हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 जुलै
रोजी जालना व परभणी जिल्हयात तर दिनांक 12 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना
जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 13 ते 15 जूलै दरम्यान आकाश
अंशत: ढगाळ ते ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात
पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची तर किमान
तापमानात पुढील चार ते पाच दिवसात फारशी तफावत जाणवनार नाही.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 11 ते 17 जुलै,
2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा
कमी, कमाल
तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे व दिनांक 18 ते 24 जुलै 2025 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे
राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.
संदेश : पेरणी न
झालेल्या भागात शेतकऱी बांधवांनी पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच
खरीप पिकांची बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. सर्वसाधारणपणे 15 जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची (मूग, उडीद, भुईमूग व खरीप ज्वारी सोडून) पेरणी करता येते.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया
करूनच सोयाबीन पिकाची पेरणी करावी. सोयाबीन पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. वेळेवर पेरणी केलेल्या
सोयाबीन पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. सोयाबीन पिकात खोड
माशी व उंट अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी
प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इथिऑन 50% 600मिली किंवा थायामिथॉक्झाम
12.6% + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 9.5% (पूर्वमिश्रित
किटकनाशक) 50 मिली किंवा प्रादूर्भाव खूप जास्त असल्यास क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5%
60 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक पाऊसाने उघाड दिल्यास
फवारावे. सोयाबीन पिक पेरणी करून 20 दिवस झाले असल्यास तणांच्या व्यवस्थापनासाठी
इमॅझोमॅक्स 35% + इमीझीथीपायर 35% 2 ग्रॅम
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारवे. सोयाबीन पिकास
पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे. खरीप ज्वारी पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. खरीप
ज्वारी पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी
द्यावे. पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी)
झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच बाजरी पिकाची पेरणी करावी. बाजरी
पिकाची पेरणी 30 जुलैपर्यंत करता येते. बाजरी पिकात
अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. बाजरी पिकास पाण्याचा ताण
बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे. उस
पिकात पांढरी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी, लिकॅनीसिलियम
लिकॅनी या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रासायनिक कीटकनाशकामध्ये
क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली किंवा ॲसीफेट 75 % 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. इमिडाक्लोपीड 17.8% कीटकनाशकासोबत 2 टक्के युरिया (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) मिसळून पावसाची
उघाड बघून फवारणी करावी. ऊस पिकास पाण्याचा ताण
बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे. हळदीमध्ये
आंतरपीके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची
आंतरपीके निवडावीत. यामध्ये पालेभाज्या सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा. हळद पिकास
पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत पाण्याचा
ताण बसणार नाही याची दक्षत घ्यावी व आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. संत्रा
नविन बाग लागवडीसाठी नागपूर संत्रा, किन्नो तर मोसंबी नविन बाग लागवडीसाठी
न्यूसेलर, सातगुडी व फुले मोसंबी इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय
नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. अंबे बहार
संत्रा/मोसंबी बागेत कीटकनाशकाची फवारणी पावसाची उघाड बघून करावी. मृग बहार
डाळींब बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षत घ्यावी व आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे. डाळींब नविन बाग लागवडीसाठी भगवा, फुले भगवा सुपर, गणेश, फुले
आरक्ता, इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच
रोपांची खरेदी करावी. चिकू नविन बाग लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेट बॉल इत्यादी जातींची
निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. चिकू बागेत आवश्यकतेनूसार
पाणी व्यवस्थापन करावे.
भाजीपाला
पाण्याची उपलब्धता असल्यास भाजीपाला (वांगी, मिरची, टोमॅटो
इत्यादी) पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. भाजीपाल्याचे बी
टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या
साहाय्याने पाणी द्यावे. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना
45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची
(वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा
बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका
ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची
काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव
असल्यास 10 किलो) प्रति एकर जमिनीतून
वापर करावा. भाजीपाला पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास
उपलब्धतेनूसार पाणी द्यावे.
फुलशेती
पाण्याची उपलब्धता असल्यास फुल पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी
वाफ्यावर बी टाकावे. फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण
करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. पाउस झालेल्या
ठिकाणी जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून
फुल पिकाची पूर्नलागवड करावी. काढणीस तयार
असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी
करून घ्यावी. फुल पिकास पाण्याचा ताण
बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे.
तुती रेशीम उद्योग
चिन देशाच्या तुलनेत भारतात वर्षाकाठी रेशीम कोषाची सरासरी निम्मी
पिके म्हणजे 4-5 पिके घेतली जातात याउलट चिन देशात वर्षाला कोषाची 10 ते 12 पिके
घेतली जातात. प्रती एकर प्रती पिक चिन देशात 250 ते 300 अंडीपूजाचे एक पीक तर
भारतात 1550 ते 200 अंडीपूज सरासरी घेतले जातात. जागतीक कच्च्या रेशीम उत्पादनात
सातत्याने चिन देश प्रथम क्रमांकावर आहे. भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रेशीम
उद्योगात भारत देशात 8.9 दशलक्ष लोकांना रोजगार उपलब्ध होतो तर चिन देशात फक्त 1
दशलक्ष लोक हे रेशीम उद्योगाचे कार्य करत आहेत. चिन देशाच्या तुलनेत आपल्या
शेतकऱ्यांनी तुती पानाची प्रत आणि रेशीम किटक संगोपन तंत्रज्ञान सुधारणा करणे
गरजेचे आहे तरच जागतीक स्पर्धेत राहता येईल.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळयात पशुचे खाद्य नियोजन व्यवस्थित ठेवावे व जनावरांचे खाद्य
स्वच्छ व कोरडे असावे. जनावरांच्या गोठयात जिवजंतूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता
आहे. त्यासाठी वेगवेगळया आजाराच्या विशेष संसर्गजन्य आजार प्रतिबंधक लसीकरण
पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने वेळेवर करून घ्यावे. पावसाळ्यामध्ये जनावरांना
खाद्यातून ताजा, हिरवा, कोवळा चारा विशेष शेळींना जास्त प्रमाणात देणे टाळावे,
कोवळा चाऱ्यास एक तरी उन्हाचा चटका/उन दाखवूनच आहारात देणे गरजेचे आहे. ज्यामूळे
अंग विषार, हगवण या आजारांना शेळी, इतर जनावरे बळी पडणार नाहीत.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 30/2025
- 2026 शुक्रवार, दिनांक
– 11.07.2025
No comments:
Post a Comment