ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी शिफारशीत रासायनिक खतमात्रापैकी 30 किलो नत्र, 75 किलो स्फुरद व 75 किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. कापूस पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. तूर पिकास 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी खतमात्रा पेरणीच्यावेळी जमिनीत पेरून द्यावी. तुर पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. मूग/उडीद पिकास पेरणीच्यावेळी 25 किलो नत्र व 50 किलो स्फुरद हेक्टरी मात्राद्यावी. मूग/उडीद पिकाची पेरणी जूलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. भुईमूग पिकास 20 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी खतमात्रा पेरणीच्यावेळी जमिनीत पेरून द्यावी. भुईमूग पिकाची पेरणी 7 जूलै पर्यंत करता येते. मका पिकास 150:75:75 किलो नत्र, स्फुरद व पालाश रासायनिक खतमात्रापैकी अर्धे नत्र संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व 75 किलो नत्र पेरणीनंतर एक महिन्याने द्यावे. मका पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत करता येते.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नवीन केळी, आंबा व सिताफळ लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.  द्राक्ष बागेतील फुटवे काढावेत. बागेत पानांची विरळणी करावी. बागेत आर्द्रता वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.

भाजीपाला

भाजीपाल्याचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

पीपीआर या विषाणूजण्य रोगाचा प्रादूर्भाव पावसाळयाच्या सुरुवातीस वाढत जातो. म्हणून या रोगावर उपलब्ध असलेल्या लसीचे तिन महिने व त्यावरील वयोगटातील शेळी-मेंढीच्या पिल्लांमध्ये लसीकरण करून घ्यावे. ही लस गर्भ धारण शेळी-मेंढी मध्ये करू नये.

तुती रेशीम उद्योग

प. बंगाल राज्यातून स्‍थलांतरीत झालेली व कर्नाटक, आंध्र प्रदेशात हाहाकार माजवत असलेली व रेशीम कीटकावर प्रादूर्भाव करणार किड उझी माशी सन 2018 पासून महाराष्ट्रातील जालना, बीड, लातूर व परभणी जिल्हयात रेशीम कोष पिकाचे 20 ते 30 टक्के नुकसान करत असल्याचे अढळून आले आहे. भारतात 80 टक्के कच्चे रेशीम कीटक संगोपनगृह असून महाराष्ट्र राज्यात 98 टक्के कच्चे शेडनेट गृहच रेशीम कीटक संगोपनासाठी शिफारस करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी हळूहळू 1 ते 1.5 एकर तुती बागेसाठी पक्के संगोपनगृह बांधुन घ्यावीत म्हणजे रेशीम कोष उत्पादनात सातत्य आणि शाश्वतता टिकून राहील. उझी माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पाने साठवण गृह (अंधार खोली) ॲन्ट रूम असावी. सरळ तुती फांद्या संगोपनगृहात नेवून खाद्य न देता अंधार खोलीत 2 तास ठेवून नंतर खाद्य द्यावे.

सामुदायिक विज्ञान

पावसाळयात हिरव्या भाजी-पाल्याचा, स्वच्छ धूवून कमी प्रमाणात वापर करावा. याशिवाय फळभाज्या, जसे की कारले, दोडके, दिलपसंद, दुधीभोपळा, बटाटा, शेंगा यांचा जास्त वापर करावा.

कृषि अभियांत्रिकी

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक24/2024 - 2025         शुक्रवार, दिनांक 21.06.2024

Tuesday, 18 June 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, दिनांक 23 व 24 जून रोजी काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 जून रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, दिनांक 23 व 24 जून रोजी काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 जून रोजी  हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 21 ते 27 जून दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 23 ते 29 जून 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास (परभणी जिल्हा : पूर्णा, पालम ; हिंगोली जिल्हा : वसमत, सेनगाव ; लातूर जिल्हा : जळकोट ; नांदेड जिल्हा : नांदेड, बिलोली, हतगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, नायगाव) शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. इतर तालूक्यात पेरणी करण्यास हरकत नाही.

