Tuesday, 30 November 2021
दिनांक 01 डिसेंबर रोजी औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 02 डिसेंबर रोजी औरंगाबाद, बीड, जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमिटर) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 01 ते 04 डिसेंबर दरम्यान तूरळक ठिकाणी खूप हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 01 डिसेंबर रोजी औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद
जिल्हयात तर दिनांक 02 डिसेंबर रोजी औरंगाबाद, बीड, जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी
वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमिटर) राहून हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 01 ते 04 डिसेंबर दरम्यान तूरळक
ठिकाणी खूप हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 05 डिसेंबर ते 11
डिसेंबर, 2021 दरम्यान कमाल
तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर
पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या
व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. सुरुवातीस
5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादूर्भाव जास्त असल्यास प्रोफेनोफॉस 50%
400 मिली किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन
4% (संयूक्त किटकनाशक) 400 मिली प्रति एकर आलटून पालटून
फवारणी करावी. तूरळक ठिकाणी वादळी वारा तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेता वेचणीस
तयार असलेल्या कापूस पिकाची वेचणी करून घ्यावी व सुरक्षीत ठिकाणी साठवणूक करावी.
पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे ढकलावीत.तूरीवरील शेंगा पोखरणारी
अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 एसजी 4.5
ग्राम किंवा फल्यूबँडामाइड 39.35 एससी 3 मिली किंवा
क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 एससी 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तूर पिकात फुलगळ व्यवस्थापनासाठी एनएए 3 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. तुर पिकात फायटोप्थोरा ब्लाईट प्रादूर्भाव दिसून
आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटालॅक्झील 4% + मॅन्कोझेब
64% डब्ल्यूपी 25
ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खोडाभोवती आळवणी व खोडावार फवारणी करावी.तूरळक
ठिकाणी वादळी वारा तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेता तूर पिकास पाणी देणे व फवारणीची
कामे पूढे ढकलावीत.वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी
अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 %
+ लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी
4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.तूरळक ठिकाणी वादळी वारा तसेच
पावसाचा अंदाज लक्षात घेता रब्बी ज्वारी
पिकास पाणी देणे व फवारणीची कामे पूढे ढकलावीत.रब्बी सूर्यफूल पिकात
अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.तूरळक ठिकाणी वादळी वारा तसेच पावसाचा
अंदाज लक्षात घेता रब्बी सूर्यफूल पिकास पाणी देणे व फवारणीची कामे पूढे ढकलावीत.ढगाळ
वातावरणामूळे वेळेवर लागवड केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत
असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली
किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी.तूरळक ठिकाणी वादळी वारा तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेता करडई पिकास
पाणी देणे व फवारणीची कामे पूढे ढकलावीत.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेत झाडांना काठीने आधार
द्यावा, बागेतील वाळलेली व रोगट पाने काढून नष्ट करावीत. तूरळक ठिकाणी वादळी वारा
तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेता केळी बागेत पाणी देणे व फवारणीची कामे पूढे
ढकलावीत. केळी बागेत झाडांना काठीने आधार द्यावा. द्राक्ष बागेत जिब्रॅलिक ॲसिड 20
पीपीएम ची दूसरी फवारणी करावी.तूरळक ठिकाणी वादळी वारा तसेच पावसाचा अंदाज लक्षात
घेता द्राक्ष बागेत पाणी देणे व फवारणीची कामे पूढे ढकलावीत.तूरळक ठिकाणी वादळी
वारा तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या
सिताफळांची काढणी करून घ्यावी.
भाजीपाला
पुर्नलागवड केलेल्या भाजीपाला (वांगी,
टोमॅटो, कांदा, फुलकोबी, पत्ताकोबी) पिकात तण नियंत्रण करून आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी व प्रतवारी करून
बाजारपेठेत पाठवावी. मागील काही दिवसातील ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला पिकात रसशोषण
करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहेत. भाजीपाला (मिरची, वांगे व
भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी
पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10
मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी.तूरळक ठिकाणी वादळी वारा तसेच
पावसाचा अंदाज लक्षात घेता पुर्नलागवड केलेल्या भाजीपाला (वांगी, टोमॅटो, कांदा,
फुलकोबी, पत्ताकोबी) पिकात पाणी देणे व फवारणीची कामे पूढे ढकलावीत. तसेच काढणीस
तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.
