Friday, 1 August 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 03 व 05 ऑगस्ट रोजी हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हयात तर दिनांक 04 ऑगस्ट रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 01 ते 04 ऑगस्ट दरम्यान तूरळक ठिकाणी तर दिनांक 05 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात कमाल तापमानात पुढील चार ते पाच दिवसात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 03 व 05 ऑगस्ट रोजी हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हयात तर दिनांक 04 ऑगस्ट रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 01 ते 04 ऑगस्ट दरम्यान तूरळक ठिकाणी तर दिनांक 05 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात कमाल तापमानात पुढील चार ते पाच दिवसात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 01 ते 07 ऑगस्ट, 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीएवढे व दिनांक  08 ते 14 ऑगस्ट, 2025 दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा किंचित जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहे.

संदेश : पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. आवश्यकतेनूसार  पिकात फवारणीची कामे करून घ्यावीत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळ्या व घाटेअळी (उंट अळी)चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 50%  ईसी 20 मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 4.90 % सीएस 6 मिली किंवा इंडोक्झकार्ब 15.80 % ईसी 7 मिली प्रति 10 लिटर पाणी यापैकी कुठलेही एक किटकनाशक फवारावे. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमूळे सोयाबीन पिक पिवळे दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 50 मिली  प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकात पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी एकरी 10 पिवळे चिकट सापळे पिकाच्या उंचीच्या वर लावावेत. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भाव ग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅकच्या व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम 12.6% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन 9.6% झेड सी 50 मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड 25% + बाइफेन्थ्रीन 25% डब्ल्यू जी 100 ग्रॅम किंवा बीटा साइफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% ओडी 140 मिली प्रति एकर यापैकी एका किटकनाशकाची याप्रमाणे फवारणी करावी.

खरीप ज्वारी पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. खरीप ज्वारी पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास उर्वरीत खतमात्रा द्यावी. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

बाजरी पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. बाजरी पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास उर्वरीत खतमात्रा द्यावी.

ऊस पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. उस पिकात पांढरी माशीचा व पाकोळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी, लिकॅनीसिलियम लिकॅनी या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रासायनिक कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली किंवा ॲसीफेट 75 % 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. इमिडाक्लोपीड 17.8% कीटकनाशकासोबत 2 टक्के युरिया (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात पोक्का बोइंग या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी 50 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% डब्ल्यू पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात.

हळद पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. हळद पिकास 25 किलो नत्र प्रति हेक्टरी सूक्ष्म सिंचन पध्दतीने तीन ते चार वेळा विभागून द्यावे. हळद पिकाची लागवड करून 60 दिवस झाले असल्यास 25 किलो नत्रासोबत 00:52:34 15.5 किलो व 00:00:50 5.5 किलो प्रति हेक्टरी सूक्ष्म सिंचन पध्दतीने तीन ते चार वेळा विभागून द्यावे. हळदीवरील पानावरील ठिपके आणि करपा याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेंडेंझीम 12 % + मॅन्कोझेब 63 % डब्ल्यूपी 25 ग्रॅम प्रति प्रति 10 लिटर पाण्यात स्टीकरसह फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार संत्रा/मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत 19:19:19 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 25-30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

डाळींब बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. डाळींब बागेला 19:19:19 खताची मात्रा सूक्ष्म सिंचनाद्वारे द्यावे. डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. डाळींब बागेतील अतिरिक्त फुटवे काढावेत.

चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. काकडीवर्गीय पिकात डाऊनी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटालॅक्झील 4% + मॅर्न्कोझेब 64% 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.

तुती रेशीम उद्योग

रंशीम किटक संगोपन आणि कोष उत्पादन शेतीस पुरक उद्योग म्हणून विकसीत होत आहे. लहान व मध्यम शेतकरी मुख्य शेती व्यवसाय म्हणून स्विकारत आहेत. एक एकर तुती लागवडी करीता 82 X 23 X 15 फुट (लांबी, रूंदी व उंची) आकाराचे संगोपन गृह असावे. संगोपन गृह शिफारसीनुसार दक्षिणोत्तर असावे. पश्चिम बाजूस 6 फुट व्हरांडा आणि  6 X 4 X 3 फुट आकाराचा निर्जंतूक हौद असावा. 30 X 5 फुट आकाराचे 5 ताळी रॅक असावेत म्हणजे एकूण 750 चौ.फुट आकाराचे एक रॅक चार रॅकचे मिळून 3000 चौ.फुट क्षेत्र मिळते. त्यात 300 अंडीपूजाचे संगोपन करता येते. अशी 5 पिल्ले/एकर/वर्ष प्रमाणे कोषाचे उत्पादन घेऊन कमीत कमी एका वेळी 2 क्विंटल कोष X 5 = 10 क्विंटल/एकर कोष उत्पादन मिळते. रू. 500 किलो भावाप्रमाणे 5 लक्ष रू./एकर कोष उत्पादन मिळू शकते.

पशुधन व्यवस्थापन

कुक्कुट पालन एकदम हवेशीर, शेडची गळती एकदम कोरडे गारी/लिटर आणि पावसाच्या पाण्याचा शेडच्या परिसरातील योग्य निचरा होईल याची काळजी घ्यावी तसेच पिण्यास स्वच्छ पाण्याची अहोरात्र व्यवस्था होईल याची काळजी घ्यावी. शेळ्यांच्या शेडमधील बेडींग/झोपण्यासाठी पसरलेला पेंडा स्वच्छ व कोरडा राहील याची दक्षता घ्यावी. ह्या काळात नियमीत निर्जंतूकीकरण व परोपजिवी प्रतिबंधक उपाय करावेत.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक36/2025 - 2026         शुक्रवार, दिनांक 01.08.2025

 


No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 03 ऑक्टोबर रोजी बीड, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 04 ऑक्टोबर रोजी परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 03 व 04 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक 05 ते 07 ऑक्टोबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही व पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...