Friday, 17 October 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर व लातूर जिल्हयात दिनांक 18 ऑक्टोबर रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तर दिनांक 19 ऑक्टोबर रोजी परभणी, बीड, हिंगोली, लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 20 ऑक्टोबर रोजी बीड व लातूर जिल्हयात तर दिनांक 21 ऑक्टोबर रोजी लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही तर किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 17 ते 23 ऑक्टोबर, 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त व दिनांक 24 ते 30 ऑक्टोबर, 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचीत कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

संदेश : पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता, फवारणीची, काढणीची व अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. रब्बी पिकाच्या पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकची काढणी लवकरात लवकर करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी.

तुर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

उस पिकात पांढरी माशीचा व पाकोळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी, लिकॅनीसिलियम लिकॅनी या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. रासायनिक कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली किंवा ॲसीफेट 75 % 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारावे. इमिडाक्लोपीड 17.8% कीटकनाशकासोबत 2 टक्के युरिया (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात पोक्का बोइंग या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी 50 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% डब्ल्यू पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या पावसाची उघाड बघून कराव्यात.

कंदकूजचा प्रादूर्भाव दिसून आल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी जमिनीतून कार्बेडेंझीम 50% -200 ग्रॅम (10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा मॅन्कोझेब 75% -600 ग्रॅम (30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड 50% -1000 ग्रॅम (50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकरी या प्रमाणात दरवेळी महिन्यातून एकदा आळवणी करावी. (आळवणी करताना जमिनीमध्ये वापसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण द्यावा.) हळद पिकास 25 किलो नत्र प्रति हेक्टरी सूक्ष्म सिंचन पध्दतीने तीन ते चार वेळा विभागून द्यावे. हळदीवरील पानावरील ठिपके आणि करपा याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेंडेंझीम 12 % + मॅन्कोझेब 63 % डब्ल्यूपी 25 ग्रॅम प्रति प्रति 10 लिटर पाण्यात स्टीकरसह पावसाची उघाड बघून फवारणी करावी

हरभरा पिकाच्या पेरणीसाठी लहान आकाराच्या देशी वाणासाठी 60 किलो, मध्यम आकाराचे बियाणे 70 किलो तर टपोरे दाण्याच्या काबूली वाणासाठी 100 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. बागायती हरभरा पेरणी करतांना 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 30 किलो पालाश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी. पेरणीपूर्वी मर रोगाच्या प्रतिबंधासाठी कार्बेन्डाझीम 2.5 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. तर मूळकूज या रोगाच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा 10  ग्रॅम किंवा थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.

करडई पिकाच्या पेरणीसाठी हेक्टरी 10 ते 12 किलो बियाणे वापरावे. बागायती करडई साठी शिफारशीत खतमात्रा 60:40:00 पैकी पेरणीच्या वेळी 30 किलो नत्र व 40 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे व  30 किलो नत्र एक महिन्यानी द्यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी चिलेटेड झिंक 500 ग्रॅम 100लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत रोगनाशकाची फवारणी करून घ्यावी.

डाळींब बागेत 00:00:50 1.5 किलो प्रती 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी. डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

भाजीपाला

रब्बी हंगामात ब्रोकोली, टोमॅटो, फुल कोबी व पत्ता कोबी या भाजीपाला पिकाचे गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकावे तर मुळा, गाजर, मेथी व पालक ईत्यादी पिकाची लागवड करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. नवीन लागवड केलेल्या भाजीपाला पिकास खतमात्रा देण्यात यावी.

फुलशेती

आष्टूर व जिलार्डीया या फुलपिकाची लागवड करण्यासाठी गादीवाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकावे. लांब दांड्यांच्या फुलाची (गुलाब) काढणी करतांना कळी उमलण्याच्या अवस्थेत असतांना काढणी करावी तर झेंडू, आष्टूर या सारख्या फुलांची काढणी पूर्ण उमलल्याच्या नंतर करावी.

