Monday, 20 October 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हयात तर दिनांक 21 ऑक्टोबर रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व पुढील तीन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 24 ते 30 ऑक्टोबर, 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचीत कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

संदेश : पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकची काढणी लवकरात लवकर करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा विशेषत: तुडतुडे व पांढरी माशी व फुलकिडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा फलोनिकॅमिड 50 % 80 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5 % 600 मिली किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 % 160 मिली किंवा बुप्रोफेन्झीन 25 % 400 मिली प्रति एकर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात पातेगळ व बोंडगळ दिसून येत असल्यास एनएए 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. कापूस पिकात लाल्या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 20 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात.

तुर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

रब्बी ज्वारी पिकाची पेरणी 45X15 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. रब्बी ज्वारीच्या पेरणीसाठी परभणी सुपर मोती (एसपीव्ही-2407), परभणी शक्ती (पीव्हीके-1009), परभणी  मोती (एसपीव्ही-1411), परभणी ज्योती (एसपीव्ही-1595/सीएसव्ही-18), पीकेव्ही क्रांती, फुले यशोदा, सीएसव्ही-22 आर, सीएसव्ही-29आर (एसपीव्ही-2033), मालदांडी (एम35-1), फुल रेवती (एसपीव्ही-2048), फुले सुचित्रा इत्यादी वाणांपैकी निवड करावी. परेणीपूर्वी काणी रोग प्रतिबंधासाठी 300 मेश गंधक 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी. पोंगेमर व खोडमाशीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथॉक्झाम 70% 4 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 48% 14 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.

रब्बी सुर्यफुलाची पेरणीसाठी भारी जमिनीत पेरणी 60X30 सेंमी तर मध्यम जमिनीत 45X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणे वापरावे. रब्बी सुर्यफुल पेरणीसाठी एल.एस.एफ.एच-171, एल.एस.एफ.एच-35, के.बी.एस.एच-44, डी.आर.एस.एच-1, एल.एस.एफ-8, एल.एस-11, एल.एस-2038 इत्यादी वाणापैकी वाणाची निवड करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत केळी झाडांना माती लावावी व काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळी घडांची काढणी करून घ्यावी. केळी बागस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

आंबा फळ बागेत भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी 300 मेश गंधकाची धूरळणी करावी. आंबा बागेत किडीच्या व्यवस्थापनासाठी  किटक नाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

छाटणी केली नसल्यास द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणी करून घ्यावी. छाटणी केल्यानंतर द्राक्ष बागेत 1% बोर्डो मिश्रणाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

काढणीस तयार असलेल्या सिताफळांची काढणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

भाजीपाला

रब्बी हंगामात ब्रोकोली, टोमॅटो, फुल कोबी व पत्ता कोबी या भाजीपाला पिकाचे गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकावे तर मुळा, गाजर, मेथी व पालक ईत्यादी पिकाची लागवड करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. नवीन लागवड केलेल्या भाजीपाला पिकास खतमात्रा देण्यात यावी.

फुलशेती

आष्टूर व जिलार्डीया या फुलपिकाची लागवड करण्यासाठी गादीवाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकावे. लांब दांड्यांच्या फुलाची (गुलाब) काढणी करतांना कळी उमलण्याच्या अवस्थेत असतांना काढणी करावी तर झेंडू, आष्टूर या सारख्या फुलांची काढणी पूर्ण उमलल्याच्या नंतर करावी.

पशुधन व्यवस्थापन

दुधावरील जनावरांना योग्य प्रमाणात खनिज द्राव्याचे मिश्रण द्यावे तसेच हिरवा चारा (बरसीम/लुसर्ण) व सुका चारा (गव्हाचा पेंढा) यांचे पशुधनांना संतुलित आहार द्यावा. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य वेळी जंतनाशकाची औषधे देण्यात यावी. 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक59/2025- 2026    सोमवार, दिनांक 20.10.2025

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हयात तर दिनांक 21 ऑक्टोबर रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व पुढील तीन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र ,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या...