हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 25 व 29 मार्च रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी
हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल
तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. वाढ होण्याची तर पुढील तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते
3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर मराठवाडयाच्या दक्षिण भागात हळूहळू वाढ होण्याची शक्यता
आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 28 मार्च ते 03
एप्रिल 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते
सरासरीपेक्षा किंचित कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची
शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
संदेश : पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुलपिकास आवश्यकतेनूसार पाणी
द्यावे. कापूस पिकाच्या पऱ्हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून
गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात घट पडेल.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
रब्बी ज्वारी पिकाची मळणी केली नसल्यास मळणी करून मळणी केलेला माल
उन्हात वाळवून साठवणूक करावी. काढणीस तयार
असलेल्या गहू पिकाची काढणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणी
केलेला माल उन्हात वाळवून साठवणूक करावी. मका
पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत
असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून
फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी
करावी. काढणीस तयार असलेल्या मका पिकाची काढणी करून घ्यावी. उन्हाळी
भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. उन्हाळी
भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 18.8% 2 मिली किंवा
क्विनॉलफॉस 25% 20 मिली यापैकी एका किटकनाशकाची प्रति 10
लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेस आवश्यकतेनूसार सरी वरंब्याने पाणी द्यावे. जमिनीतील
ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या
आळयात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या केळीच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण
करण्यासाठी रोपांना सावली करावी. आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा
फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या आंब्याच्या रोपांचे
उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. आंबा बागेत 00:00:50 15 ग्रॅम
प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या
द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक
करावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात खूरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे. काढणीस
तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी. नविन लागवड व पूर्नलागवड
केलेल्या रोपांना आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. भाजीपाला ( मिरची, वांगे व
भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार
पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजार पेठेत पाठवावी.
पशुधन व्यवस्थापन
आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका (निदान तिव्र उन्हाच्या
कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले).
पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन वेळेस पाजावे. पाण्यामुळे पशुंच्या
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन) होणार नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार
द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम क्षार मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या
पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 103/ 2024- 2025 मंगळवार, दिनांक – 25.03.2025
No comments:
Post a Comment