तुती रेशीम उद्योग

भरपूर रेशीम उद्योजक शेतकरी तूती बागेस पशूधन व शेणखत उपलब्ध नसल्यामूळे देण्याचे टाळत आहेत आणि पर्यायी बाजारात उपलब्ध जाहिरातीच प्रभावामूळे तुती बागेत इतर निविष्ठा देत आहेत. जमिनीची प्रत खराब होण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जबाबदार रासायनिक खतच आहेत. नऋयुक्त खताच्या अनिर्बंध वापर वाढला असून त्यामूळे कपाशी, सोयाबीन सारखे पीके किडीस बळी पडत आहेत. रेशीम किटक संगापनानंतर तुतीची पाने, फांद्या, रेशीम कीटक विष्ठा प्रती एकर 6 टन तर हेक्टरी 15 टन पर्यंत शिल्लक राहते. त्यापासून कंम्पोस्ट खत किंवा गांडूळखत तयार करता येतो त्यासाठी 16 X 8 X 4 फुट आकाराच्या दोन खड्डयात 6 महिने तुतीचे शिल्लक अवशेष कुजवल्यास उत्तम प्रकारचा खत तयार होतो.

पशुधन व्यवस्थापन

दुधावरील जनावरांना योग्य प्रमाणात खनिज द्राव्याचे मिश्रण द्यावे तसेच हिरवा चारा (बरसीम/लुसर्ण) व सुका चारा (गव्हाचा पेंढा) यांचे पशुधनांना संतुलित आहार द्यावा. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य वेळी जंतनाशकाची औषधे देण्यात यावी.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 58/2025 - 2026         शुक्रवार, दिनांक – 17.10.2025

Tuesday, 14 October 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 15 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी जिल्हयात तर दिनांक 16 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 14 व 16ऑक्टोबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम तर दिनांक 15 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 17 व 18 ऑक्टोबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 17 ते 23 ऑक्टोबर, 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचीत कमी राहण्याची शक्यता आहे.

संदेश : काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकची काढणी लवकरात लवकर करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा विशेषत: तुडतुडे व पांढरी माशी व फुलकिडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा फलोनिकॅमिड 50 % 80 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5 % 600 मिली किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 % 160 मिली किंवा बुप्रोफेन्झीन 25 % 400 मिली प्रति एकर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात पातेगळ व बोंडगळ दिसून येत असल्यास एनएए 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. कापूस पिकात लाल्या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 20 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात.

तुर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

रब्बी ज्वारी पिकाची पेरणी 45X15 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. परेणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. रब्बी ज्वारीच्या पेरणीसाठी परभणी सुपर मोती (एसपीव्ही-2407), परभणी शक्ती (पीव्हीके-1009), परभणी  मोती (एसपीव्ही-1411), परभणी ज्योती (एसपीव्ही-1595/सीएसव्ही-18), पीकेव्ही क्रांती, फुले यशोदा, सीएसव्ही-22 आर, सीएसव्ही-29आर (एसपीव्ही-2033), मालदांडी (एम35-1), फुल रेवती (एसपीव्ही-2048), फुले सुचित्रा इत्यादी वाणांपैकी निवड करावी.

रब्बी सुर्यफुलाची पेरणीसाठी भारी जमिनीत पेरणी 60X30 सेंमी तर मध्यम जमिनीत 45X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणे वापरावे. रब्बी सुर्यफुल पेरणीसाठी एल.एस.एफ.एच-171, एल.एस.एफ.एच-35, के.बी.एस.एच-44, डी.आर.एस.एच-1, एल.एस.एफ-8, एल.एस-11, एल.एस-2038 इत्यादी वाणापैकी वाणाची निवड करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत केळी झाडांना माती लावावी व काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळी घडांची काढणी करून घ्यावी. केळी बागेत साचलेल्या अतिरिक्त पाण्यामूळे मूळकुज या रोगाच्या व्यवस्थापनासाठी रोगनाशकाची किंवा बायोमिक्सची आळवणी करावी. केळी बागेत अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत असल्यास 00:52:34 1 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. घड लागलेल्या केळी बागेत 00:00:50 1 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

आंबा फळ बागेत भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी 300 मेश गंधकाची धूरळणी करावी.

