Tuesday, 16 July 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 16 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर बीड, धाराशिव, नांदेड, लातूर जिल्हयात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 17 व 18 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 19 जुलै रोजी जालना, परभणी,‍ हिंगोली, नांदेड जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 20 जुलै रोजी बीड, धाराशिव, लातूर व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात बहुतांश ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 19 ते 25 जुलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 21 ते 27 जूलै 2024 दरम्यान पाऊस, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

संदेश :

पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस, तूर, मुग/उडीद, मका व भुईमूग पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा ॲसिटामॅप्रिड 20 % 2 ग्रॅम प्रति 10 लिटर किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम प्रति एकर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकाची लागवड करून एक महिना झाला असल्यास कोरडवाहू कापसास 36 किलो नत्र प्रति हेक्टरी तर बागायती कापूस पिकास 60 किलो नत्र प्रति हेक्टरी वरखताची मात्रा द्यावी. कापूस, तूर, मुग/उडीद, मका व भुईमूग पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमूळे तूर पिक पिवळे दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 50 ग्रॅम  किंवा 50 मिली + 19:19:19 खत 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. भाजीपाला पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुलपिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयात हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमूळे व कमी तापमानामुळे जनावरांच्या गोठयात ओलसरपणा राहतो. कायम ओलसरपणामूळे जनावरांच्या गोठयात जिवजंतूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी वेगवेगळया आजाराच्या विशेष संसर्गजन्य आजार प्रतिबंधक लसीकरण पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने वेळेवर करून घ्यावे.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 31/ 2024- 2025    मंगळवार, दिनांक – 16.07.2024

Friday, 12 July 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 15 जुलै रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तर दिनांक 16 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जनेसह वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 14 जुलै रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व बीड जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 15 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 16 जुलै रोजी हिंगोली, बीड, धाराशिव, नांदेड व लातूर जिल्हयात बहुतांश ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जनेसह वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 12 ते 18 जूलै व 19 ते 25 जुलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 17 ते 23 जूलै 2024 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

संदेश :

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पाहता पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वेळेवर पेरणी केलेल्या सोयाबीन पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 500 मिली प्रति एकर याप्रमाणे पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. सोयाबीन पिक पेरणी करून 20 दिवस झाले असल्यास तणांच्या व्यवस्थापनासाठी इमॅझोमॅक्स 35% + इमीझीथीपायर 35% 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारवे. सोयाबीन पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमूळे सोयाबीन पिक पिवळे दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 50 ग्रॅम  किंवा 50 मिली + 19:19:19 खत 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी.  वेळेवर पेरणी केलेल्या खरीप ज्वारी पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. खरीप ज्वारी पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. वेळेवर पेरणी केलेल्या बाजरी पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. बाजरी पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. ऊस पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी पावसाची उघाड बघुन करावी. ऊस पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. हळद पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. डाळींब बागेतील अतिरिक्त फुटवे काढून घ्यावेत. डाळींब बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. चिकू बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

भाजीपाला

पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

फुलशेती

पाउस झालेल्या ठिकाणी  जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी.  काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकात तण नियंत्रण करावे. फुल पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

चारा पिके

बहूवार्षिक संकरित चारा पिकाची (डीएचएन-6, गुणवंत) लागवड 4 X 4 फुट अंतरावर करावी.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयात पशुचे खाद्य नियोजन व्यवस्थित ठेवावे व जनावरांचे खाद्य स्वच्छ व कोरडे असावे. जनावरांच्या गोठयात जिवजंतूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी वेगवेगळया आजाराच्या विशेष संसर्गजन्य आजार प्रतिबंधक लसीकरण पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने वेळेवर करून घ्यावे.

तुती रेशीम उद्योग

रेशीम कीटक संगोपनात स्वच्छतेला अनन्य साधारण महत्व आहे. हात स्वच्छ धुवूनच संगोपनगृहात प्रवेश करावा पादत्राणे गोणपाटाचे असतिल तर 2% फॉरमॅलीन मध्ये बूडवून निर्जंतूक करावे व वेगळी स्लीपर/चप्पल संगोपन गृहासाठी वापरावी. किटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक किंवा खत पेरणी/फवारणी करून आल्यानंतर संगोपनगृहात लगेच प्रवेश करू नये. रेशीम कीटकांना फांद्या खाद्य द्यावे. अळ्यांना हात लागणार नाही याची काळजी घ्यावी. संगोपन गृहात कोबा/सिमेंट काँक्रेटची फरशी करून घ्यावी. चोही बाजून अर्धा फुट खोल नाली करावी म्हणजे प्रत्येक रेशीम कीटक संगोपनानंतर निर्जंतूकीकरण करणे सोईचे होइल. 0.3 टक्के कळीचा चुना + 0.2 टक्के ब्लीचिंग पावडर म्हणजे 100 लिटर पाण्यात 300 ग्रॅम चुना व 2 कि.ग्रॅ. ब्लिचींग पावडरची रॅकवर, जमिनीवर व शेडनेटवर फवारणी करून घ्यावी.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 30/2024 - 2025         शुक्रवार, दिनांक – 12.07.2024

