Tuesday, 13 December 2022
दिनांक 14 डिसेंबर रोजी मराठवाडयामध्ये तूरळक ठिकाणी तर दिनांक 15 डिसेंबर रोजी जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा विभागामध्ये पुढील 48 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही त्यानंतर किमान तापमानात 3 ते 5 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये आकाश अंशत: ढगाळ ते ढगाळ राहून दिनांक 14 डिसेंबर रोजी मराठवाडयामध्ये तूरळक ठिकाणी तर दिनांक 15 डिसेंबर रोजी जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा विभागामध्ये पुढील 48 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही त्यानंतर किमान तापमानात 3 ते 5 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 16 ते 22 डिसेंबर दरम्यान किमान तापमान सरासरी ते
सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 18 ते 24 डिसेंबर, 2022 दरम्यान
कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी, किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा
जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. कापसाच्या
झाडावरील 40 ते 50 टक्के बोंडे फुटल्यास वेचणी करावी. वेचण्या पंधरा दिवसाच्या
अंतराने कराव्यात. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. पहिल्या आणि दूसऱ्या
वेचणीचा चांगला आणि कवडी कापूस वेगळा साठवावा. कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड
(खोडवा) घेउ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा
पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. सध्याच्या ढगाळ
वातावरणामूळे तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रार्दूभाव वाढलेला आहे. तूरीवरील
शेंगा पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5%
निंबोळी अर्क किंवा
क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी
भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे भुईमूग
पिकात मावा, फुलकिडे याचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन
मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. वेळेवर
पेरणी केलेल्या मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मका पिकावरील लष्करी अळीचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5
टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी
4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी
करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी
ज्वारी पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के
4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक
पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी
सूर्यफूल फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थमध्ये असतांना पाणी द्यावे. वेळेवर पेरणी
केलेल्या गहू पिकास राहिलेले अर्धे नत्र 109 किलो यूरिया
प्रति हेक्टरी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी देऊन आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
बागायती गहू पिकाची पेरणी केली नसल्यास लवकरात लवकर संपवावी. गव्हाची पेरणी
करतांना 154 किलो 10:26:26 + युरिया 54 किलो किंवा 87 किलो डायअमोनियम फॉस्फेट +
युरिया 53 किलो + 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा 87 किलो युरिया + सिंगल सुपर
फॉस्फेट 250 किलो + 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी.
राहिलेले अर्धे नत्र 87 किलो यूरिया प्रति हेक्टरी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी
द्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
केळीच्या बुंध्यांना माती लावावी. केळी बागेत तण नियंत्रण करून
पाणी व्यवस्थापन करावे. सध्याच्या ढगाळ
वातावरणामूळे आंब्याच्या मोहोरावर तूडतूड्यांचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास
याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा
थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. द्राक्ष बागेत वेल विस्तार
व्यवस्थापन योग्य ठेवावे त्यामूळे सुटसुटीत कॅनोपी तयार होऊन वेलीला भरपूर
सूर्यप्रकाश मिळून हवा खेळती राहील व बागेत फुलांची कुज होणार नाही.
भाजीपाला
भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मागील काही दिवसात ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला
(मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत
असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला
पिकांची काढणी करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून
घ्यावी.
फुलशेती
फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करून पाणी
व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करावी.
पशुधन
व्यवस्थापन
पुढील काळात थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया
तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून
त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत.
पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत.