छाटणी केली नसल्यास द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणी करून घ्यावी. छाटणी केल्यानंतर द्राक्ष बागेत 1% बोर्डो मिश्रणाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

काढणीस तयार असलेल्या सिताफळांची काढणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा लिकॅनिसिलीयम लिकॅनी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

भाजीपाला

रब्बी हंगामात ब्रोकोली, टोमॅटो, फुल कोबी व पत्ता कोबी या भाजीपाला पिकाचे गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकावे तर मुळा, गाजर, मेथी व पालक ईत्यादी पिकाची लागवड करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

आष्टूर व जिलार्डीया या फुलपिकाची लागवड करण्यासाठी गादीवाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकावे. लांब दांड्यांच्या फुलाची (गुलाब) काढणी करतांना कळी उमलण्याच्या अवस्थेत असतांना काढणी करावी तर झेंडू, आष्टूर या सारख्या फुलांची काढणी पूर्ण उमलल्याच्या नंतर करावी.

पशुधन व्यवस्थापन

दुधावरील जनावरांना योग्य प्रमाणात खनिज द्राव्याचे मिश्रण द्यावे तसेच हिरवा चारा (बरसीम/लुसर्ण) व सुका चारा (गव्हाचा पेंढा) यांचे पशुधनांना संतुलित आहार द्यावा. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य वेळी जंतनाशकाची औषधे देण्यात यावी. 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 57/2025- 2026    मंगळवार, दिनांक – 14.10.2025

Friday, 10 October 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 48 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील तीन ते चार दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 48 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील तीन ते चार दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 10 ते 16 ऑक्टोबर, 2025 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचीत कमी व दिनांक 17 ते 23 ऑक्टोबर, 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचीत कमी राहण्याची शक्यता आहे.

संदेश : पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता, फवारणीची, काढणीची व अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकची काढणी लवकरात लवकर करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी.

जमिनीत साचलेल्या पाण्यामुळे किंवा ओलाव्या मुळे तूर पिकात फायटोप्थेरा रोग मोठ्या प्रमाणात पसरतो, प्रादूर्भाव दिसून आल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) मेटालॅक्झील एम 4 टक्के + मॅन्कोझेब 64 टक्के (पुर्व मिश्रीत बुरशीनाशक) प्रति एकर या प्रमाणात खोडावर आणि झाडावर फवारणी करून आळवणी पण करावी. किंवा ट्रायकोडर्मा 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) पाण्यात मिसळून प्रति एकर या प्रमाणात फवारणी व आळवणी करावी. जमिनीत वापसा असतांना तूर पिकात तण नियंत्रण करावे.

उस पिकात पांढरी माशीचा व पाकोळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी, लिकॅनीसिलियम लिकॅनी या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रासायनिक कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली किंवा ॲसीफेट 75 % 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारावे. इमिडाक्लोपीड 17.8% कीटकनाशकासोबत 2 टक्के युरिया (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात पोक्का बोइंग या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी 50 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% डब्ल्यू पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात.

कंदकूजचा प्रादूर्भाव दिसून आल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी जमिनीतून कार्बेडेंझीम 50% -200 ग्रॅम (10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा मॅन्कोझेब 75% -600 ग्रॅम (30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड 50% -1000 ग्रॅम (50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकरी या प्रमाणात दरवेळी महिन्यातून एकदा आळवणी करावी. (आळवणी करताना जमिनीमध्ये वापसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण द्यावा.) हळद पिकास 25 किलो नत्र प्रति हेक्टरी सूक्ष्म सिंचन पध्दतीने तीन ते चार वेळा विभागून द्यावे.