Tuesday, 9 July 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 09 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची तर जालना, परभणी, हिंगोली, लातूर व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 10 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 11 व 13 जुलै रोजी मराठवाडयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 12 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 12 ते 18 जुलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 14 ते 20 जूलै 2024 दरम्यान पाऊस, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

संदेश :

मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या कापूस पिकात विरळणी व तूट भरून काढणे ही कामे करून घ्यावीत. कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा ॲसिटामॅप्रिड 20 % 2 ग्रॅम प्रति 10 लिटर किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम प्रति एकर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकाची लागवड करून एक महिना झाला असल्यास कोरडवाहू कापसास 36 किलो नत्र प्रति हेक्टरी तर बागायती कापूस पिकास 60 किलो नत्र प्रति हेक्टरी वरखताची मात्रा द्यावी. तूर, मूग/उडीद व भुईमूग पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. मका पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत तण नियंत्रण करावे. केळी बागेस 50 ग्रॅम नत्र प्रति  झाड खतामात्रा द्यावी. केळी बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. आंबा बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. आंबा फळ बागेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 4 ते 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. द्राक्ष बागेतील फुटवे काढावेत. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पानाची विरळणी करून घ्यावी. द्राक्ष बागेमध्ये शेंडा खूडून घ्यावा. द्राक्ष बागेत बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. सिताफळ बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. सिताफळ बागेत तण नियंत्रण करावे.

भाजीपाला

पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात तण नियंत्रण करावे.

फुलशेती

पाउस झालेल्या ठिकाणी  जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी.  काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकात तण नियंत्रण करावे.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयात हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमूळे व कमी तापमानामुळे जनावरांचया गोठयात ओलसरपणा राहतो. कायम ओलसरपणामूळे जनावरांच्या गोठयात जिवजंतूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी वेगवेगळया आजाराच्या विशेष संसर्गजन्य आजार प्रतिबंधक लसीकरण पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने वेळेवर करून घ्यावे.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 29/ 2024- 2025    मंगळवार, दिनांक – 09.07.2024

Friday, 5 July 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 05 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 06 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात काही ठिकाणी तर दिनांक 07 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, लातूर, धाराशिव व नांदेड जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 08 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव व नांदेड जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जनेसह वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 05 ते 11 जूलै व 12 ते 18 जुलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 10 ते 16 जूलै 2024 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास (परभणी जिल्हा : पूर्णा ; लातूर जिल्हा : जळकोट ; नांदेड जिल्हा : नांदेड, बिलोली, हदगाव, देगलूर, नायगाव) शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. इतर तालूक्यात पेरणी करण्यास हरकत नाही.

संदेश :

मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. सर्वसाधारणपणे 15 जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची (मूग, उडीद, भुईमूग, खरीप ज्वारी सोडून) पेरणी करता येते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच सोयाबीन पिकाची पेरणी करावी. सोयाबीन पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतो बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने करावी ज्यामूळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन मिळते. वेळेवर पेरणी केलेल्या सोयाबीन पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमूळे सोयाबीन पिक पिवळे दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 50 ग्रॅम  किंवा 50 मिली + 19:19:19 खत 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 50 % 400 मिली प्रति एकर याप्रमाणे पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या खरीप ज्वारी पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.  पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच बाजरी पिकाची पेरणी करावी. बाजरी पिकाची पेरणी 30 जुलैपर्यंत करता येते. वेळेवर पेरणी केलेल्या बाजरी पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. ऊस पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये पालेभाज्या सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेत पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. संत्रा/मोसंबी बागेत अतिरिक्त पाणी साचत असल्यास पाण्याचा निचरा करावा. डाळींब बागेतील अतिरिक्त फुटवे काढून घ्यावेत. पाऊस झालेल्या ठिकाणी नविन चिकू बागेची लागवड करावी. नवीन चिकू लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.

भाजीपाला

पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

पाउस झालेल्या ठिकाणी  जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी.  काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकात तण नियंत्रण करावे.

