हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक
हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 17 जूलै रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.)
राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 जूलै रोजी हिंगोली, लातूर, धाराशिव जिल्हयात
तर दिनांक 18 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, बीड, हिंगोली, जालना, लातूर,
नांदेड, परभणी जिल्हयात तर दिनांक 19 जूलै रोजी परभणी, बीड, हिंगोली जिल्हयात तूरळक
ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40
कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक
18 जूलै रोजी काही ठिकाणी तर दिनांक 17, 19 ते 21 जूलै दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या
ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 17 ते 23 जूलै 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान
सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त व किमान तापमान सरासरीएवढे तर दिनांक 24 ते
30 जूलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त व किमान
तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणी
योग्य पाऊस (75 ते 100 मिमी)
झाल्या नंतर सूर्यफुल, तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तूर (4:2), बाजरी + तूर
(3:3), एरंडी, कारळ आणि तिळ ही पिके घ्यावीत.
संदेश : शंखी
गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या
मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा
चूना टाकून नष्ट कराव्यात. गोगलगायी
जमा करताना अथवा हाताळणी करताना उघड्या हाताने न करता हातमोजे व तोंडावर मास्क
घालूनच करणे गरजेचे आहे. कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी
दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. केळी,
आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी झाडाखाली दाणेदार
मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन पिकात हलकी
कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून
राहण्यास मदत होईल. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथुन प्राप्त
झालेल्या अंदाजानूसार दिनांक 17 व 19 जूलै रोजी तूरळक ठिकाणी तर दिनांक 18 जूलै
रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तरी पाऊस न
झालेल्या भागात सोयाबीन पिकात आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन
करावे. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी पिकातील पिवळा मोझॅक प्रादूर्भाव ग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
खरीप ज्वारी पिकात हलकी
कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून
राहण्यास मदत होईल. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथुन प्राप्त
झालेल्या अंदाजानूसार दिनांक 17 व 19 जूलै रोजी तूरळक ठिकाणी तर दिनांक 18 जूलै
रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तरी पाऊस न
झालेल्या भागात खरीप ज्वारी पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
बाजरी पिकात हलकी
कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून
राहण्यास मदत होईल. प्रादेशिक
हवामान केंद्र मुंबई येथुन प्राप्त झालेल्या अंदाजानूसार दिनांक 17 व 19 जूलै रोजी
तूरळक ठिकाणी तर दिनांक 18 जूलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता आहे तरी पाऊस न झालेल्या भागात बाजरी पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन
करावे.
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथुन प्राप्त झालेल्या अंदाजानूसार
दिनांक 17 व 19 जूलै रोजी तूरळक ठिकाणी तर दिनांक 18 जूलै रोजी काही ठिकाणी हलक्या
ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तरी पाऊस न झालेल्या भागात ऊस पिकात
आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे ऊस पिकात
पायरीला (पाकोळी) या किडीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, किडीच्या निरिक्षणासाठी व मोठ्या
प्रमाणात प्रौढ जमा करून नष्ट करण्यासाठी एक प्रकाश सापळा प्रति पाच एकर क्षेत्र या
प्रमाणात पिकाच्या उंचीच्या अर्धा फूट उंचीवर लावून सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत
चालू ठेवावा. किडीच्या व्यवस्थापनासाठी मेटाराझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40
ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वनस्पतीजन्य कीटकनाशकामध्ये 5 टक्के
निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच रासायनिक व्यवस्थापनकरिता क्लोरोपायरीफॉस 20 टक्के
600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36 टक्के 200 मिली प्रति एकर फवारावे.
हळद पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. प्रादेशिक हवामान
केंद्र मुंबई येथुन प्राप्त झालेल्या अंदाजानूसार दिनांक 17 व 19 जूलै रोजी तूरळक
ठिकाणी तर दिनांक 18 जूलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता आहे तरी पाऊस न झालेल्या भागात हळद पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन
करावे. हळद पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत फुलधारणा व फळधारणा अवस्थेत
असल्यामूळे, पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी व कोणत्याही किटकनाशकाची
फवारणी करू नये. संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
मृग बहार डाळींब बागेत फुलधारणा व फळधारणेच्या अवस्थेत असल्यामूळे,
पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी व बागेत रोगाचा प्रादूर्भाव होण्याची
शक्यता पाहता 1 % बोर्डो मिश्रणाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बागेत
अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथुन प्राप्त झालेल्या अंदाजानूसार
दिनांक 17 व 19 जूलै रोजी तूरळक ठिकाणी तर दिनांक 18 जूलै रोजी काही ठिकाणी हलक्या
ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तरी पाऊस न झालेल्या भागात चिकू बागेत
आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे व अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
भाजीपाला
भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. काढणीस तयार
असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथुन
प्राप्त झालेल्या अंदाजानूसार दिनांक 17 व 19 जूलै रोजी तूरळक ठिकाणी तर दिनांक 18
जूलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तरी पाऊस न
झालेल्या भागात नविन लागवड केलेल्या भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन
करावे.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. प्रादेशिक हवामान
केंद्र मुंबई येथुन प्राप्त झालेल्या अंदाजानूसार दिनांक 17 व 19 जूलै रोजी तूरळक
ठिकाणी तर दिनांक 18 जूलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता आहे तरी पाऊस न झालेल्या भागात नविन लागवड केलेल्या फुल पिकास
आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळ्यात जनावरांभोवती गोमाशा, डास, गोचिड यांचा वावर वाढतो
त्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने किटकनाशकाची फवारणी करून घ्यावी. जनावरांना
पावसाळ्यात उदभवणाऱ्या आजारांचे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करून
घ्यावे.विशेष शेळी व मेंढी यांना पावसाळ्यात आंत्रविषार या आजारापासून प्रतिबंध
करण्यासाठी त्या रोगांची लसीकरण योग्य वेळेतच करून घ्यावे. पावसाळ्यात कोवळा,
हिरवा चारा पशुधनास जास्त प्रमाणात आहारात देणे टाळावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 31/2026-2027 शुक्रवार,
दिनांक –
17.07.2026
No comments:
Post a Comment