हरभरा पिकाची पेरणी 30X10 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी लहान आकाराच्या देशी वाणासाठी 60 किलो, मध्यम आकाराचे बियाणे 70 किलो तर टपोरे दाण्याच्या काबूली वाणासाठी 100 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. हरभरा पिकाच्या पेरणीसाठी बीडीएनजी-9-3, बीडीएनजी-797 (आकाश), दिग्विजय, जाकी-9218, साकी-9516, फुले विक्रम, फुले विक्रांत, पीडीकेव्ही कांचन, विश्वास इत्यादी वाणांपैकी निवड करावी.

करडई पिकाची पेरणी 45X20 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 10 ते 12 किलो बियाणे वापरावे. करडई पिकाच्या पेरणीसाठी शारदा, परभणी कुसुम (परभणी-12), पूर्णा (परभणी-86), परभणी-40 (निम काटेरी), अन्नेगीरी-1, एकेएस-327, एसएसएफ-708,आयएसएफ-764 इत्यादी वाणांपैकी निवड करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत 00:00:50 1.5किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत रोगनाशकाची फवारणी करून घ्यावी.

डाळींब बागेत 00:00:50 1.5 किलो प्रती 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी.

काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

भाजीपाला

रब्बी हंगामात ब्रोकोली, टोमॅटो, फुल कोबी व पत्ता कोबी या भाजीपाला पिकाचे गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकावे तर मुळा, गाजर, मेथी व पालक ईत्यादी पिकाची लागवड करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

आष्टूर व जिलार्डीया या फुलपिकाची लागवड करण्यासाठी गादीवाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकावे. लांब दांड्यांच्या फुलाची (गुलाब) काढणी करतांना कळी उमलण्याच्या अवस्थेत असतांना काढणी करावी तर झेंडू, आष्टूर या सारख्या फुलांची काढणी पूर्ण उमलल्याच्या नंतर करावी.

तुती रेशीम उद्योग

भरपूर रेशीम उद्योजक शेतकरी तूती बागेस पशूधन व शेणखत उपलब्ध नसल्यामूळे देण्याचे टाळत आहेत आणि पर्यायी बाजारात उपलब्ध जाहिरातीच प्रभावामूळे तुती बागेत इतर निविष्ठा देत आहेत. जमिनीची प्रत खराब होण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जबाबदार रासायनिक खतच आहेत. नऋयुक्त खताच्या अनिर्बंध वापर वाढला असून त्यामूळे कपाशी, सोयाबीन सारखे पीके किडीस बळी पडत आहेत. रेशीम किटक संगापनानंतर तुतीची पाने, फांद्या, रेशीम कीटक विष्ठा प्रती एकर 6 टन तर हेक्टरी 15 टन पर्यंत शिल्लक राहते. त्यापासून कंम्पोस्ट खत किंवा गांडूळखत तयार करता येतो त्यासाठी 16 X 8 X 4 फुट आकाराच्या दोन खड्डयात 6 महिने तुतीचे शिल्लक अवशेष कुजवल्यास उत्तम प्रकारचा खत तयार होतो.

पशुधन व्यवस्थापन

दुधावरील जनावरांना योग्य प्रमाणात खनिज द्राव्याचे मिश्रण द्यावे तसेच हिरवा चारा (बरसीम/लुसर्ण) व सुका चारा (गव्हाचा पेंढा) यांचे पशुधनांना संतुलित आहार द्यावा. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य वेळी जंतनाशकाची औषधे देण्यात यावी.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 56/2025 - 2026         शुक्रवार, दिनांक – 10.10.2025

Tuesday, 7 October 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 07 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तर दिनांक 08 व 09 ऑक्टोबर रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 07 ते 11 ऑक्टोबर दरम्यान तूरळक ठिक्राणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची तर किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 10 ते 16 ऑक्टोबर, 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचीत जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश : काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकची काढणी लवकरात लवकर करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी. तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिकात आंतरिक बोंड सड दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड 50% - 25 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी करावी. बाह्य बोंडसड रोखण्यासाठी, पायराक्लोस्ट्रोबीन 20% - 10 ग्रॅम किंवा मेटीराम 55% + पायराक्लोस्ट्रोबीन 5% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक)- 20 ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल 25% - 10 मिली किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन 18.2% + डायफेनोकोनॅझोल 11.4% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक) - 10 मिली किंवा प्रोपीनेब 70% - 25 ते 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकात पातेगळ व बोंडगळ दिसून येत असल्यास एनएए 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा क्रेसोक्सिम-मिथाइल 44.3% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. कापूस पिकात लाल्या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 20 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात.

