Monday, 7 March 2022

दिनांक 08 मार्च रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी व हिंगोली जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 09 मार्च रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 10 ते 12 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 08 मार्च रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी व हिंगोली जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 09 मार्च रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.)  व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 10 ते 12 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे व जमिनीतील ओलावा वाढलेला आहे. तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे पिकास पाणी देण्याची आवश्यकता नाही.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेला हरभरा गोळा करून पॉलिथीन  शीटने झाकून ठेवावा. मळणी केलेला हरभरा सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवावा. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे,  काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेले कणसे गोळा करून पॉलिथीन  शीटने झाकून ठेवावीत. मळणी केलेली रब्बी ज्वारी सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापणी केलेला गहू गोळा करून पॉलिथीन शीटने झाकून ठेवावा. मळणी केलेल्या गव्हाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे,  हळदीची उघडयावर साठवण करू नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे,  जुन मध्‍ये लागवड केलेल्‍या  केळीच्या बागेत केळीचे झाड कोलमडु नये म्‍हणुन झाडास आधार दयावा.  वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे,  काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित  ठिकाणी साठवणूक करावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या संत्रा/मोसंबी फळांची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित  ठिकाणी साठवणूक करावी.

भाजीपाला

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.

फुलशेती

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे,  काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी व प्रतवारी करून, ती बाजारपेठेत विक्रीस पाठवावी.

चारा पिके

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणी केलेल्‍या ज्‍वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्‍यावी. कारण पावसात भिजल्‍यास त्‍याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.

पशुधन व्यवस्थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या  वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.

सामुदायिक विज्ञान

पिंपळाच्या सालीची भुकटी 0.5% सोडियम हायड्रॉक्साईडच्या आम्लारीयुक्त द्रावणामध्ये उकळून त्यापासून रंक काढता येतो. हा रंग सुती, रेशमी आणि उनी धागे रंगविण्यासाठी अनुक्रमे 10%, 10% आणि 5% या प्रमाणात घेऊन वापरता येतो. पिंपळाच्या सालीपासून रंग काढण्यासाठी 30 मिनिटांचा व सुती धागे रंगविण्यासाठी 45 मिनिटांचातर रेशमी आणि उनी धागे रंगविण्यासाठी 30 मिनिटांचा वेळ प्रमाणित करण्यात आला. सुती धागे रंगविण्यापूर्वी 10% हरडयाच्या द्रावणात प्रक्रिया करणे गरजेचे आहे. तुरटी, क्रोम, कॉपर सल्फेट आणि फेरस सल्फेट या रंगबंधकाचा वापर करून मंद विटकरी ते गडद तपकिरी अशा विविध रंगछटा मिळतात. धुणे, घासणे, घाम आणि सूर्यप्रकाश या सर्व बाबींसाठी रंगाचा पक्केपणा अतिशय चांगला ते उत्तम आहे.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक98 / 2021 - 2022      मंगळवार, दिनांक – 08.03.2022

 

Thursday, 3 March 2022

दिनांक 08 मार्च रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व हिंगोली जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. दिनांक 7 व 8 मार्च रोजी आकाश ढगाळ राहून दिनांक 08 मार्च रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व हिंगोली जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

काढणीस तयार असलेल्या हरभरा व ज्वारी पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयातील सर्व तालूक्यात व जिल्हयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला असून जमिनीतील ओलावा वाढला असल्याचे दिसून येत आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 9 ते 15 मार्च, 2022 दरम्यान कमाल तापमान मध्यमप्रमाणात सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