फुलशेती
तोडणीस तयार असलेल्या फुलपिकांची तोडणी
करून घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. तूरळक ठिकाणी वादळी
वारा तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेता फुलपिकांची तोडणी लवकरात लवकर करून घ्यावी,
फुल पिकात पाणी देणे व फवारणीची कामे पूढे ढकलावीत.
पशुधन व्यवस्थापन
पुढील काळात थंडी पासुन पशुधनाचे
संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे
लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल.वादळी वारा,
मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना
उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व
पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबु नये.
सामुदायिक विज्ञान
वृध्दावस्थेत काम करण्याची क्षमता कमी
झाल्यामूळे मानवी उर्जेची मागणी वाढते.
त्यामूळे क्षमतेचा आवाका पाहून कामे करावीत.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 70
/ 2021 - 2022 मंगळवार, दिनांक – 30.11.2021
Friday, 26 November 2021
Thursday, 25 November 2021
मराठवाडयात पुढील अठ्ठेचाळीस तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. त्यानंतर किमान तापमानाता हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाडयात पुढील अठ्ठेचाळीस तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार
नाही. त्यानंतर किमान तापमानाता हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 01 डिसेंबर ते 07 डिसेंबर,
2021 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची
तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
मागील काही दिवसात ढगाळ वातावरणामूळे वेळेवर
पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या
व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20
मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी.उशीरा बागायती गहू पिकाची पेरणी 15 डिसेंबर पर्यंत
करता येते. उशीरा बागायती गहू पिकाच्या पेरणीसाठी निफाड-34, पीबीएन-142 (कैलास),
एचडी-2501, एचडी-2833 या वाणांची निवड करावी. उशीरा बागायती गहू पिकाच्या
पेरणीसाठी 80:40:40 किलो नत्र, स्फुरद व पालाश खताची शिफारस आहे त्यापैकी पेरणी
वेळी अर्धे नत्र व पूर्ण स्फुरद व पालाश खत मात्रा द्यावी.रब्बी भुईमूग पिकात
आवश्यकतेनूसा तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.ऊस पिकाची तोडणी 12 ते 13
महिन्यांनी ऊस पक्व झाल्यानंतर करावी.मागील काही दिवसात ढगाळ वातावरणामूळे हळद
पिकावर पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी
अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली +
5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव
दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25%
20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद
पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत
संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).
फळबागेचे व्यवस्थापन
ढगाळ वातावरणामूळे लिंबूवर्गीय फळपिकात पाने पोखरणाऱ्या अळीच्या
व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8% 2.5 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा
प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा
प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम
प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15
दिवसांच्या अंतराने करावी. डाळींब बागेत फळांनी भरलेल्या फांद्यांना आधार
देण्यासाठी योग्य स्टॅकिंग किंवा आधार करावा. जर मृग बहार लवकर घतला असेल आणि फळ
पूर्ण पक्व होऊन सालीचा व दाण्यांचा रंग विकसीत झाला असेल तर फळगळ आणि बूरशीचे डाग
टाळण्यासाठी वेळेत फळांची तोडणी करावी.काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी
करून घ्यावी
भाजीपाला
मागील काही दिवसातील ढगाळ वातावरणामूळे
भाजीपाला पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहेत. भाजीपाला (मिरची,
वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या
किडींच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा
डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पूर्नलागवड
केलेल्या भाजीपाला पिकात तूट भरून काढावी व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी
करून घ्यावी. पूर्नलागवड केलेल्या फुलपिकात तूट भरून काढावी व आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे.
