Tuesday, 3 June 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 04 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात, दिनांक 06 जून रोजी लातूर, धाराशिव व बीड जिल्हयात तर दिनांक 07 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 05 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची तर पुढील पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही. पुढील पाच दिवसात मराठवाडयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 04 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात, दिनांक 06 जून रोजी लातूर, धाराशिव व बीड जिल्हयात तर दिनांक 07 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 05 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची तर पुढील पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही. पुढील पाच दिवसात मराठवाडयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक  06 ते 12 जून 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.

संदेश : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात पाऊस हा सरासरीपेक्षा कमी असल्यामूळे, शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. जमिनित वापसा असतांना पूर्व मशागतीची कामे राहिली असल्यास पूर्व मशागतीची कामे करून घ्यावीत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

पूर्वमशागतीची कामे राहिली असल्यास पूर्वमशागतीची कामे करून घ्यावीत. बीटी कपाशीमध्ये कापूस + तूर (4-6:1 किंवा 6-8:2), कापूस + सोयाबीन (1:1), कापूस + मूग (1:1) रुंद ओळींमध्ये कापूस + मूग (1:2), कापूस + उडीद (1:1) ही आंतरपीक पध्दती घेतल्यास फायदेशीर ठरते. कापूस  पिकाच्या लागवडीसाठी वाण  निवडताना जमिन व हवामान, कोरडवाहू  किंवा बागायती, लागवडीचा प्रकार व वाणांचे गुणधर्म यांचा  विचार करून वाणांची निवड करावी. पूर्वमशागतीची कामे राहिली असल्यास पूर्वमशागतीची कामे करून घ्यावीत. तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेचे जमिनीची उत्पादकता राखण्यासाठी तुर + बाजरी (2:4), तुर + सोयाबीन/मुग/उडीद (1:2 किंवा 2:4) असे ओळीचे प्रमाण ठेवून फायदेशीर आंतरपीक पध्दतीचा वापर केल्यास अधिक फायदा होतो. तुर पिकाच्या पेरणीसाठी बीडीएन-2013-41(गोदावरी), बीडीएन-711, बीएसएमआर-736, बीएसएमआर-853 (वैशाली), बीडीएन-716,  बीडीएन-2, बीडीएन-708 (अमोल), एकेटी 8811, पीकेव्ही तारा किंवा आयसीपीएल 87119 इत्यादी वाणांचा वापर करावा. पावसाळ्यात तूर पिकावरील फायटोप्थोरा करपा टाळण्यासाठी, शेताच्या चारी बाजूस तीन फूट खोल आणि दोन फूट रुंद चर काढावी जेणे करून अतिवृष्टी मध्ये शेतातील मातीची धूप होणार नाही व पिकाचे मुळे सडणार नाहीत. तसेच पुढे चरातील पाणी पाऊस ओसरल्यावर शेतातील पिकास परत कामी येईल. पूर्वमशागतीची कामे राहिली असल्यास पूर्वमशागतीची कामे करून घ्यावीत. आंतरपीक म्हणून मुग/उडीद या पिकांना ‍विशेष महत्व प्राप्त आहे, ते या पिकांच्या कालावधीमुळे, हे दोन्हीही पिके तुर, ज्वारी, कपाशीत आंतरपीक म्हणून घेता येतात.  मुग पेरणीसाठी कोपरगाव, बीएम-4, बीपीएमआर-145, बीएम-2002-1, बीएम-2003-2, फुले मुग 2, पी.के.व्ही.ए.के.एम 4 इत्यादी वाणांचा वापर करावा तर उडीद  लागवडीसाठी बीडीयु-1, टीएयू-1, टीपीयू-4 इत्यादी वाणांचा वापर करावा. पूर्वमशागतीची कामे राहिली असल्यास पूर्वमशागतीची कामे करून घ्यावीत. भुईमूग पिकात भूईमूग + तूर (4:2) किंवा भुईमूग + तीळ (4:2) किंवा भूईमूग + एरंडी (4:1) याप्रमाणे आंतरपीक घ्यावे. भुईमूग  पिकाच्या लागवडीसाठी एसबी-11, जेएल-24, एलजीएन-2 (मांजरा), टीएजी-24, टीजी-26, टीएलजी-45, एलजीएन-1, एलजीएन-123  इत्यादी वाणांचा वापर करावा. पूर्वमशागतीची कामे राहिली असल्यास पूर्वमशागतीची कामे करून घ्यावीत. मका  पिकात मका + तूर (4:2) किंवा मका + उडीद (2:1) या प्रमाणे आंतरपीक घ्यावे. मका  पिकाच्या पेरणीसाठी नवज्योत, मांजरा, डीएमएच-107, केएच-9451, एमएचएच, प्रभात, करवीर, जेके-2492, महाराजा, यूवराज इत्यादी वाणांचा वापर करावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नवीन केळी लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. केळीच्या घडांना काठीचा आधार द्यावा. नवीन आंबा लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत व रोगनाशकाची फवारणी करावी. द्राक्ष बागेतील अतिरिक्त बगल फुटी काढून घ्याव्यात जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश डोळ्यावर पडलयास डोळा फुटण्यास मदत होते. नवीन सिताफळ लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.

भाजीपाला

खरीप हंगामात भाजीपाला लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी. काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करावी.

फुलशेती

खरीप हंगामात फुलपिकाच्या लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

अचानक वातावरणात झालेल्या बदलामूळे वातावरण ओलसर व दमट झाले असून जनावरात रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते त्यामूळे जनावरांचे आरोग्य उत्तम व निरोगबी ठेवण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात : 1. जनावरे निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी 2. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये. 3. पावसाळ्यात गोठयत पाणी साचनार नाही व गोठा ओलसर राहणार नाही याची काळजी घ्यावी.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक19/2025- 2026    मंगळवार, दिनांक – 03.06.2025

 

 

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 19 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, परभणी,नांदेड व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे तर लातूर जिल्हयात वादळी वारासह मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 20 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, परभणी व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर इतर जिल्ह्यात हलक्या पाऊसाची शक्यता आहे. दिनांक 21 ते 23 ऑगस्ट कालावधीत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पाऊसाची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...