प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 30 व 31 जुलै
रोजी तूरळक ठिकाणी तर दिनांक 01 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 2 ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली, परभणी व जालना जिल्हयात तर
दिनांक 03 ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, बीड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.)
राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 3 ऑगस्ट रोजी
छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा
कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार स्वरूपाच्या
पावसाची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 02 ते 08 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 04 ते 10 ऑगस्ट 2024 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल
तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
संदेश :
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेला पावसाचा अंदाज पाहता पिकात
पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची
व्यवस्था करावी तसेच पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करून घ्यावे व
खतमात्रा दिली नसल्यास द्यावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस पिकात आकस्मिक मर दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 200
ग्रॅम यूरिया + 100 ग्रॅम पांढरा पोटॅश (00:00:50 खत) + 25 ग्रॅम कॉपर
ऑक्सीक्लोराइड प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून तयार द्रावण प्रति झाड 100 मिली याप्रमाणात आळवणी करावी. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5%
निंबोळी अर्काची किंवा ॲसिटामॅप्रिड 20 % 2 ग्रॅम प्रति 10
लिटर किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम
प्रति एकर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस
पिकाची लागवड करून एक महिना झाला असल्यास कोरडवाहू कापसास 31
किलो नत्र प्रति हेक्टरी तर बागायती कापूस पिकास 52 किलो
नत्र प्रति हेक्टरी वरखताची मात्रा द्यावी. कापूस, तूर, मुग/उडीद व मका पिकात पाणी
साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
कापूस पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. सूक्ष्म
अन्नद्रव्याच्या कमतरतेमूळे तूर पिक पिवळे दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 @ 50 ग्रॅम किंवा 50 मिली +
19:19:19 खत 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी
करावी. तूर पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत
ठेवावे. मूग/उडीद पिकात जमिनीत वापसा
असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. मूग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादूर्भाव दिसून
येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची
पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मका पिकाची
पेरणी करून 30 दिवस झाले असल्यास 75 किलो नत्राचा दूसरा हप्ता देण्यात यावा. मका
पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. मका
पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम
किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील
किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना
किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता
घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. केळी बागेतील रोगग्रस्त पाने
काढून टाकावीत. केळी बागेस 50 ग्रॅम यूरिया प्रति झाड खतमात्रा द्यावी. केळी बागेत
किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 4
ते 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. आंबा फळ
बागेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 4 ते 5 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. द्राक्ष बागेतील
रोगग्रस्त पानाची विरळणी करून घ्यावी. द्राक्ष बागेत मर व बुरशीजन्य रोगाच्या
व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम + कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सिताफळ बागेत मर व बुरशीजन्य
रोगाच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम + कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10
लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सिताफळ बागेस 62.5 ग्रॅम
नत्र प्रति झाड खताची मात्रा द्यावी.
भाजीपाला
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात
जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. भाजीपाला
पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा
निचरा करावा. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले
असल्यास जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड
करावी.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकात जमिनीत वापसा
असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. फुलपिकात पाणी साचून राहणार
नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. जमिनीत ओलावा
असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी.
पशुधन व्यवस्थापन
जनावरांना पिण्यास शुध्द व स्वच्द पाणी द्यावे. पावसामूळे चरण्यासाठी गवत
सर्वत्र उपलब्ध होत आहे. गवत प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यामूळे रवंथ करणाऱ्या
पशुधनामध्ये “पोटफुगी” संभवते. यासाठी टरपेंटाईन तेल 50 मिली + गोडतेल 200 मिली
गाय व म्हशींमध्ये तोंडाद्वारे पाजावे. शेळी व मेंढीमध्ये याचे प्रमाण 25 मिली + 100 मिली एवढे असावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 35/ 2024- 2025 मंगळवार, दिनांक – 30.07.2024