सामूदायीक विज्ञान
उंचीवर ठेवलेली वस्तू काढण्यासाठी नेहमी ठरावीक उंचीच्या स्टूलचा
वापर करावा. जेणेकरून शरीराच्या स्नायूंवर अतिरिक्त ताण येणार नाही.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 74/
2022 - 2023 मंगळवार,
दिनांक –
13.12.2022
Friday, 9 December 2022
दिनांक 10 डिसेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या, दिनांक 11 व 12 डिसेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 13 डिसेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 11 डिसेंबर रोजी बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 12 डिसेंबर रोजी जालना व औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 10 डिसेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या, दिनांक 11 व 12 डिसेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 13 डिसेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 11 डिसेंबर रोजी बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 12 डिसेंबर रोजी जालना व औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा विभागामध्ये पुढील चोविस तासात किमान तापमानात फारशी
तफावत जाणवणार नाही व त्यानंतर पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात हळूहळू 2
ते 4 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 09 ते 15 डिसेंबर दरम्यान किमान तापमान सरासरी ते
सरासरी पेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे व दिनांक 16 ते 22 डिसेंबर दरम्यान किमान तापमान
सरासरी ते सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 14 ते 20 डिसेंबर, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा
कमी, किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची
शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकाची वेचणी
लवकरात लवकर करून कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापूस पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. हरभरा
पिकाची पेरणी करून 25 ते 30 दिवस झाले असल्यास 19:19:19 या खताची 100 ग्रॅम प्रति
10 लिटर पाण्यात मिसळून कोरडया हवामानात फवारणी करावी. लवकर पेरणी केलेल्या हरभरा
पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे
हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी
शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी
प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5%
(एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी
20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10
लिटर पाण्यात मिसळून कोरडया हवामानात फवारणी करावी. सध्या हरभरा पिकात मानकूजव्या
आणि मर यांच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून आळवणी करावी किंवा बायोमिक्सची आळवणी करावी. बायोमिक्सच्या
आळवणीसाठी पंपाचा नोझल काढून 200 ग्रॅम (पावडर) / 200 मिली (लिक्वीड) प्रति 10
लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे वेळेवर लागवड
केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या
व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75%
10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून कोरडया हवामानात फवारणी
करावी. करडई पिकात तणांच्या प्रादूर्भावानूसार पेरणीनंतर 25 ते 50 दिवसापर्यंत एक
ते दोन कोळपण्या व खूरपण्या घ्याव्यात. लवकर पेरणी केलेल्या करडई पिकात
आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. उशीरा लागवड केलेल्या हळद पिकात
आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी बायोमिक्स
150 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. हळदीवरील कंदमाशीच्या
व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली
किंवा डायमिथोएट 30 % 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून कोरडया हवामानात फवारणी
करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून
घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे
विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). मागील आठवडयातील ढगाळ
वातावरणामूळे ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल
18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून कोरडया हवामानात
फवारणी करावी. ऊस पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे
करून तण नियंत्रण करावे. बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. मागील
आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे संत्रा/मोसंबी बागेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या
व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 10 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8%
3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून कोरडया हवामानात फवारणी करावी.
मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव
दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा
ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे कोरडया हवामानात
फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन
(50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून कोरडया
हवामानात फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने
करावी. डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. डाळींब बागेत आवश्यकतेनूसार
पाणी व्यवस्थापन करावे. बागेतील पडलेली फळे गोळा करून व रोग ग्रस्त फांद्या काढून
नष्ट कराव्यात. तूरळक
ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने काढणीस तयार असलेल्या
चिकू फळांची काढणी करावी. तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्याने पाऊस झाल्यास बागेमध्ये ब्लोअर फिरवून द्राक्ष गुच्छांमध्ये
साठलेले पाणी निघून जाईल याची काळजी घ्यावी. गुच्छातील पाणी काढून टाकण्यासाठी
फलोत्पादन ग्रेडच्या खनिज तेलाचा (मिनरल ऑईल) चा वापर करावा.
भाजीपाला
भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून
तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मागील काही दिवसात
ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन
15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून कोरडया हवामानात
फवारणी करावी. तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
असल्याने काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी व काढणी
केलेल्या भाजीपाल्याची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
फुलशेती
फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण
नियंत्रण करून आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. तूरळक ठिकाणी गडगडाटासह
हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने काढणीस तयार असलेल्या फुल
पिकांची काढणी करावी व काढणी केलेल्या फुलांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
पशुधन
व्यवस्थापन
तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना,
विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या
ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा
बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास
खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती
अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू
होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.
तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने पशुधनास सुरक्षित ठिकाणी बांधावे.
