Friday, 31 October 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तर दिनांक 02 नोव्हेंबर रोजी जालना व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 31 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू वा होण्याची तर पुढील चोविस तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. घट होण्याची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तर दिनांक 02 नोव्हेंबर रोजी जालना व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 31 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू वा होण्याची तर पुढील चोविस तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. घट होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 31 ऑक्टोबर ते 06 नोव्हेंबर, 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त व दिनांक 07 ते 13 नोव्हेंबर, 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचीत कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेल आहे.

संदेश : काढणी केलेल्या पिकाची सुरक्ति ठिकाणी साठवणूक करावी. कापूस पिकाची वेचणी स्वच्छ व कोरड्या हवामानात करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. रब्बी पिकाच्या पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

काढणी केलेल्या सोयाबीन पिकाची मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

तुर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

उस पिकात पांढरी माशीचा व पाकोळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी, लिकॅनीसिलियम लिकॅनी या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. रासायनिक कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली किंवा ॲसीफेट 75 % 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारावेइमिडाक्लोपीड 17.8% कीटकनाशकासोबत 2 टक्के युरिया (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) मिसळून फवारणी करावी

कंदकूजचा प्रादूर्भाव दिसून आल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी जमिनीतून कार्बेडेंझीम 50% -200 ग्रॅम (10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा मॅन्कोझेब 75% -600 ग्रॅम (30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड 50% -1000 ग्रॅम (50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकरी या प्रमाणात दरवेळी महिन्यातून एकदा आळवणी करावी. (आळवणी करताना जमिनीमध्ये वापसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण द्यावा.). हळदीवरील पानावरील ठिपके आणि करपा याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेंडेंझीम 12 % + मॅन्कोझेब 63 % डब्ल्यूपी 25 ग्रॅम प्रति प्रति 10 लिटर पाण्यात स्टीकरसह पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15 मिली प्रति 10 लिटर स्टिकरसह पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. उघडै पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत व वेळेवर हळदीची भरणी करावी.

जमिनीत वापसा बघून हरभरा पिकची पेरणी करावी. हरभरा पिकाच्या पेरणीसाठी लहान आकाराच्या देशी वाणासाठी 60 किलो, मध्यम आकाराचे बियाणे 70 किलो तर टपोरे दाण्याच्या काबूली वाणासाठी 100 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. बागायती हरभरा पेरणी करतांना 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 25 किलो पालाश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी. पेरणीपूर्वी मर रोगाच्या प्रतिबंधासाठी कार्बेन्डाझीम 2.5 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. तर मूळकूज या रोगाच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा 10  ग्रॅम किंवा थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.

जमिनीत वापसा बघून करडई पिकची पेरणी करावी. करडई पिकाच्या पेरणीसाठी हेक्टरी 10 ते 12 किलो बियाणे वापरावे. बागायती करडई साठी शिफारशीत खतमात्रा 60:40:00 पैकी पेरणीच्या वेळी 30 किलो नत्र व 40 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे व  30 किलो नत्र एक महिन्यानी द्यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत अन्नद्रव्याच्या कमतरतेमूळे फळगळ होऊ नये म्हणून 19:19:19 1.5 किलो प्रती 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

काढणीस तयार असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी. डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. चिकू बागेत जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

भाजीपाला

रब्बी हंगामात ब्रोकोली, टोमॅटो, फुल कोबी व पत्ता कोबी या भाजीपाला पिकाचे गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकावे तर मुळा, गाजर, मेथी व पालक ईत्यादी पिकाची लागवड करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. नवीन लागवड केलेल्या भाजीपाला पिकास खतमात्रा देण्यात यावी.

फुलशेती

आष्टूर व जिलार्डीया या फुलपिकाची लागवड करण्यासाठी गादीवाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकावे व आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. लांब दांड्यांच्या फुलाची (गुलाब) काढणी करतांना कळी उमलण्याच्या अवस्थेत असतांना काढणी करावी तर झेंडू, आष्टूर या सारख्या फुलांची काढणी पूर्ण उमलल्याच्या नंतर करावी.

तुती रेशीम उद्योग

भरपूर रेशीम उद्योजक शेतकरी तूती बागेस पशूधन व शेणखत उपलब्ध नसल्यामूळे देण्याचे टाळत आहेत आणि पर्यायी बाजारात उपलब्ध जाहिरातीच प्रभावामूळे तुती बागेत इतर निविष्ठा देत आहेत. जमिनीची प्रत खराब होण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जबाबदार रासायनिक खतच आहेत. नऋयुक्त खताच्या अनिर्बंध वापर वाढला असून त्यामूळे कपाशी, सोयाबीन सारखे पीके किडीस बळी पडत आहेत. रेशीम किटक संगापनानंतर तुतीची पाने, फांद्या, रेशीम कीटक विष्ठा प्रती एकर 6 टन तर हेक्टरी 15 टन पर्यंत शिल्लक राहते. त्यापासून कंम्पोस्ट खत किंवा गांडूळखत तयार करता येतो त्यासाठी 16 X 8 X 4 फुट आकाराच्या दोन खड्डयात 6 महिने तुतीचे शिल्लक अवशेष कुजवल्यास उत्तम प्रकारचा खत तयार होतो.

पशुधन व्यवस्थापन

पशुधनासाठी चारा टंचाई भासू नये यासाठी असलेल्या पडकातील गवत, द्विदल व तत्सम पशुची चारा पीके याचे सायलेज (मूरघास) स्वरूपामध्ये जतन, तसेच रब्बी हंगामामध्ये ज्वारीसारखे पीक घेऊन कडबा उत्पादन करणे, ईतर पीकांचे काड घेऊन त्यावर युरीया-मोलॅसेस यांची ट्रीटमेंट करून वापरणे. ईत्यादी उपाय अमलात आणण्याची गरज आहे व त्यासाठी सर्वांनी तयारी केली पाहिजे. जेणेकरून चारा टंचाईच्या काळात सदरील चारा जनावराच्या खाद्यासाठी वापरता येतो.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक62/2025 - 2026         शुक्रवार, दिनांक 31.10.2025

 


No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...