Thursday, 14 April 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 05/2022 - 2023 गुरूवार, दिनांक – 14.04.2022

दिनांक 14 एप्रिल रोजी उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 14 एप्रिल रोजी उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे उन्हाळी सोयाबीन पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. उन्हाळी सोयाबीन पिकात आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. सोयाबीनचे बिजोत्पादन घेत असल्यास शेतकऱ्यांनी शेतात वेगळी दिसणारी झाडे उपटुन टाकावीत.  कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. नविन लागवड केलेलया हंगामी ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.  हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत.  सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून दिनांक 14 मार्च रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, हळदीची उघडयावर साठवण करू नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे संत्रा/मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत पाणी व्यवस्थापन करावे, आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत फळांचा आकार वाढवण्यासाठी व फळगळ होऊ नये म्हणून जिब्रॅलिक ॲसिड 2 ग्रॅम तसेच 13:00:45 1.5 किलो  प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे चिकू बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. चिकू बागेत पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे डाळींब बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. डाळींब बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. डाळींब फळबागेत फळांचा आकार वाढवण्यासाठी व फळगळ होऊ नये म्हणून 13:00:45 1.5 किलो  प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही.

भाजीपाला

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी सकाळी लवकर करावी.

फुलशेती

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे फुल पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर करावी.

चारा पिके

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे उन्हाळी चारा पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. उन्‍हाळी हंगामासाठी लागवड केलेल्‍या चारापिकात सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे.

तुती रेशीम उद्योग

पट्टा पध्दत तुती लागवड 5X3X2 फुट किंवा 6X3X2 फुट अंतरावर असेल तर सेंद्रिय पदार्थाचे किंवा काळे पॉलीथीन अच्छादन उन्हाळयात पाण्याचे बाष्पीभवन रोकण्यासाठी महत्वाचे ठरते. फेब्रुवारी मार्च महिन्यात एक एकर साठी दोन गुंठे क्षेत्रावर तुती रोप वाटीका केली तर वरच्या बाजूस शेडनेट (हिरवे 70%) खाली तुती बेने लावले तर मुळे फुटण्यास मदत होते. बेने मरण्याचे प्रमाण कमी होते पट्टा पध्दत तुती लागवडीत सेंद्रिय पध्दतीने उसाचे पाचट, गव्हाचे काड, सोयाबीन काड, गवत इत्यादी आच्छादन म्हणून वापरल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी उपयुक्त ठरते. काळे पॉलीथीन आच्छादनामूळे सूर्यप्रकाश जमिनीच्या आत शिरत नाही व तण बीज अंकूरण होत नाही म्हणून तण उगवत नाही व आपोआप तण नियंत्रण मिळते व निंदणीच्या खर्चात बचत होते. 90 सें.मी. दोन ओळीत एक 20 मिमी ठिबक लॅटरल टाकली तर झाडे जगण्याचे प्रमाण वाढते. आवश्यक तेवढेच पाणी देणे शक्य होते. द्रवरूप खते देणे सोयीचे होते.

पशुधन व्यवस्थापन

आज दिनांक 14 एप्रिल रोजी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या  वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.  

सामुदायिक विज्ञान

कपडे धुण्यास घेण्यापूर्वी  त्यांचा रंग, वापर, मळ, पोत यानुसार वर्गवारी करून, योग्य पध्दतीचा अवलंब करून स्वच्छ करावे.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 05/2022 - 2023      गुरूवार, दिनांक – 14.04.2022

Tuesday, 12 April 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 4 / 2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 12.04.2022

दिनांक 12 एप्रिल रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड व बीड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तसेच जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमानात फारशी तफावता जाणवणार नाही. दिनांक 12 एप्रिल रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड व बीड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तसेच जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 17 एप्रिल ते 23 एप्रिल, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

उन्हाळी भुईमूग पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. पिकाच्या आवश्यकतेनुसार व उपलब्धेनुसार पिकाला सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी  व्यवस्थापन करावे. उन्हाळी भुईमूग पिकात आऱ्या सुटु लागल्यास अंतरमशागतीची कामे करू नयेत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी यामुळे कलमांची मार होणार नाही तसेच  बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. केळी बागेला पाण्याचा  ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. केळी बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बागेला पाण्याचा  ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. आंबा बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच  बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. आंबा बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास  याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या जुन्या वाळलेल्या फांद्या कापून टाकाव्यात. मुख्य खोडा लगत भुसा दिसून आल्यास तारेच्या आकड्याने आतील अळ्या काढून नष्ट कराव्यात व छिदामध्ये पेट्रोलमध्ये बुडविलेला बोळा किंवा क्लोरोपायरीफॉस द्रावणाचा (2 मिली प्रती लिटर पाणी) बोळा टाकावा व छिद्र शेणाने अथवा मातीने लिपून घ्यावे.   द्राक्ष बागेमध्‍ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणीची पुर्व तयारी करून घ्‍यावी. सीताफळ बागेला पाण्याचा  ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. सीताफळ बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच  बागेत खोडाजवळ आच्छादन करावे.सीताफळ बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास  याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या जुन्या वाळलेल्या फांद्या कापून टाकाव्यात.