संदेश :

मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीनची पेरणी 45X5 सें.मी. अंतरावर व 2.5 ते 3.0 सें.मी. खोलीवर करता येते. सोयाबीन पेरणीसाठी हेक्टरी 65 किलो बियाणे वापरावे. सोयाबीनची पेरणी 15 जुलै पर्यंत करता येते. सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतो बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने करावी ज्यामूळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन मिळते. खरीप ज्वारीच्या पेरणीसाठी दोन ओळीमध्ये 45 सें.मी., दोन झाडातील अंतर 12.5 सें.मी. ठेवावे व पेरणी 3 ते 4 सें.मी. खोलीवर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 7.5 किलो संकरित व 10 किलो सुधारीत वाणांचे बियाणे वापरावे. खरीप ज्वारीची पेरणी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करता येते. बाजरीची पेरणी 45X15 सें.मी. अंतरावर करता येते. पेरणी करतांना 4 सें.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये. बाजरी पेरणीसाठी हेक्टरी 3 ते 4 किलो बियाणे वापरावे. बाजरीची पेरणी 20 जुलै पर्यंत करता येते. सुरू ऊसाची पक्की बांधणी केली नसल्यास ती करून घ्यावी व पक्की बांधणी करतांना 100 किलो नत्र, 55 किलो स्फुरद व 55 किलो पालाश प्रति हेक्टरी रासायनिक खतांची मात्रा द्यावी.  हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये पालेभाज्या सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नवीन संत्रा/मोसंबी लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. जून्या संत्रा बागेस 500:500:500 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रति झाड व मोसंबी बागेस 400:400:400 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रति झाड खतमात्रा द्यावी. नवीन डाळींब लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. जून्या डाळींब बागेस 300:250:250 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रति झाड खतमात्रा द्यावी. नवीन ‍चिकू लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.

भाजीपाला

भाजीपाल्याचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना आधार द्यावा.

फुलशेती

फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

चारा पिके

मका या चारापिकाची पेरणी 30X45 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी 40 ते 45 किलो बियाणे वापरावे.

पशुधन व्यवस्थापन

गाई म्हशींमध्ये घटसर्प व फऱ्या आणि शेळ्या, मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराची लस टोचून घेणे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.

तुती रेशीम उद्योग

हुमणी अळी (White Grub) ही मे-जून बिटल या नावानेही ओळखल्या जाते. हि सर्व प्रकारच्या पिकावर येणारि बहूभक्षी किड होय. फक्त मे-जून महिन्यात सायंकाळी लिंब किंवा बाभळीच्या झाडावर किडीचे भुंगे अवस्था पाने खाताना दिसते. नर-मादि मिलनानंतर जुलै-ऑगस्ट महिण्यापर्यंत (ग्रब) अळी अवस्था तयार होते. इंग्रजी C या आकाराची अळी सर्व पिकाच्या मुळांवर उपजिवीका करते. जिवनक्रम एक वर्षाचा असून वर्षभर तुर, सोयाबीन, कपासी, ऊस या पिकाच्या मुळाशी खाते व नुकसान करते. मशागतीय भौतिक, जैविक प्रकारच्या नियंत्रण पध्दतीत मे-जून महिन्यात प्रकाश सापळ्यांच्या साहाय्याने नियंत्रण सर्वात परिणामकारक आहे. जैविक नियंत्रणात मेटारायझीयम ॲनिसोप्ली नावाची जैविक बुरशीनाशक वनामकृवि, परभणी येथे उपलब्ध आहे. 5 कि.ग्रॅ./एकर या प्रमाणात वापरले तर हुमणी नियंत्रण होते. रासायनिक पध्दतीत फोरेट 10 जी किटकनाशक 8 कि.ग्रॅ./एकर अशी शिफारस आहे.

सामुदायिक विज्ञान

रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी रोजच्या जेवणातील पदार्थांमध्ये विविध पानांची (पावडर) भुकटीचा उपयोग करता येतो. जसे, कढीपत्यांची पाने, कोबीची पाने,  राजगिऱ्याची पाने, शेवग्याची पाने, हरबऱ्याची पाने आणि बिटाची पाने इत्यादी.

कृषि अभियांत्रिकी

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी हंगामातील पहिला पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक23/ 2024- 2025    मंगळवार, दिनांक – 18.06.2024

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 01 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तर दिनांक 02 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर तूरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे. दिनांक 01 व 03 एप्रिल रोजी बीड व धाराशिव जिल्हयात ; दिनांक 02 एप्रिल रोजी परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 03 एप्रिल रोजी परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात ; दिनांक 04 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...