चारा पिके

बहूवार्षिक संकरित चारा पिकाची (डीएचएन-6, गुणवंत) लागवड 4 X 4 फुट अंतरावर करावी.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयात हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमूळे व कमी तापमानामुळे जनावरांचया गोठयात ओलसरपणा राहतो. कायम ओलसरपणामूळे जनावरांच्या गोठयात जिवजंतूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी वेगवेगळया आजाराच्या विशेष संसर्गजन्य आजार प्रतिबंधक लसीकरण पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने वेळेवर करून घ्यावे.

तुती रेशीम उद्योग

महाराष्ट्र शासनाने तुती लागवडी करीता तुती बेणे सरळ शेतात लागवड न करता तुती रोपवाटीका तयार करून 3 महिने कालावधी झालेल्या वयाची रोपे आखणी करून 6X3X2 फुट पट्टा पध्दत लागवड करावी. या पध्दतीत 12345 झाडे प्रति हेक्टरी लागतात. रोपाने लागवड केली तर लागवडीत तूट होत नाही. अन्यथा तुट झाली तर पुन्हा तुती बेणे न लावता तुती रोपेच लावावीत. तुती बेणे पुन्हा येत नाही व तूट कायम राहते. दुसऱ्या वर्षी झाडांची संख्या प्रति हेक्टर शिफारशीप्रमाणे किंवा 90 % च्या वर राहीली तरच मनरेगा योजनेत मंजूरी मिळते.

कुक्कुट पालन

पावसामुळे कुक्कुटपालकांना पोल्ट्री बऱ्यापैकी रोगाचा सामना करावा लागत आहे. कमी तापमान आणि उच्च आर्द्रता रोगजनक आणि परजीवींच्या वाढीसाठी परिस्थिती अतिशय अनुकूल बनवते. पावसाळ्यात तुमच्याय पोल्ट्री शेडचा कंदील (छताच्या बाहेरील भाग) पाऊस झाकण्यासाठी शेड करण्यासाठी 4 ते 5 फूट पुढे असणे आवश्यक आहे. पावसाळ्यात खाद्याचे बुरशीजन्य दूषित होणे ही एक सामान्य समस्या आहे. पावसाळ्यात खाद्य कोरडया जागी साठवा. पाण्याची बॅक्टेरियोलॉजिकल तपासणी करणे आवश्यक आहे. पावसाळ्याच्या दिवसात हवेत दमटपणा वाढतो तसेच रक्ती हगवणीसारख्या रोगाचा प्रादुर्भाव होतो यासाठी लीटर नेहमी कोरडे राहील याची काळजी घ्यावी. कोलिबॅसिलोसिस, मायको टॉक्सिकोसिस याविरूध्द औषधांचे प्रतिबंधात्मक डोस, विशेषत: neodox-1 ग्रॅम/2 लिटर पाण्यातून देणे.

सामुदायिक विज्ञान

पावसाळयात हिरव्या भाजी-पाल्याचा, स्वच्छ धूवून कमी प्रमाणात वापर करावा. याशिवाय फळभाज्या, जसे की कारले, दोडके, दिलपसंद, दुधीभोपळा, बटाटा, शेंगा यांचा जास्त वापर करावा.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 28/2024 - 2025         शुक्रवार, दिनांक – 05.07.2024

Tuesday, 2 July 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील तीन दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 05 व 06 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 06 जुलै रोजी नांदेड व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 05 ते 11 जूलै दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 07 ते 13 जूलै 2024 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास (परभणी जिल्हा : पूर्णा ; लातूर जिल्हा : जळकोट ; नांदेड जिल्हा : नांदेड, बिलोली, हदगाव, देगलूर, नायगाव) शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. इतर तालूक्यात पेरणी करण्यास हरकत नाही.

संदेश :

मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या कापूस पिकात विरळणी व तूट भरून काढणे ही कामे करून घ्यावीत. कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा ॲसिटामॅप्रिड 20 % 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या तूर, मुग/उडीद, भुईमूग व मका पिकात विरळणी व नांग्या भरणे ही कामे करून घ्यावीत. पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत तण नियंत्रण करावे. केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे. आंबा बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. द्राक्ष बागेतील फुटवे काढावेत. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पानाची विरळणी करून घ्यावी. द्राक्ष बागेमध्ये शेंडा खूडून घ्यावा. सिताफळ बागेत तण नियंत्रण करावे.

भाजीपाला

पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

पाउस झालेल्या ठिकाणी  जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी.  काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयात ढगाळ व दमट वातावरणामूळे बाह्य परोपजिवी उदा. माशा, पिसवा, डास यांचा प्रादूर्भाव वाढतो. याच्या व्यवस्थापनासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या साहाय्याने उपाययोजना कराव्यात.

कृषि अभियांत्रिकी

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात. कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 27/ 2024- 2025    मंगळवार, दिनांक – 02.07.2024