हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी
नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक 12 ऑक्टोबर रोजी छत्रपती
संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट,
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 13 ते 15 ऑक्टोबर दरम्यान तूरळक ठिकाणी
हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल
तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 2 ते 3 अं.सं. ने हळूहळू वाढ
होण्याची तर पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 11 ते 17 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा
जास्त व तापमान
सरासरीपेक्षा कमी तर दिनांक 18 ते 24
ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त व तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता
आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
संदेश : प्रादेशिक
हवामान केंद्र, मुंबई येथून
प्राप्त झालेला पावसाच्या अंदाज पाहता ज्या शेतकऱ्यांनी पिकाची काढणी केली असल्यास
काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. फवारणीची कामे पावसाची उघाड
बघून करावीत. बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामूळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व
फुलपिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या सोयाबीन
पिकाची काढणी लवकरात लवकर करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी. ऊस
पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस
20 % 25 मिली किंवा
क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस
पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी
डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव
दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25%
20 मिली किंवा डायमिथोएट 30
% 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ
शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत. हळदीच्या
पानावरील ठिपके / करपा रोग याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल
11.4% (पुर्वमिश्रित
बुरशीनाशक) 10 मिली
+ 5 मिली स्टीकरसह प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. जमिनीत ओलावा असल्यास हरभरा
पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. पेरणी 30X10 सेंमी अंतरावर करावी.
पेरणीसाठी लहान आकाराच्या देशी वाणासाठी 60 किलो, मध्यम आकाराचे बियाणे 70 किलो तर
टपोरे दाण्याच्या काबूली वाणासाठी 100 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. हरभरा
पिकाच्या पेरणीसाठी बीडीएनजी-9-3, बीडीएनजी-797 (आकाश), दिग्विजय, जाकी-9218,
साकी-9516, फुले विक्रम, फुले विक्रांत, पीडीकेव्ही कांचन, विश्वास इत्यादी
वाणांपैकी निवड करावी. जमिनीत
ओलावा असल्यास करडई पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. पेरणी 45X20 सेंमी अंतरावर करावी.
पेरणीसाठी हेक्टरी 10 ते 12 किलो बियाणे वापरावे. करडई पिकाच्या पेरणीसाठी शारदा,
परभणी कुसुम (परभणी-12), पूर्णा (परभणी-86), परभणी-40 (निम काटेरी), अन्नेगीरी-1,
एकेएस-327, एसएसएफ-708,आयएसएफ-764 इत्यादी वाणांपैकी निवड करावी. गहू पिकाच्या उत्तम वाढीसाठी
सुपिक जमिन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 असावा. कोरडवाहू गव्हाच्या
लागवडीसाठी ओलावा टिकवून ठेवणाऱ्या
जमिनीची निवड करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी
00:00:50 10 ग्रॅम + जिब्रॅलिक ॲसिड 10 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची
उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बागेत
फळवाढीसाठी 00:00:50 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. चिकू बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घेऊन बागेस आवश्यकतेनूसार
पाणी व्यवस्थापन करावे.
भाजीपाला
भाजीपाला (मिरची, वांगे व
भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10
मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकात खूरपणी करून तण नियंत्रण
करावे. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाटाने
पाणी द्यावे.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून तण
नियंत्रण करावे. फुल पिकास आवश्यकतेनूसार
पाटाने पाणी द्यावे.
तुती रेशीम उद्योग
किटकनाशक, तणनाशक, बुरशीनाशक
किंवा रासायनिक खत या चारही प्रकारच्या निविष्ठा रेशीम शेतीमध्ये चालत नाहीत. ज्या
शेतामध्ये मिरची किंवा तंबाखूचे पीक असेल तेथे तुती लागवड करू नये. रेशीम किटक
चौथ्या किंवा पाचव्या अवस्थेत मृत पावण्याचे हेच कारण होय. शेजाऱ्याने किटकनाशक
फवारणी केली तरीही रेशीम किटकांवर परिणाम होतो. तेव्हा 20 मे.टन शेणखत/हेक्टर
किंवा 5 टन गांडूळ खत/हेक्टर या प्रमाणात रेशीम शेतीमध्ये तुती लागवडीसाठी वापरणे
गरजेचे आहे. निव्वळ रासायनिक खत वापरून वाढवलेल्या तुती बागेतील पानात रसायण अंश
येत असल्याने अळ्या मृत पावतात.
पशुधन व्यवस्थापन
तापमानात वाढ झाल्यामूळे,
जनावरांना सावलीत किंवा गोठ्यामध्ये बांधावे. गोठ्यात मुबलक प्रमाणात पिण्याचे
पाणी ठेवावे, तसेच जनावरांना शक्यतो हिरवा चारा, मिनरल मिक्सर जिवनसत्वे व
त्याचसोबत पाण्यातून खायचे मिठ द्यावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 56/2024
- 2025 शुक्रवार, दिनांक
– 11.10.2024
No comments:
Post a Comment