चारा पिके
रब्बी हंगामासाठी लागवड केलेल्या
ज्वारी, ओट, बरसीम, लसूण घास इत्यादी चारा पिकांना आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
तुती रेशीम उद्योग
रेशीम कोष उत्पादन सूरू केल्यानंतर 2
वर्षापर्यंत चांगले कोषाचे उत्पन्न मिळते. कोषउत्पादनात सातत्य ठेवण्यासाठी
उत्पादन वाढीसाठी व रेशीम कीटक संगोपन गृहात निर्जूंतूकीकरण सातत्याने करावे. 140
ते 200 मिली निर्जंतूक द्रावण प्रति चौरस मीटर क्षेत्रावर वरील बाजूच्या शेड
नेटवर फवारणी करावी. शेडनेटवर बसणारे जिवाणू-विषाणू-रोगकारक द्रावणाबरोबर बाहेर
वाहून जाणे आवश्यक आहे. शेडनेट प्रवेश द्वारावर – बाजूस ब्लिचींग पावडर व चूणा
पावडर मिश्रणाची धूरळणी किंवा पाण्यात मिसळून सडा सींपडावा. संगोपन गृहात
स्वतंत्रा चप्पल असावी. हात स्वच्छ धूवावेत व मास्क व हातमोजे वापरावे.
सामुदायिक विज्ञान
आयूष्यातील उत्तम ध्येय सिध्दीसाठी
जीवन चक्राच्या सुरूवातीच्या टप्प्यात जीवनाची दीर्घकालीन उद्दिष्टे विचारपूर्वक
निश्चित केली पाहिजेत.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 69/2021
- 2022 शुक्रवार, दिनांक - 26.11.2021
Tuesday, 23 November 2021
Monday, 22 November 2021
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात हळूहळू किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान
केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात
हळूहळू किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे.
विस्तारीत
अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 28 नोव्हेंबर ते 04डिसेंबर, 2021 दरम्यान कमाल
तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस
सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या
व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. सुरुवातीस
5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादूर्भाव जास्त असल्यास प्रोफेनोफॉस 50%
400 मिली किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन
4% (संयूक्त किटकनाशक) 400 मिली प्रति एकर आलटून पालटून
फवारणी करावी. सध्या ढगाळ वातावरणामूळे तूरीवर किडींचा प्रादूर्भाव तसेच फुलगळ होण्याची
शक्यता आहे. तूरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट
5 एसजी 4.5 ग्राम किंवा फल्यूबँडामाइड 39.35 एससी 3 मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 एससी 3 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकात फुलगळ व्यवस्थापनासाठी एनएए 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.वेळेवर पेरणी केलेल्या
रब्बी ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % + लॅमडा सायहॅलोथ्रीन
9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी.रब्बी सूर्यफूल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.ढगाळ
वातावरणामूळे वेळेवर लागवड केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत
असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली
किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेत झाडांना काठीने आधार
द्यावा. बागेतील वाळलेली व रोगट पाने काढून नष्ट करावीत. केळी बागेत पालाश 50
ग्रॅम खतमात्रा प्रति झाड द्यावी. आंबा फळबागेत चांगला मोहोर लागण्यासाठी बागेस
पाणी देऊ नयेद्राक्ष बागेत जिब्रॅलिक ॲसिड 10 पीपीएम ची फवारणी करावी.
भाजीपाला
पुर्नलागवड केलेल्या भाजीपाला (वांगी,
टोमॅटो, कांदा, फुलकोबी, पत्ताकोबी) पिकात तण नियंत्रण करून आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी व प्रतवारी करून
बाजारपेठेत पाठवावी. मागील काही दिवसातील ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला पिकात रसशोषण
करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहेत. भाजीपाला (मिरची, वांगे व
भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी
पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10
मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
तोडणीस तयार असलेल्या फुलपिकांची तोडणी करून घ्यावी.
फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
पशुधन व्यवस्थापन
पुढील काळात थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी
शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या
थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल.