भाजीपाला

भाजीपाला पिकाला पाण्याचा  ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.  भाजीपाला पिकात सुष्म सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची सकाळी लवकर काढणी करून घ्यावी.

आज दिनांक 12 एप्रिल रोजी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

फुलशेती

फुल पिकाला पाण्याचा  ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. फुल पिकात सुष्म सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची सकाळी लवकर काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

आज दिनांक 12 एप्रिल रोजी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या  वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.  

जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. पशुधनाकडून सकाळी 11 ते दूपारी 4 यादरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर पाणी  शिंपडावे किंवा त्यांना पाणोठ्यावर न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.

सामुदायिक विज्ञान

कपडे धुण्यास घेण्यापूर्वी कपडयांचा तंतू विण व रंग याचा विचार करून धुण्याचे साहीत्य वापरावे.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 4 / 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 12.04.2022

Friday, 8 April 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 03/2022 - 2023 शुक्रवार, दिनांक – 08.04.2022

मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात पुढील दोन ते तिन दिवस दूपारच्या वेळी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात पुढील दोन ते तिन दिवस दूपारच्या वेळी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 13 एप्रिल ते 19 एप्रिल, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

मळणी केलेल्या हरभरा पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.  काढणी केलेलया गहू पिकाची मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे उन्हाळी सोयाबीन पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. उन्हाळी सोयाबीन पिकात आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. सोयाबीनचे बिजोत्पादन घेत असल्यास शेतकऱ्यांनी शेतात वेगळी दिसणारी झाडे उपटुन टाकावीत.  कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. नविन लागवड केलेलया हंगामी ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.  हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे संत्रा/मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत पाणी व्यवस्थापन करावे, आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत फळांचा आकार वाढवण्यासाठी व फळगळ होऊ नये म्हणून जिब्रॅलिक ॲसिड 2 ग्रॅम तसेच 13:00:45 1.5 किलो  प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी यामुळे कलमांची मर होणार नाही. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे चिकू बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. चिकू बागेत पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी यामुळे कलमांची मर होणार नाही. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे डाळींब बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. डाळींब बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. डाळींब फळबागेत फळांचा आकार वाढवण्यासाठी व फळगळ होऊ नये म्हणून 13:00:45 1.5 किलो  प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी यामुळे कलमांची मर होणार नाही.

भाजीपाला

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी सकाळी लवकर करावी.

फुलशेती

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे फुल पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर करावी.

चारा पिके

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे उन्हाळी चारा पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. उन्‍हाळी हंगामासाठी लागवड केलेल्‍या चारापिकात सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे.

तुती रेशीम उद्योग

पट्टा पध्दत तुती लागवड 5X3X2 फुट किंवा 6X3X2 फुट अंतरावर असेल तर सेंद्रिय पदार्थाचे किंवा काळे पॉलीथीन अच्छादन उन्हाळयात पाण्याचे बाष्पीभवन रोकण्यासाठी महत्वाचे ठरते. फेब्रुवारी मार्च महिन्यात एक एकर साठी दोन गुंठे क्षेत्रावर तुती रोप वाटीका केली तर वरच्या बाजूस शेडनेट (हिरवे 70%) खाली तुती बेने लावले तर मुळे फुटण्यास मदत होते. बेने मरण्याचे प्रमाण कमी होते पट्टा पध्दत तुती लागवडीत सेंद्रिय पध्दतीने उसाचे पाचट, गव्हाचे काड, सोयाबीन काड, गवत इत्यादी आच्छादन म्हणून वापरल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी उपयुक्त ठरते. काळे पॉलीथीन आच्छादनामूळे सूर्यप्रकाश जमिनीच्या आत शिरत नाही व तण बीज अंकूरण होत नाही म्हणून तण उगवत नाही व आपोआप तण नियंत्रण मिळते व निंदणीच्या खर्चात बचत होते. 90 सें.मी. दोन ओळीत एक 20 मिमी ठिबक लॅटरल टाकली तर झाडे जगण्याचे प्रमाण वाढते. आवश्यक तेवढेच पाणी देणे शक्य होते. द्रवरूप खते देणे सोयीचे होते.

सामुदायिक विज्ञान

संसर्गजन्य व्याधीने आजारी असलेल्या व्यक्तींचे कपडे काढल्याबरोबर त्वरीत ते डेटॉल मिश्रित पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये टाकावे.