जमिनीत साचलेल्या पाण्यामुळे किंवा ओलाव्या मुळे तूर पिकात फायटोप्थेरा रोग मोठ्या प्रमाणात पसरतो, प्रादूर्भाव दिसून आल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) मेटालॅक्झील एम 4 टक्के + मॅन्कोझेब 64 टक्के (पुर्व मिश्रीत बुरशीनाशक) प्रति एकर या प्रमाणात खोडावर आणि झाडावर फवारणी करून आळवणी पण करावी. किंवा ट्रायकोडर्मा 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) पाण्यात मिसळून प्रति एकर या प्रमाणात पावसाची उघाड बघून फवारणी व आळवणी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमूळे तूर पिक पिवळे दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 @ 50 ग्रॅम  किंवा 50 मिली + 19:19:19 खत 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी.

काढणीस तयार असलेल्या मका पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

रब्बी ज्वारीची लागवड मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. हलकी जमिन शक्यतो टाळावी कारण अशा जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता राहत नाही मग पिकाच्या संवेदनशील काळात पाणी कमी पडते.

रब्बी सूर्यफुलाची लागवड मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणाऱ्या, उत्तम निचरा असणाऱ्या व जमिनीचा सामू 6.5 ते 8 असणाऱ्या जमिनीत करावी. पाणथळ किंवा आम्लयूक्त जमिन लागवडीसाठी टाळावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत केळी झाडांना माती लावावी व काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळी घडांची काढणी करून घ्यावी. केळी बागेत साचलेल्या अतिरिक्त पाण्यामूळे मूळकुज या रोगाच्या व्यवस्थापनासाठी रोगनाशकाची किंवा बायोमिक्सची आळवणी करावी. केळी बागेत अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत असल्यास 00:52:34 1 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. केळी बागेत अतिरिक्त पाण्यामूळे पाने पिवळी दिसून येत असल्यास त्यासाठी 19:19:19 1 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

आंबा फळ बागेत  किडीचा व रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी बागेत किटक नाशकाची व रोगनाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

छाटणी केली नसल्यास द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणी करून घ्यावी. छाटणी केल्यानंतर द्राक्ष बागेत 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.

काढणीस तयार असलेल्या सिताफळांची काढणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

भाजीपाला

रब्बी हंगामात ब्रोकोली, टोमॅटो, फुल कोबी व पत्ता कोबी या भाजीपाला पिकाचे गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकावे तर मुळा, गाजर, मेथी व पालक ईत्यादी पिकाची लागवड करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

आष्टूर व जिलार्डीया या फुलपिकाची लागवड करण्यासाठी गादीवाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकावे. लांब दांड्यांच्या फुलाची (गुलाब) काढणी करतांना कळी उमलण्याच्या अवस्थेत असतांना काढणी करावी तर झेंडू, आष्टूर या सारख्या फुलांची काढणी पूर्ण उमलल्याच्या नंतर करावी.

पशुधन व्यवस्थापन

दुधावरील जनावरांना योग्य प्रमाणात खनिज द्राव्याचे मिश्रण द्यावे तसेच हिरवा चारा (बरसीम/लुसर्ण) व सुका चारा (गव्हाचा पेंढा) यांचे पशुधनांना संतुलित आहार द्यावा. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य वेळी जंतनाशकाची औषधे देण्यात यावी. 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 55/2025- 2026    मंगळवार, दिनांक – 07.10.2025