दिनांक 08 मार्च रोजी तुरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उशीरा पेरणी केलेल्या गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. गहू पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. उन्हाळी सोयाबीन पिकात अंतरमशागतीची कामे करावीत व आवश्यकतेनूसार पिकास पाणी द्यावे. उन्हाळी सोयाबीन पिकात रसशोषण करणाऱ्या किडी (पांढरी माशी व तूडतूडे) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे लावावेत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादूर्भाव जास्त दिसून आल्यास थायामिथॉक्झाम 12.6% + लॅबडा सायहॅलोथ्रीन 9.5% झेडसी 2.5 मिली किंवा बिटासायफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% 7 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीनचे बिजोत्पादन घेत असल्यास शेतकऱ्यांनी शेतात वेगळी दिसणारी झाडे उपटुन टाकावीत. सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 50% ईसी 20 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा थायामिथॉक्झाम + लॅम्डा सायहॅलोथ्रीन एकरी 50 मिली (2.5 मिली प्रति 10 लिटर) पाण्यात मिसळून फवारणी करावी. नविन लागवड केलेलया हंगामी ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  दिनांक 08 मार्च रोजी तुरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणी केलेल्या हळद पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृगबहार लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फळांची काढणी करून घ्यावी. डाळींब बागेत शॉर्ट होल बोरर/खोड किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास खोडांना लेप लावण्यासाठी लाल माती 4 किलो + क्लोरपायरीफॉस 20% ईसी 20 मिली + कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून पेस्ट बनवून जमिनीपासून 2 ते 2.5 फुट खोडावर लेप लावावा. थाईमेथॉक्झाम 25% डब्ल्यूजी 10 ते 15 ग्रॅम + प्रोपीकोनॅझोल 25% ईसी 15 ते 20 मिली  प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून ड्रेनचींग करावी.

 

 

भाजीपाला

कांदा पिकावरील करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबिन + डायफेनकोनॅझोल 10 मिली + स्टीकर 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची पिकावरील फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रिन 30% ईयी 3.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एसएल 3.2 मिली किंवा फिप्रोनिल 5% एससी 20 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 7.7% एससी 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी. फुल पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

चारा पिके

चारा  पिकासाठी लागवड केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. 

तुती रेशीम उद्योग

रेशीम कोषाचा ए-ग्रेड उत्त्म प्रकारे मिळवण्यासाठी किटक संगोपन कौशल्य आत्मसात करणे आवश्य्‍क आहे. खाद्य म्हणून तुती पानात पाण्याचे प्रमाण 80 टक्के मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. हलक्या जमिनीत 6 ते 7 दिवसाला तर भारी जमीनीत 10-12 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळया द्याव्यात. खत मात्रा; वर्षातून कंम्पोस्ट खत 2 वेळा जुन व नोत्हेंबर महिण्यात 4 टन प्रत्येकी (एकूण 8 टन एकरी) द्यावे म्हणजे वर्षाकाठी एकरी 25 टन पानाचे उत्पादन मिळते. दुस-या वर्षापासून 250 अंडिपूजाची 5 ते 6 पीके घेणे शक्य होते. 200 कि. ग्रा. कोषाच्या उत्पन्नास रू. 300/- प्रति किलो भाव ‍मिळला तरी 60,000/- प्रमाणे 5 पिकाचे रू. 3 लक्ष उत्पन्न शेतक-याला मिळते.

सामुदायिक विज्ञान

स्थानिक उपलब्धतेनुसार वनस्पतीच्या विविध स्त्रोतापासून रासायनिक रंगाला पर्यायी नैसर्गिक होळीचे रंग तयार करता येतात. पळसाची फुले, इंग्रजी झेंडूची फुले, मंजिष्ठा, हळद, मेहंदी, बीट,‍ आवळा आणि नीळ यांच्या घट्ट द्रावणामध्ये आरारूट मिसळून होळीचे नैसर्गिक रंग तयार करता येतात. पिवळा, केशरी निळा, हिरवा, काळा या रंगछटा विकसित केल्या गेल्या आहेत. हे रंग भुकटीच्या स्वरूपात असून कपडयावरल तसेच शरीरावरील रंग धुऊन काढण्यास अत्यंत सोपे आहेत.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक97/2021 - 2022      शुक्रवार, दिनांक – 04.03.2022

 

Monday, 28 February 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 96/2021 - 2022 सोमवार, दिनांक – 28.02.2022

 


