हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश
स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात
कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची शक्यता
आहे. पुढील तीन ते चार दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर
मराठवाड्याच्या दक्षिण भागात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 07 ते 13 मार्च 2025 दरम्यान पाऊस
सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त व किमान
तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
संदेश : पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे. कापूस पिकाच्या पऱ्हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून
गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात घट पडेल.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि
मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या रब्बी
ज्वारी पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या
बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज
लक्षात घेता, उशीरा पेरणी केलेल्या गहू पिकास दाणे भरताना (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. गव्हाच्या
पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग
गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद
करावीत. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी करून
घ्यावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच
पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, मका पिकास आवश्यकतेनूसार
पाणी द्यावे. उशीरा पेरणी केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत
असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.
फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. वेळेवर पेरणी
केलेल्या व काढणीस तयार असलेल्या मका पिकाची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात
झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या
कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार
तुषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या
किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड
18.8% 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली
यापैकी एका किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे
तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, केळी, आंबा व
द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत तण व्यवस्थापन
करावे व बोधांना माती लावावी. आंबा बागेत वटाणा व सुपारीच्या आकाराच्या आंबा
फळांची गळ दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी बागेत एनएए 15 पीपीएम ची फवारणी
करावी. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात खूरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे. काढणीस
तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात झालेली
वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरडया
हवामानाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड व पूर्नलागवड केलेल्या रोपांना
आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व कमाल तापमानात
झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या
कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस
तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजार पेठेत पाठवावी.
पशुधन व्यवस्थापन
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमूळे, जनावरांना सावलीत बांधावे
आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण
करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे व गोठयातील तापमाना कमी
करण्यासाठी गोठ्याच्या छतास असणारे पत्रे ओले करण्यासाठी ठिबक सिंचन पाईपचा वापर करावा.
पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य
द्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 97/ 2024- 2025 मंगळवार, दिनांक – 04.03.2025
No comments:
Post a Comment