सामुदायिक विज्ञान
मानवी जीवनातील सुरूवातीच्या आठ वर्षाच्या काळात
बालकांचा विकास अत्यंत झपाटयाने होत असतो. तेव्हा या काळात बालकांच्या सर्वांगीण
विकासाला पूरक, चालना देणारे वातावरण पुरवणे ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 68
/ 2021 - 2022 मंगळवार, दिनांक – 23.11.2021
Thursday, 18 November 2021
Wednesday, 17 November 2021
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात दिनांक 18 नोव्हेंबर रोजी तर बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात दिनांक 19 नोव्हेंबर रोजी तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमिटर) राहून पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाडयात औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात
दिनांक 18 नोव्हेंबर रोजी तर बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात दिनांक 19 नोव्हेंबर
रोजी तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40
किलोमिटर) राहून पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात
पुढील दोन ते तिन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणावणार नाही.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या माहितीनुसार मराठवाडयात सध्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय
बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला दिसून येत आहे म्हणून रब्बी पिके, फळबाग, भाजीपाला,
फुलझाडे व चारापिके यांना पाणी देण्याची गरज आहे जेणेकरून पिकांना पाण्याचा ताण
बसणार नाही.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर, 2021 दरम्यान कमाल
तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त
राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
तापमानात झालेल्या वाढीमूळे हरभरा पिकात
आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. हरभरा पिकात एकरी दोन कामगंध
सापळे लावावेत. बागायती गहू (उशीरा) पेरणी पूर्वी बियाण्यास थायरम या बूरशीनाशकाची
3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया तसेच 250 ग्रॅम अझोटोबॅक्टर व 250 ग्रॅम स्फूरद विरघळणारे जिवाणू प्रति 10
किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.तापमानात झालेल्या वाढीमूळे रब्बी भुईमूग पिकात
आवश्यकतेनूसा तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.ऊस पिकात तणनियंत्रणासाठी लागवडी
नंतर व उगवणीपूर्वी 2.5 किलो ॲट्रॅझीन 700 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी
फवारणी करावी.मागील काही दिवसात ढगाळ वातावरणामूळे हळद पिकावर पानावरील ठिपके
रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन
18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10
लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा
डायमिथोएट 30 % 10 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी
करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून
घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे
विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).
फळबागेचे व्यवस्थापन
लिंबूवर्गीय फळपिकात पाने पोखरणाऱ्या अळीच्या
व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8% 2.5 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा
प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा
प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम
प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15
दिवसांच्या अंतराने करावी. डाळींब बागेत फळांनी भरलेल्या फांद्यांना आधार
देण्यासाठी योग्य स्टॅकिंग किंवा आधार करावा. जर मृग बहार लवकर घतला असेल आणि फळ
पूर्ण पक्व होऊन सालीचा व दाण्यांचा रंग विकसीत झाला असेल तर फळगळ आणि बूरशीचे डाग
टाळण्यासाठी वेळेत फळांची तोडणी करावी.काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी
करून घ्यावी.
भाजीपाला
मागील काही दिवसातील ढगाळ व दमट
वातावरणामूळे भाजीपाला पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहेत.
भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात
रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन
15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी
करून घ्यावी. पूर्नलागवड केलेल्या शेवंती, जिलारडीया फुलपिकात आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे.
चारा पिके
रब्बी हंगामासाठी लागवड केलेल्या
ज्वारी, ओट, बरसीम, लसूण घास इत्यादी चारा पिकांना आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
तुती रेशीम उद्योग
ज्या शेतकऱ्याच्या शेतात पूर्वी
तंबाखू, मिरची, भाजीपाला पिक असेल त्या ठिकाणी तूतीची लागवड करू नये. त्या जमिनीत
रोग कारक बळावलेले असल्याने तुतीची रोपे मृत पावतात. पूर्वीच्या पिकास दिलेल्या
कीटकनाशकाचा अंश तूतीच्या पानामध्ये येतो आणि तुती पाने रेशीम किटकास खाद्य म्हणून
दिल्यानंतर अळया मृत पावतात. दाणेदार किंवा रासायणीक किटकनाशके रेशीम किटकाच्या
मृत्यूचे कारण ठरते आहे. त्याच बरोबर जास्त रासायणीक नत्रयूक्त खत मात्रा तुतीला
देण्याची शिफारस नाही. उदा. डीएपी.
