हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 25 जुलै रोजी परभणी, नांदेड, हिंगोली व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी
वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40
कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 26 जुलै रोजी हिंगोली, नांदेड,
परभणी व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक
(ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मूसळधार ते खूप
मूसळधार पावसाची शक्यता आहे तर छत्रपती संभाजी नगर व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी
वादळी वाऱ्यासह मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 25 जुलै रोजी छत्रपती संभाजी
नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
आहे. मराठवाडयात दिनांक 25 व 26 जुलै रोजी
बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 27 जुलै रोजी काही ठिकाणी तर दिनांक
28 व 29 जुलै रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात
पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. घट होण्याची तर किमान
तापमानात पुढील चार ते पाच दिवसात फारशी तफावत जाणवनार नाही.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 25 ते 31 जुलै, 2025 दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासीएवढे ते
सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त व दिनांक 01 ते 07 ऑगस्ट, 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते
सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची
शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.
संदेश : प्रादेशिक
हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्याय अंदाजानूसार पुढील दोन दिवसात
मराठवाडयात तूरळक ठिकाणी मूसळधार ते खूप मूसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता, फवारणी
व खतमात्रा देण्याची कामे दोन दिवस पुढे ढकलावीत व दोन दिवसानंतर पावसाची उघाड व
जमिनीत वापसा असतांना करावीत. पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुलशेती पिकात अतिरिक्त
पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन, खरीप ज्वारी, बाजरी, ऊस व हळद पिकात अतिरिक्त पाणी साचणार
नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. जमिनीत वापसा असतांना सोयाबीन,
खरीप ज्वारी, बाजरी, ऊस व हळद पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. सोयाबीन
पिकात पाने खाणाऱ्या अळ्या व घाटेअळी (उंट अळी)चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास,
याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 50% ईसी 20 मिली किंवा लॅम्बडा
सायहॅलोथ्रीन 4.90 % सीएस 6 मिली किंवा इंडोक्झकार्ब 15.80 %
ईसी 7 मिली प्रति 10 लिटर पाणी यापैकी कुठलेही एक किटकनाशक पाऊसाने उघाड
दिल्यास फवारावे. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमूळे सोयाबीन पिक पिवळे दिसून येत
असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड
बघुन फवारणी करावी. सोयाबीन पिकात पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास,
याच्या व्यवस्थापनासाठी एकरी 10 पिवळे चिकट सापळे पिकाच्या उंचीच्या वर लावावेत. सोयाबीन
पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भाव ग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. सोयाबीन पिकावरील
पिवळा मोझॅकच्या व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम 12.6% + लॅम्बडा
सिहॅलोथ्रीन 9.6% झेड सी 50 मिली किंवा ॲसिटामिप्रिड 25%
+ बाइफेन्थ्रीन 25% डब्ल्यू जी 100 ग्रॅम
किंवा बीटा साइफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81%
ओडी 140 मिली प्रति एकर यापैकी एका किटकनाशकाची पावसाची उघाड बघून
याप्रमाणे फवारणी करावी. खरीप ज्वारी पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास
उर्वरीत खतमात्रा जमिनीत वापसा असतांना द्यावी. बाजरी पिकाची पेरणी करून एक महिना
झाला असल्यास उर्वरीत खतमात्रा जमिनीत वापसा असतांना द्यावी. उस पिकात पांढरी
माशीचा व पाकोळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी, लिकॅनीसिलियम
लिकॅनी या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. रासायनिक
कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली किंवा ॲसीफेट 75 % 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारावे. इमिडाक्लोपीड 17.8% कीटकनाशकासोबत 2 टक्के युरिया (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस पिकात पोक्का बोइंग या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी 50 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% डब्ल्यू
पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह पावसाची उघाड बघून 10 ते 12
दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात. हळद पिकास 25 किलो नत्र प्रति
हेक्टरी सूक्ष्म सिंचन पध्दतीने तीन ते चार वेळा विभागून द्यावे. हळदीवरील
पानावरील ठिपके आणि करपा याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेंडेंझीम 12 % + मॅन्कोझेब 63 % डब्ल्यूपी 25 ग्रॅम प्रति प्रति 10
लिटर पाण्यात स्टीकरसह पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही
याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. जमिनीत वापसा असतांना
संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. अंबे
बहार संत्रा/मोसंबी बागेत रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी कीटकनाशकाची
फवारणी पावसाची उघाड बघून करावी. संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू लागवडीसाठी शासकीय
नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. डाळींब बागेतील अतिरिक्त फुटवे
काढावेत. डाळींब बागेत 00:52:34 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड
बघून फवारणी करावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व
अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. जमिनीत वापसा असतांना भाजीपाला पिकात अंतरमशागतीची
कामे करून तण नियंत्रण करावे. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या
रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून व वापसा असतांना
भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. पाऊस झालेल्या
ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी,
कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड जमिनीत वापसा असतांना करावी. काढणीस
तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व
भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
फुलशेती
फुल पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व
अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. जमिनीत वापसा असतांना फुल पिकात अंतरमशागतीची कामे
करून तण नियंत्रण करावे. पाउस झालेल्या ठिकाणी
जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड जमिनीत वापसा
असतांना करावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.
तुती रेशीम उद्योग
चिन देशाच्या तुलनेत भारतात वर्षाकाठी रेशीम कोषाची सरासरी निम्मी
पिके म्हणजे 4-5 पिके घेतली जातात याउलट चिन देशात वर्षाला कोषाची 10 ते 12 पिके
घेतली जातात. प्रती एकर प्रती पिक चिन देशात 250 ते 300 अंडीपूजाचे एक पीक तर
भारतात 1550 ते 200 अंडीपूज सरासरी घेतले जातात. जागतीक कच्च्या रेशीम उत्पादनात
सातत्याने चिन देश प्रथम क्रमांकावर आहे. भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रेशीम
उद्योगात भारत देशात 8.9 दशलक्ष लोकांना रोजगार उपलब्ध होतो तर चिन देशात फक्त 1
दशलक्ष लोक हे रेशीम उद्योगाचे कार्य करत आहेत. चिन देशाच्या तुलनेत आपल्या
शेतकऱ्यांनी तुती पानाची प्रत आणि रेशीम किटक संगोपन तंत्रज्ञान सुधारणा करणे
गरजेचे आहे तरच जागतीक स्पर्धेत राहता येईल.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळयात पशुचे खाद्य नियोजन व्यवस्थित ठेवावे व जनावरांचे खाद्य
स्वच्छ व कोरडे असावे. जनावरांच्या गोठयात जिवजंतूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता
आहे. त्यासाठी वेगवेगळया आजाराच्या विशेष संसर्गजन्य आजार प्रतिबंधक लसीकरण
पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने वेळेवर करून घ्यावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 34/2025
- 2026 शुक्रवार, दिनांक
– 25.07.2025
No comments:
Post a Comment