हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 13 सप्टेंबर रोजी नांदेड व लातूर
जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक राहून मुसळधार ते
खूप मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 12 सप्टेंबर रोजी हिंगोली, नांदेड, लातूर,
धाराशिव जिल्हयात तर दिनांक 13 सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली जिल्हयात तर दिनांक
14 सप्टेंबर रोजी धाराशिव, लातूर जिल्हयात तर दिनांक 15 सप्टेंबर रोजी छत्रपती
संभाजी नगर, जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग
अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 12 सप्टेंबर रोजी
परभणी जिल्हयात तर दिनांक 13 सप्टेंबर रोजी धाराशिव, बीड जिल्हयात तर दिनांक 14
सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्हयात
तर दिनांक 15 सप्टेंबर रोजी धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी जिल्हयात
तर दिनांक 16 सप्टेंबर रोजी जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी
वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते
मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 12 व 16 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक 13
व 15 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 14 सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी
हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच
दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 12 ते 18 सप्टेंबर, 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल
तापमान व किमान तापमान सरासरीएवढे व दिनांक 19 ते 25सप्टेंबर, 2025 दरम्यान पाऊस
सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे
राहण्याची शक्यता आहे.
संदेश : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार
मराठवाडयातील काही जिल्हयात तूरळक ठिकाणी मूसळधार ते खूप मूसळध्धार पावसाची
शक्यता असल्यामूळे पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकात
अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
फवारणीची पावसाची उघाड बघून करावीत.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व
अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळी, शेंगा पोखरणारी
अळी व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी
क्लोरांट्रानिलीप्रोल 18.5 % 60 मिली (3 मिली प्रति 10 लिटर)
किंवा इंडाक्झाकार्ब 15.8% 140 मिली (7 मिली प्रति 10
लिटर) किंवा असिटामाप्रीड 25 % + बाईफेन्थ्रीन 25 % (पूर्व मिश्रीत किटकनाशक) 100 ग्रॅम (5 मिली प्रति 10 लिटर) किंवा
क्लोरांट्रानिलीप्रोल 9.3 % + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 4.6
% (पूर्व मिश्रीत किटकनाशक) 80 मिली (4 मिली प्रति 10 लिटर) किंवा
आयसोसाक्लोसिरम 9.2 % 240 मिली (12 मिली प्रति 10 लिटर)
प्रति एकर याप्रमाणे वरील किटकनाशकाची फवारणी प्रति एकर पावसाची उघाउ बघून
आलटून-पालटून करावी. ढगाळ व दमट हवामानामूळे सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादूर्भाव
दिसून आल्यास, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट, शेंगा करपा,
चारकोल रॉट आणि इतर बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65 % (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) - 500 ग्रॅम
प्रति एकर किंवा टेब्युकोनॅझोल 25.9 % -250 मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% - 150
ते 200 ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3 % + इपिक्साकोनाझोल 5 टक्के (पूर्वमिश्रित
बुरशीनाशक) -300 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारावे. सोयाबीन पिकात
पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी एकरी 10
पिवळे चिकट सापळे पिकाच्या उंचीच्या वर लावावेत. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक
प्रादूर्भाव ग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅकच्या
व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम 12.6% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन
9.6% झेड सी 50 मिली किंवा ॲसिटामिप्रिड 25% + बाइफेन्थ्रीन 25% डब्ल्यू जी 100 ग्रॅम किंवा बीटा
साइफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% ओडी 140 मिली प्रति एकर यापैकी एका किटकनाशकाची पावसाची उघाड बघून
याप्रमाणे फवारणी करावी. सोयाबीन पिकात शेंगा वाढीसाठी 00:52:34 100 ग्रॅम प्रति
10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
खरीप ज्वारी पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व
अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून
येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून
फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी
करावी.
ऊस पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त
पाण्याचा निचरा करावा. उस पिकात पांढरी माशीचा व पाकोळीचा प्रादूर्भाव दिसून येत
असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी, लिकॅनीसिलियम लिकॅनी या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. रासायनिक
कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली किंवा ॲसीफेट 75 % 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारावे. इमिडाक्लोपीड 17.8% कीटकनाशकासोबत 2 टक्के युरिया (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस पिकात पोक्का बोइंग या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी 50 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% डब्ल्यू
पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2
ते 3 फवारण्या पावसाची उघाड बघून कराव्यात. ऊस पिकात लाल कुज रोगाच्या
व्यवस्थापनासाठी ॲझॉक्सीस्ट्रोबीन 18.2 % + डायफेन्कोनॅझोल
11.4 % एससी 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड
बघून फवारणी करावी.
हळद पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व
अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत
असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15 मिली प्रति 10 लिटर स्टिकरसह पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून
फवारणी करावी. उघडै पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत व वेळेवर हळदीची भरणी करावी.
हळदीवरील पानावरील ठिपके आणि करपा याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेंडेंझीम 50
% 20 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब
75 % 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50 % 25 ग्रॅम प्रति प्रति 10 लिटर पाण्यात स्टीकरसह पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. हळद पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी
व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी 00:52:34 1.5किलो + जिब्रॅलिक ॲसिड 1.5
ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
डाळींब बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व
अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. डाळींब बागेतील अतिरिक्त फुटवे काढावेत. डाळींब
बागेत 00:00:50 1.5 किलो प्रती 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी
चिकू बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व
अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून
घ्यावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व
अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून
घ्यावी. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी)
पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या
व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन
5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
फुलशेती
फुल पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व
अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून
घ्यावी. जमिनीत वापसा असतांना फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण
करावे.
तुती रेशीम उद्योग
भरपूर रेशीम उद्योजक शेतकरी तूती बागेस पशूधन व शेणखत उपलब्ध
नसल्यामूळे देण्याचे टाळत आहेत आणि पर्यायी बाजारात उपलब्ध जाहिरातीच प्रभावामूळे
तुती बागेत इतर निविष्ठा देत आहेत. जमिनीची प्रत खराब होण्यामध्ये मोठ्या
प्रमाणावर जबाबदार रासायनिक खतच आहेत. नऋयुक्त खताच्या अनिर्बंध वापर वाढला असून
त्यामूळे कपाशी, सोयाबीन सारखे पीके किडीस बळी पडत आहेत. रेशीम किटक संगापनानंतर
तुतीची पाने, फांद्या, रेशीम कीटक विष्ठा प्रती एकर 6 टन तर हेक्टरी 15 टन पर्यंत
शिल्लक राहते. त्यापासून कंम्पोस्ट खत किंवा गांडूळखत तयार करता येतो त्यासाठी 16 X 8 X 4 फुट आकाराच्या दोन खड्डयात 6 महिने तुतीचे
शिल्लक अवशेष कुजवल्यास उत्तम प्रकारचा खत तयार होतो.
पशुधन व्यवस्थापन
जनावरांच्या गोठ्यात वाढलेली आर्द्रता गोचिडासह विविध किटकाच्या
वाढ व विकासासाठी पोषक असते, त्या किटकांचे जीवनक्रम थांबवण्यासाठी व त्यापासून
प्रसारीत होणाऱ्या रोगप्रतिबंधतेसाठी गोठ्यातील भेगा व फटीतील अंडी व इतर
अर्भकावस्था गोठ्यातून काढून टाकाव्यात.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 48/2025
- 2026 शुक्रवार, दिनांक
– 12.09.2025
No comments:
Post a Comment