हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई
येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक
28 ऑक्टोबर रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक
29 ऑक्टोबर रोजी जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग
अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 28 ऑक्टोबर
रोजी परभणी जिल्हयात तर दिनांक 29 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम तर दिनांक
28 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर, लातूर, जालना, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 29
ऑक्टोबर रोजी परभणी, बीड जिल्हयात तर दिनांक
30 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची
शक्यता आहे. दिनांक 29 व 30 ऑक्टोबर रोजी
हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची
शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 24 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व
त्यानंतर 24 ते 48 तासात 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर वाढ होण्याची शक्यता
आहे तर पुढील 24 तासात किमान तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर 24 ते
48 तासात 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता
आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 30 ऑक्टोबर ते 05 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त,
कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त व किमान तापमान सरासरीपेक्षा
जास्त राहण्याची शक्यता आहे.
संदेश : पिकास,
बागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. पाण्याच्या
उपलब्धतेनूसार रब्बी हंगामातील पिकांची (रब्बी ज्वारी, करडई, सूर्यफूल व हरभरा)
पेरणी करावी. काढणी व मळणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
वेचणीस
तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी
उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही.
फुलोरा
अवस्थेत असलेल्या तूर पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पिकास आवश्यकतेनूसार हलके
पाणी द्यावे. तूरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा व शेंग माशीचा प्रादूर्भाव दिसून येत
आहे, अळीची आर्थिक नूकसानीची पातळी कळण्यासाठी प्रति एकरी दोन कामगंध सापळे
लावावेत तसेच शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे पक्षी थांबे लावावेत. तुर पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी
5 % निंबोळी
अर्काची किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एससी 4.4 ग्रॅम किंवा स्पिनोसॅड 45% एससी 3 मिली किंवा इंडाक्झाकार्ब 14.5%
एससी 8 मिली किंवा
क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 3 मिली किंवा फ्लुबेंडामाईड 20% डब्ल्यूजी
5 ग्रॅम किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 9.3 %
+ लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 4.6% झेडसी (पूर्वमिश्रित) 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. शेंग माशीच्या व्यवस्थापनासाठी लॅमडा
सायहॅलोथ्रीन 5% ईसी 8 मिली
किंवा ल्युफेन्यूरॉन 5.4% ईसी 12 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सदरील फवारणी सोबत
इतर किटकनाशके, बूरशीनाशके, विद्राव्य खते व सूक्ष्म अन्नद्रव्य अनावश्यकपणे मिसळू
नयेत.
पाण्याची
उपलब्धता असल्यास मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार
असलेल्या कणसांची काढणी करून घ्यावी.
पेरणी
केलेल्या रब्बी ज्वारी पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. बागायती रब्बी
ज्वारी पिकाची पेरणी 31 ऑक्टोबर पर्यंत करून घ्यावी. पेरणी 45X15 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे
वापरावे. पेरणीपूर्वी काणी रोग प्रतिबंधासाठी 300 मेश गंधक 4 ग्रॅम प्रति किलो
बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी. पोंगेमर व खोडमाशीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथॉक्झाम
70% 4 ग्रॅम
किंवा इमिडाक्लोप्रिड 48% 14 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.
पेरणी
केलेल्या रब्बी सुर्यफुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. पाण्याच्या
उपलब्धतेनूसार रब्बी सुर्यफुलाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी.
फळबागेचे व्यवस्थापन
पाण्याची
उपलब्धता असल्यास केळी बागेत आवश्यकतेनूसार सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेत पाणी
द्यावे. केळी बागेतील अतिरिक्त फुटवे व रोगग्रस्त पाने काढून टाकावीत. केळी बागेत
अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी. केळी बागेत बोधांना माती लावावी.
आंबा
बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. नविन लागवड केलेल्या आंबा बागेस
आवश्यकतेनूसार सकाळी किंवा सायंकाळच्या पाणी व्यवस्थापन करावे.
द्राक्ष
बागेत आवश्यकतेनूसार सकाळी किंवा सायंकाळच्या पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष
बागेत पानांची विरळणी करून घ्यावी. छाटणी करून 20 दिवस झाले असल्यास 00:00:50 15
ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
पाण्याची
उपलब्धता असल्यास सिताफळ बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेत पाणी
द्यावे. पूर्ण वाढलेल्या व काढणीस तयार असलेल्या सिताफळ फळांची काढणी करावी व
प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.
भाजीपाला
पाण्याची
उपलब्धता असल्यास भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस
तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. पाण्याच्या
उपलब्धतेनूसार बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाजीपाला पिकांची लागवड करावी.
फुलशेती
पाण्याची
उपलब्धता असल्यास फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार
असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत
पाठवावी. फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. पाण्याच्या
उपलब्धतेनूसार फुलपिकांची पूर्नलागवड करावी.
चारा पिके
चाऱ्यासाठी
लागवड केलेल्या संकरीत नेपियर पिकाची
पहिली कापणी 65 ते 70 दिवसानी तर नंतरच्या कापण्या 40 ते 45 दिवसानी (7 ते
8 कापण्या) कराव्यात. चारा पिकाची
पेरणी करण्यासाठी पूर्व मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावीत. पाण्याच्या
उपलब्धतेनूसार रब्बी ज्वारी, मका व ओट पिकाची पेरणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
पशुसाठी
चारा व्यवस्थापन : मराठवाडयाच्या अनेक भागामध्ये कमी पाऊस झाल्यामूळे भविष्यामध्ये
पशुधनासाठी चारा टंचाई भासू शकते. यासाठी असलेल्या पडकातील गवत, द्विदल व तत्सम
पशुची चारा पीके याचे सायलेज (मूरघास) स्वरूपामध्ये जतन, तसेच रब्बी हंगामामध्ये
ज्वारीसारखे पीक घेऊन कडबा उत्पादन करणे, ईतर पीकांचे काड घेऊन त्यावर
युरीया-मोलॅसेस यांची ट्रीटमेंट करून वापरणे. ईत्यादी उपाय अमलात आणण्याची गरज आहे
व त्यासाठी सर्वांनी तयारी केली पाहिजे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 60/2026-2027 मंगळवार,
दिनांक –
27.10.2026

No comments:
Post a Comment