प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील तीन दिवसात
तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 05 व 06
जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 06
जुलै रोजी नांदेड व हिंगोली
जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक
(ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 05 ते 11 जूलै दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 07 ते 13 जूलै 2024 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा
जास्त, कमाल तापमान
व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी
योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास (परभणी जिल्हा : पूर्णा ; लातूर जिल्हा : जळकोट ; नांदेड जिल्हा : नांदेड, बिलोली, हदगाव, देगलूर, नायगाव) शेतकऱ्यांनी
पेरणीची घाई करू नये. इतर तालूक्यात पेरणी करण्यास हरकत नाही.
संदेश :
मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75
ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि
मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या कापूस पिकात विरळणी व तूट भरून काढणे
ही कामे करून घ्यावीत. कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. कापूस
पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति
एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत
असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा ॲसिटामॅप्रिड
20 % 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड
बघून फवारणी करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या तूर, मुग/उडीद, भुईमूग व
मका पिकात विरळणी व नांग्या भरणे ही कामे करून घ्यावीत. पिकात अंतरमशागतीची कामे
करून घ्यावीत.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेत तण नियंत्रण करावे. केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत
अतिरिक्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत शंखी
गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम
पसरून टाकावे. आंबा बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. द्राक्ष
बागेतील फुटवे काढावेत. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पानाची विरळणी करून घ्यावी. द्राक्ष
बागेमध्ये शेंडा खूडून घ्यावा. सिताफळ बागेत तण नियंत्रण करावे.
भाजीपाला
पाऊस झालेल्या
ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी,
कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर तयार
केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी
जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस
तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
पाउस झालेल्या
ठिकाणी जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून
फुल पिकाची पूर्नलागवड करावी. काढणीस तयार
असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळयात ढगाळ
व दमट वातावरणामूळे बाह्य परोपजिवी उदा. माशा, पिसवा, डास यांचा प्रादूर्भाव
वाढतो. याच्या व्यवस्थापनासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या साहाय्याने उपाययोजना
कराव्यात.
कृषि अभियांत्रिकी
शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व
शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या
पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात. कापूस पिकामध्ये
शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या
प्रमाणात शेतात पसरून द्यावे. केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत शंखी
गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम
पसरून टाकावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 27/ 2024- 2025 मंगळवार, दिनांक – 02.07.2024
No comments:
Post a Comment