Thursday, 29 January 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार दिवस आकाश स्वच्छ राहण्याची तर दिनांक 03 फेब्रुवारी रोजी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही तर पुढील चोविस तासात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची तर त्यानंरत पुढील दोन दिवसासत 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यांनतर 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार दिवस आकाश स्वच्छ राहण्याची तर दिनांक 03 फेब्रुवारी रोजी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही तर पुढील चोविस तासात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची तर त्यानंरत पुढील दोन दिवसासत 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यांनतर 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 30 जानेवारी ते 05 फेब्रूवारी 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त व दिनांक 06 ते 12 फेब्रूवारी 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

संदेश : मराठवाडयात दिनांक 03 फेब्रुवारी रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता, काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करून घ्यावी व वाळल्यानंतरच मळणी करावी. काढणी केलेल्या तूर पिकची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

ऊस पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या ऊस पिकाची काढणी करून घ्यावी. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत. हळदीच्या पानावरील ‍ठिपके / करपा रोग याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 10 मिली + 5 मिली स्टीकरसह प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

हरभरा पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी तसेच अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी चिलेटेड झिंक 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. संत्रा/मोसंबी बागेत 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी.

चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

बदललेल्या हवामानानूसार दूध उत्पादनावरील पशूधन आणि अन्य प्राण्याच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे, दुधावरील जनावरांना योग्य प्रमाणात खनिज द्राव्याचे मिश्रण द्यावे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य वेळी जंतनाशकाची औषधे देण्यात यावी.  थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास मोकळया जागी न बांधता गोठ्यात बांधावेत.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक88/2025 - 2026         शुक्रवार, दिनांक 30.01.2026

 

No comments:

Post a Comment