हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे
राहण्याची शक्यता आहे तर दिनांक 14 व 15 नोव्हेंबर रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक
ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात
फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता
आहे. पुढील दोन दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंरत
हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात
दिनांक 15 ते 21 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा
कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व दक्षिण भागात किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा
जास्त तर इतर भागात सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व दिनांक 22 ते 28 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी,
कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची
शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
संदेश : पुढील पाच
दिवस हवामन कोरडे राहण्याची शक्यता असल्यामूळे व बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला
असल्यामूळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन
करावे. लवकर पेरणी
केलेल्या रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के
4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत
असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पूर्व हंगामी ऊसाची लागवड लवकरात
लवकर संपवावी. ऊस लागवड करतांना 30 किलो नत्र, 85 किलो स्फुरद व 85 किलो पालाश
(327 किलो 10:26:26 किंवा 185 किलो
डायअमोनियम फॉस्फेट + 142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा 65 किलो युरिया + 531 किलो सिंगल सुपर फॉस्फेट +
142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी. ऊस पिकावर खोड किडीचा
प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे,
याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव
दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25%
20 मिली किंवा डायमिथोएट 30
% 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. (हळद
पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत
संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत. हळदीच्या
पानावरील ठिपके / करपा रोग याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल
11.4% (पुर्वमिश्रित
बुरशीनाशक) 10 मिली
+ 5 मिली स्टीकरसह प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन
करावे. जोमदार वाढीसाठी हरभरा पिक
सुरुवातीपासूनच तण विरहीत ठेवणे आवश्यक आहे. पिक 20 ते 25 दिवसाचे असतांना पहिली
कोळपणी करावी. करडई पिकात उगवणीनंतर 10
ते 15 दिवसांनी विरळणी करावी व दोन
रोपातील अंतर 20 सेंमी ठेवावे. बागायती करडई पिकाची पेरणी 15 नोव्हेंबर पर्यंत करता येते. पेरणी 45 X 20 सेंमी अंतरावर करावी. बागायती
करडई साठी शिफारशीत खतमात्रा 60:40:00 पैकी पेरणीच्या वेळी 30 किलो नत्र व 40 किलो
स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे व 30 किलो
नत्र एक महिन्यानी द्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी
जिब्रॅलिक ॲसिड (15 पीपीएम) 1.5 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व
आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. डाळींब बागेत फळवाढीसाठी जिब्रॅलिक ॲसिड (15 पीपीएम) 1.5 ग्रॅम प्रति 100
लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण
नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण
नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
भाजीपाला
रब्बी हंगामात भाजीपाला पिकाचे
गादी वाफे व लागवड केलेला भाजीपाला पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावेत व
आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची (वांगी,
भेंडी, टोमॅटो) पिकाची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
लांब दांड्यांच्या फुलाची
(गुलाब) काढणी करतांना कळी उमलण्याच्या अवस्थेत असतांना काढणी करावी तर झेंडू,
ॲस्टर व गलांडा या सारख्या फुलांची काढणी पूर्ण उमलल्याच्या नंतर तर निशीगंधा
मध्ये खुल्या फुलांसाठी अर्धी कळी उमगल्यावर काढणी करावी. फुल पिकात खूरपणी करून
तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे.
तुती रेशीम उद्योग
कर्नाटक, आंध्रप्रदेश या दक्षिणात्य
राज्यांना जवळ समुद्रामुळे परतीच्या पावसाचा फायदा होतो. तुती लागवडी साठी आणि
वातावरणात आर्द्रता मर्यादित ठेवण्यासाठी पण त्या तुलनेत उत्तर कर्नाटक व महाराष्ट्र
राज्यात हवामान उष्ण व कोरडे आहे. पहिल्या व दुसऱ्या रेशीम किटक वाढीच्या अवस्थेत
28 अं.से. तापमान व 85 टक्के आर्द्रता महाराष्ट्र राज्यात मर्यादित राहत नाही. त्यासाठी
तुती पाने तोडणी थंड वेळेत करावी व साठवणीसाठी लिफ चेंबरचा वापर करावा. त्यावर गोणपाट
अच्छादन करून सतत पाण्याचा छिडकाव करावा म्हणजे फांद्याखाद्य सुकनार नाही. या उलट
10 टक्के जरी तुती पाने सुकली तरी किटकांना खाता येत नाहीत. हिवाळ्यात तापमान 20
अं.से. च्या खाली गेल्यावर रूम हिटर किंवा कोळशाच्या शेगडीचा वापर करावा. पण संगोपन
गृहात धूर होनार नाही याची काळजी घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण
करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे,
त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या
शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात
बांधावेत.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 66/2024
- 2025 गुरूवार, दिनांक
– 14.11.2024
No comments:
Post a Comment