पुढील काळात थंडी पासुन पशुधनाचे
संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे
लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच
कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया
जागी न बांधत गोठ्यात बांधावेत.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 73/2022
- 2023 शुक्रवार,
दिनांक –
09.12.2022
Tuesday, 6 December 2022
Monday, 5 December 2022
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील तिन दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील तिन दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने
घट होऊन त्यानंतर किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 02 ते 08 डिसेंबर दरम्यान किमान तापमान
सरासरी ते सरासरी पेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे व दिनांक 09 ते 15 डिसेंबर दरम्यान किमान तापमान
सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी
झालेला आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. कापसाच्या
झाडावर 40 ते 50 टक्के बोंडे फुटल्यास वेचणी करावी. वेचण्या पंधरा दिवसाच्या
अंतराने कराव्यात. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. पहिल्या आणि दूसऱ्या
वेचणीचा चांगला आणि कवडी कापूस वेगळा साठवावा. कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड
(खोडवा) घेउ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा
पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. मागील काही दिवसात
ढगाळ वातावरणामूळे तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रार्दूभाव वाढलेला आहे. तूरीवरील
शेंगा पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5%
निंबोळी अर्क किंवा
क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. उशीरा पेरणी केलेल्या तूर पिकात फुलगळ व्यवस्थापनासाठी एनएए 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या
रब्बी भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. रब्बी भुईमूग पिक पेरणी नंतर तिन
ते सहा आठवडयांनी दोन कोळपण्या आणि एक खुरपणी करावी. मागील काही दिवसात ढगाळ
वातावरणामूळे भुईमूग पिकात मावा, फुलकिडे याचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली
किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति
10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मका पिकावरील
लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन
बेन्झोढेट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा
स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची
आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे
फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकाची पेरणी करून 30 दिवस झाले असल्यास नत्राची अर्धी
मात्रा 87 किलो यूरिया प्रति हेक्टरी देऊन पाणी द्यावे. रब्बी ज्वारी पिकावरील
लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन
बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम
11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून
फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी
करावी. रब्बी सूर्यफूल पिकात अंतरमशागतीची
कामे करून तण नियंत्रण करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकास राहिलेले अर्धे
नत्र 109 किलो यूरिया प्रति हेक्टरी पेरणीनंतर 25 ते 30
दिवसांनी देऊन आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. बागायती गहू उशीरा पेरणी 15 डिसेंबर
पर्यंत करता येते. गव्हाची पेरणी करतांना 154 किलो 10:26:26 + युरिया 54 किलो
किंवा 87 किलो डायअमोनियम फॉस्फेट + युरिया 53 किलो + 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा
87 किलो युरिया + सिंगल सुपर फॉस्फेट 250 किलो + 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति
हेक्टरी खतमात्रा द्यावी. राहिलेले अर्धे नत्र 87 किलो यूरिया प्रति हेक्टरी
पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. मागील काही
दिवसात ढगाळ वातावरणामूळे आंब्याच्या मोहोरावर तूडतूड्यांचा प्रादूर्भाव दिसून येत
असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्राक्ष बागेत वांझ फांद्या काढून टाकाव्यात
तसेच घडांची विरळणी करावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मागील काही दिवसात ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला
(मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत
असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला
पिकांची काढणी करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून
घ्यावी.
फुलशेती
फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करून पाणी
व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करावी.
पशुधन
व्यवस्थापन
पुढील काळात थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया
तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड
वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब
लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत. लम्पी
स्कीन रोगाचा प्रादूर्भाव वासरांपर्यंत पोहचत आहे, तरी वासरांना लसीकरण
करण्यापूर्वी किमान पाच दिवस अगोदर पशुवैद्यक तज्ञांच्या मार्फत जंतनाशकाची मात्रा
द्यावी. लम्पी त्वचा रोगाचा प्रादूर्भाव नवीन नवीन गोवंशीय पशुना होत आहे यासाठी
(अ) ज्या पशुना लस द्यावयाची राहीली असेल त्यांना लस देऊन घ्यावी. (ब) संपूर्ण
विलगीकरण अत्यंत महत्वाचे आहे बाधीत व अबाधीत पशुंना एकमेकापासून दूर अंतरावर
बांधावे. (क) गोठ्याची स्वच्छता यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे (ड) गोठ्यामध्ये
फवारणी व किटकवर्गीय माशांचा प्रादूर्भाव कमी होण्यासाठीच्या उपाय योजना कराव्यात.
सामूदायीक विज्ञान
मक्याच्या कणसाची निरूपयोगी साल आजूबाजूला, सभोवताली फेकून देण्यात
आलेल्या आपणासा आढळते. मक्याच्या कणसांची ओल्या किंवा सुक्या सालीपासून सरासरी
11-12% तंतूचे उत्पादन
होते. साधारणपणे 40-50 दिवस इतका कालावधी पाण्यामध्ये मक्याच्या कणसाची साल
कुजण्याकरिता लागतो. मक्याच्या सालीच्या तंतूपासून उपयोगी वस्तू जसे की घासणी,
कॅसेरोलरूमाल, हॉटपॉट पिशवी, तंतूचीचटई. या सोबतच मक्याच्या कणसाच्या सालीचा उपयोग
हस्तनिर्मित कागद व त्यापासून बहूउपयोगी कागदी उत्पादने करण्यासाठी करता येतो.
तांत्रिक वस्त्र खासकरून आरोग्यदायीवस्त्र म्हणजे स्वास्थ संबंधी वस्त्रांची
निर्मिती मक्याच्या कणसाची साल वापरून करता येते.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 72/
2022 - 2023 मंगळवार,
दिनांक –
06.12.2022
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशि...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...



