Monday, 9 December 2024

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची तर किमान तापमानात पुढील चोवीस तासात फारशी तफावत जाणवनार नाही त्यानंतर पुढील दोन दिवसात किंचित घट होण्याची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच  दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची तर किमान तापमानात पुढील चोवीस तासात फारशी तफावत जाणवनार नाही त्यानंतर पुढील दोन दिवसात किंचित घट होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 13 ते 19 डिसेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

संदेश : सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे पिकावर किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी किटकनाशकाची फवारणी करावी तसेच पिकात, फळबागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही. पहिल्या आणि दूसऱ्या वेचणीचा चांगला आणि कवडी कापूस वेगळा साठवावा. ढगाळ वातावरणामूळे तूरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा व शेंग माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, अळीची आर्थिक नूकसानीची पातळी कळण्यासाठी प्रति एकरी दोन कामगंध सापळे लावावेत तसेच शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे पक्षी थांबे लावावेत. शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.4 ग्रॅम  किंवा स्पिनोसॅड 45% 3 मिली किंवा इंडाक्झाकार्ब 14.5% 8 मिली किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेंग माशीच्या व्यवस्थापनासाठी लॅमडा सायहॅलोथ्रीन 5%  8 मिली किंवा ल्युफेन्यूरॉन 5.4% 12 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकाची पेरणी करून 30 दिवस झाले असल्यास नत्राची अर्धी मात्रा 87 किलो यूरिया प्रति हेक्टरी द्यावा. रब्बी ज्वारी पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. बागायती गहू उशीरा पेरणी 15 डिसेंबर पर्यंत करता येते. ‍वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकास राहिलेले अर्धे नत्र 109 किलो यूरिया प्रति हेक्टरी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी देऊन आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेस पोटॅश 50 ग्रॅम प्रति झाड खतमात्रा द्यावी. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल 10% ईसी 10 मिली किंवा मेटीराम 55% + पायरॅक्लोस्ट्रोबीन 5% डब्ल्यू जी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंबा बागेत फुलधारणा व्यवस्थित होण्यासाठी 00:52:34 विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्राक्ष घड जिब्रॅलिक ॲसिड 20 मिली प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात बूडवावेत. द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

भाजीपाला

मागील काही दिवसात ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची व गवार पिकावर पावडरी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्यूटॅनिल 10% डब्ल्यूपी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधता गोठ्यात बांधावेत.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक73/ 2024- 2025    मंगळवार, दिनांक – 10.12.2024

 

 

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 18 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात, दिनांक 19 जून रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात, दिनांक 20 जून रोजी नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात, तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 17 ते 21 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...