मराठवाडयात पुढील पाच दिवस कमाल तापमानात 1 ते 2 अं.सें. ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात दिनांक 02 ते 04 मार्च, 2022 दरम्यान ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस कमाल तापमानात 1 ते 2 अं.सें. ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात दिनांक 02 ते 04 मार्च, 2022 दरम्यान ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग व जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 06 मार्च ते 12 मार्च, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे  तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % +‍ लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील चिकटा व्यवस्थापनासाठी कार्बेंडाझीम 10 ग्रॅम प्रति 10 ‍लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी पिकाची काढणी करून घ्यावी. वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रीड 17.8% 2.5 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5% 6 मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% 3 मिली (संयूक्त किटकनाशक) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. उन्हाळी भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार ठिबक किंवा तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. उशीरा पेरणी केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी पिकात घडांना काठीने आधार द्यावा. बागेतील वाळलेली व रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. केळी बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. आंबा फळबागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी एनएए 10 पीपीएम (प्लॅनोफिक्स 2.5 मिली प्रति 10 लिटर पाणी) ची फवारणी करावी. आंबा मोहोर संरक्षणासाठी 300 मेश गंधकाची धूरळणी करावी म्हणजे भूरी व करपा रोगापासून बागेचे संरक्षण होईल. आंबा बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी.

भाजीपाला

कांदा पिकावरील करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबिन + डायफेनकोनॅझोल 10 मिली + स्टीकर 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची पिकावरील फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रिन 30% ईयी 3.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एसएल 3.2 मिली किंवा फिप्रोनिल 5% एससी 20 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 7.7% एससी 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

पशुधनावर सध्या प्रचंड प्रमाणामध्ये पिसवांचा प्रादुर्भाव होत आहे. पिसवांचा प्रादुर्भाव आढळल्यास पशुधनास आहे त्या गोठ्यापासून काही काळासाठी दुर अंतरावर बांधावे. त्या गोठयातील जाळै/जळमटे स्वच्छ करावेत व या गोठयामध्ये 4% मिठाचे द्रावण सर्वत्र फवारावे. लागण झालेल्या पशुधनावरती 5% निंबोळी अर्क अथवा वनस्पतीजन्य किटकनाशकाचे द्रावण (15 मिली निंबोळी तेल + 15 मिली कारंज तेल + 2 ग्रॅम साबण + 1 लिटर पाणी) फवारावे अथवा पशुवैद्यक तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली रासायनीक किटकनाशकाची फवारणी करावी. उन्‍हाळी हंगामात हवा गरम होऊन तापमान वाढते. पशुधनाच्‍या शेडच्‍या पत्र्यावर गवताचे किंवा ऊसाच्‍या पाचटाचे आच्‍छादन केल्‍यास शेडचा पत्रा तापत नाही. या प्रक्रियेमुळे शेडमधील तापमान योग्‍य राहण्‍यास मदत होते.

सामुदायिक विज्ञान

शरीरातील सर्व कामे व्यवस्थीत करण्याकरिता व आपल्या ऱ्हदयाचे ठोके व्यवस्थीत राहण्यासाठी मिठाचीगरज असते. मिठामुळे च चांगली येते पण मिठाचा वापर कमी करावा. कारण जास्त मिठाचा वापर केल्याने रक्तदाब, ऱ्हदयरोग होतात. जास्त मिठामुळे हाडातील कॅल्शीयमचे शोषण होते. जागतिक आरोग्य संघटना यांनी प्रति दिवस 5 ग्रॅम पेक्षा कमी मिठाचा वापर करावा असे सुचविले आहे.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी


मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक96 / 2021 - 2022      सोमवार, दिनांक – 28.02.2022

 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 सप्टेंबर रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 11 सप्टेंबर रोजी जालना, परभणी, लातूर जिल्हयात तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 8 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 10 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हयात तर दिनांक 11 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 08 ते 10 सप्टेंबर दरम्यान तूरळक ठिकाणी तर ‍दिनांक 11 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर घट होण्याची शक्यता आहे तर किमान तापमानात पुढील तीन दिवसात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र ,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या...