प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 जून रोजी छत्रपती संभाजी नगर,
जालना, बीड, परभणी जिल्हयात तर दिनांक 16 जून रोजी धाराशिव, लातूर व बीड जिल्हयात तर
दिनांक 17 जून रोजी लातूर जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा
कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मूसळधार स्वरूपाच्या पावसाची
शक्यता आहे. दिनांक 14 जून रोजी धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्हयात तर
दिनांक 15 जून रोजी धाराशिव, लातूर, परभणी, बीड, नांदेड जिल्हयात तर दिनांक 16 जून
रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 17 जून रोजी छत्रपती
संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात काही ठिकाणी वादळी
वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 14 ते 20 जून दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा
कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची व 21 ते 27
जून दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे
ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या
उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार
मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 19 ते 25 जून 2024 दरम्यान पाऊस सरासरी
पेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान
तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी
योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास (परभणी जिल्हा : गंगाखेड, जिंतूर, पूर्णा,
पालम, सेलू, सोनपेठ; हिंगोली जिल्हा : वसमत,
सेनगाव ; लातूर जिल्हा : जळकोट ; नांदेड जिल्हा : नांदेड, बिलोली, मुखेड, कंधार, लोहा, हतगाव, भोकर,
देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव) शेतकऱ्यांनी
पेरणीची घाई करू नये. इतर तालूक्यात पेरणी करण्यास हरकत नाही.
संदेश :
मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75
ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कोरडवाहू बिटी कापसाची लागवड 120
X 45 सें.मी. अंतरावर करता येते.
लागवडीसाठी 2.5 ते 3.0 कि. ग्रॅ. प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. कापूस पिकाची
लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. कोरडवाहू तूरीची लागवड 90 X 20 ते 30 सें.मी. अंतरावर करता येते. बागायती तूरीची लागवड 90
X 90 सें.मी. टोकन पध्दतीने
करता येते. कोरडवाहूसाठी हेक्टरी 12 ते 15 कि.ग्रॅ. बियाणे तर बागायती टोकन
पध्दतीने लागवडीसाठी 5 ते 6 कि.ग्रॅ. प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. तुर पिकाची
लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. मूग व उडीद पिकाची पेरणी 30 X 10 सें.मी. अंतरावर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 12 ते 15
कि.ग्रॅ. बियाणे वापरावे. मूग/उडीद पिकाची पेरणी जूलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत
करता येते. भुईमूग
पिकाची पेरणी 30 X 10 सें.मी. (उपट्या) तर 45 X 15 सें.मी. (पसऱ्या) अंतरावर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 100
ते 200 कि.ग्रॅ. उपटया तर 80 कि.ग्रॅ. पसऱ्या जातीचे बियाणे वापरावे. भुईमूग
पिकाची पेरणी 7 जूलै पर्यंत करता येते. मका पिकाची पेरणी 60 X 30 सें.मी. अंतरावर करता येते.
पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे. मका पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत
करता येते.
फळबागेचे व्यवस्थापन
नवीन केळी लागवडीसाठी पूर्व
तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत. लागवडीसाठी शासकीय
नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या व लहान केळी,
आंबा व सिताफळ झाडांना काठीने आधार द्यावा.नवीन आंबा लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास
लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच
रोपांची खरेदी करावी. नवीन सिताफळ
लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत.
लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.
भाजीपाला
भाजीपाल्याचे बी टाकलेल्या गादी
वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार
असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक राहून तुरळक
ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार
असलेल्या भाजीपाला पिकाची लवकरात लवकर
काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना आधार द्यावा.
फुलशेती
फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी
वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार
असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. तुरळक
ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून पावसाची शक्यता
असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
गाई म्हशींमध्ये घटसर्प व फऱ्या
आणि शेळ्या, मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराची लस टोचून घेणे. वादळी वारा, मेघगर्जना,
विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या
पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास
खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती
अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू
होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.
सामुदायिक विज्ञान
शेतात कामे करतांना संपूर्ण हात,
पाय, मान, सुती कापडाने झाकलेले ठेवावे अन्यथा कडक उनहामूळे त्वचा भाजली जाते.
कृषि अभियांत्रिकी
शंखी गोगलगायीच्या
व्यवस्थापनासाठी हंगामातील पहिला पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या
मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा
चूना टाकून नष्ट कराव्यात.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 22/2024
- 2025 शुक्रवार, दिनांक
– 14.06.2024
No comments:
Post a Comment