Tuesday, 12 May 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 12 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड जिल्हयात तर दिनांक 13 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी जिल्हयात तर दिनांक 14 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 15 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 12 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड जिल्हयात तर दिनांक 13 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी जिल्हयात तर दिनांक 14 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 15 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 15 ते 21 मे 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश : मराठवाडयात दिनांक 12 ते 15 मे दरम्यान तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे व पशुधनाची काळजी घ्यावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या मका पिकाची काढणी करून घ्यावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या केळी घडांची काढणी करून घ्यावी. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. केळी बागेत वाढीसाठी 00:52:34 1% ची फवारणी करावी.

जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

द्राक्ष बागेमध्‍ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणी 15 मे पर्यंत करता येते. छाटणी केल्यानंतर द्राक्ष बागेत हायड्रोजन सायनामाईड पेस्ट लावावी.

सिताफळ बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी सिताफळ फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमूळे, जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे व गोठ्यातील तापमान कमी करण्यासाठी गोठ्याच्या छतास असणारे पत्रे ओले करण्यासाठी ठिबक सिंचन पाईपचा वापर करावा. पशुधनास मुबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिज मिश्रण आणि मिठयुक्त खाद्य द्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.

कुकुटपालन

उन्हाळयात वाढलेल्या तापमानामुळे कोंबड्यांना उष्माघाताचा त्रास होतो कोंबड्यांना उष्माघाताच्या त्रासापासून वाचवण्यासाठी कोंबड्यांच्या शेडवर वाळलेले गवत टाकावे शेडच्या छतावर स्प्रिंकलर किंवा तुषार बसवावेत. दुपारच्या उष्ण वातावरणात पक्षांना हाताळू नये कोंबड्यांना अविरत थंड पाण्याचा पुरवठा करणे आवश्यक आहे तसेच पिण्याच्या पाण्यातून जीवनसत्व क, इ आणि अ यांचा समावेश करावा.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक12/2026-2027    मंगळवार, दिनांक – 12.05.2026

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 25 जून रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून मूसळधार ते खूप मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 25 जून रोजी बीड व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 25 जून रोजी परभणी, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 26 जून रोजी बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 25 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्हयात तर दिनांक 26 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 27 जून रोजी बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 28 व 29 जून रोजी परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 25 ते 29 जून दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 24 ते 48 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर वाढ होण्याची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र ,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या...