Friday 22 October 2021

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील पाच दिवसात किमान तापमान 17.0 ते 20.0 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार  मराठवाडयात पूढील पाच दिवसात किमान तापमान 17.0 ते 20.0 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 27 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

जमिनीत वापसा येताच बागायती हरभरा पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे करून घ्यावी. बागायती हरभरा पिकाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. पेरणीपूर्वी बियाण्यास पीएसबी, रायझोबियम जिवाणू संवर्धनाची आणि ट्रायकोडर्मा व्हीरीडी या  जैविक बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करावी.जमिनीत वापसा येताच गहू पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे करून घ्यावी.पूर्व हंगामी ऊसाची लागवड 15 नोव्हेंबर पर्यंत करता येते.हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). हळदीच्या पानावरील ‍ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. संत्रा/मोसंबी फळबागेत फळगळ होऊ नये म्हणून तसेच फळाचा आकार वाढण्यासाठी जिब्रॅलिक ॲसिड 50 मिली ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.डाळींब बागेत फळांचा आकार वाढण्यासाठी 00:00:50 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.नविन लागवड केलेल्या चिकू बागेत जमिनीत वापसा येताच अंतरमशागतीची कामे करून तणव्यवस्थापन करावे. 

भाजीपाला

भाजीपाला पिकात तण व्यवस्थापन करावे.काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून बाजारपेठेत पाठवावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या झेंडू व इतर फुल पिकांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

 

चारा पिके

रब्बी हंगामात ज्वारी, ओट, बरसीम, लसूण घास इत्यादी चारा पिकांची लागवड करावी.

तुती रेशीम उद्योग

तुती छाटणी दूसऱ्या वर्षापासून प्रत्येक 1.5 महिन्याच्या अंतराने एक कोषाचे पीक या प्रमाणे करावी. 70-80 दिवसात दोन पीके वर्षात एकूण 7 ते 8 पीके घेता येतात. तुती वृक्ष जमिनीपासून 1.5 फुट (उंच छाटणी), 30 सें.मी. वरून (मध्यम छाटणी) व 20-25 सें.मी. वरून तळछाटणी अशा तिन प्रकारे करता येते. दुसऱ्या वर्षापासून एका ठिकाणी एक झाड ठेवावे. बाजूचे फुटवे काढून टाकावेत म्हणजे मुख्य खोडास परिपक्व पाने येतात. परिपक्व तुती पाने खाद्य रेशीम कीटकास खाद्य म्हणून दिल्यास कीटकाची दणकट वाढ होते.

सामुदायिक विज्ञान

पैशाचा योग्य वापर होण्यासाठी पैशाचे नियोजन करून घर खर्चाची नोंद हिशोब वहीत योग्य प्रकारे ठेवल्यास विविध गोष्टींवर होणाऱ्या खर्चाची तपशीलवार माहिती मिळते व भविष्यातील अनावश्यक गोष्टींवर होणारा खर्च टाळता येतो.

 

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक59 / 2021 - 2022      शुक्रवार, दिनांक - 22.10.2021

  

No comments:

Post a Comment

दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात व दिनांक 15 मे रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दिनांक 14 मे रोजी लातूर, धाराशिव, जालना व परभणी जिल्हयात तर दिनांक 15 मे बीड, धाराशिव व जालना जिल्हयात तर दिनांक 16 मे रोजी धाराशिव, लातूर, बीड जिल्हयात व दिनांक 17 मे रोजी धाराशिव, लातूर व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर ज...