सामुदायिक विज्ञान
गर्भावस्थेत सुरूवातीच्या दोन महिन्यात
गर्भाचे प्रमुख अवयव जसे की ऱ्हदय, मज्जातंतू नलिका, डोळे, नाक, कान, हात, पाय
यांच्या प्राथमिक विकसनास सुरूवात होते. त्यामूळे अगदी सुरूवातीपासून गर्भवतीची
सर्वतोपरी काळजी घेणे नितांत गरजेचे आहे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 67/2021
- 2022 गुरूवार, दिनांक - 18.11.2021
Tuesday, 16 November 2021
मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या
स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत
जाणावणार नाही
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर, 2021 दरम्यान कमाल
तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची तर पाऊस
सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या
व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. सुरुवातीस
5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादूर्भाव जास्त असल्यास प्रोफेनोफॉस 50%
400 मिली किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन
4% (संयूक्त किटकनाशक) 400 मिली प्रति एकर आलटून पालटून
फवारणी करावी. पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता
असल्यामूळे वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. सध्या ढगाळ
वातावरणामूळे तूरीवर किडींचा प्रादूर्भाव तसेच फुलगळ होण्याची शक्यता आहे.
तूरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 एसजी 4.4
ग्राम किंवा फल्यूबँडामाइड 39.35 एससी 2 मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5
एससी 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकात फुलगळ
व्यवस्थापनासाठी एनएए 2 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.रब्बी
ज्वारी पिकात आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.रब्बी सूर्यफूल
पिकात आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.करडई पिकात आवश्यकतेनूसार
तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेत आवश्यकतेनूसार सूक्ष्म
सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.आंबा फळबागेत चांगला मोहोर लागण्यासाठी बागेस पाणी देऊ
नये. द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.पुढील पाच दिवसात तूरळक
ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या
सिताफळाची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी.
भाजीपाला
पुर्नलागवड केलेल्या भाजीपाला (वांगी,
टोमॅटो, कांदा, फुलकोबी, पत्ताकोबी) पिकात तण नियंत्रण करून आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे. पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून प्रतवारी करून
बाजारपेठेत पाठवावी.
फुलशेती
तोडणीस तयार असलेल्या फुलपिकांची तोडणी करून घ्यावी.
फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
पशुधन व्यवस्थापन
पुढील काळात थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी
शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे
पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल.
सामुदायिक विज्ञान
मानवी जीवनातील सुरूवातीच्या आठ वर्षाच्या काळात
बालकांचा विकास अत्यंत झपाटयाने होत असतो. तेव्हा या काळात बालकांच्या सर्वांगीण
विकासाला पूरक, चालना देणारे वातावरण पुरवणे ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 66
/ 2021 - 2022 मंगळवार, दिनांक – 16.11.2021
Friday, 12 November 2021
Thursday, 11 November 2021
मराठवाडयातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड व बीड जिल्हयात दिनांक 13 व 14 नोव्हेंबर रोजी तर बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात दिनांक 15 व 16 नोव्हेंबर रोजी तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमिटर) राहून पावसाची शक्यता आहे. तसेच परभणी व हिंगोली जिल्हयात दिनांक 14 व 15 नोव्हेंबर रोजी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाडयातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड व बीड जिल्हयात दिनांक 13 व
14 नोव्हेंबर रोजी तर बीड, लातूर व
उस्मानाबाद जिल्हयात दिनांक 15 व 16 नोव्हेंबर रोजी तूरळक ठिकाणी वादळी वारा,
विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमिटर) राहून पावसाची शक्यता
आहे. तसेच परभणी व हिंगोली जिल्हयात दिनांक 14 व 15 नोव्हेंबर रोजी अतिशय हलक्या
स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात
पुढील 3 ते 4 दिवसात किमान तापमानात हळूहळू
2 ते 3 अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे.
विस्तारीत
अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर, 2021 दरम्यान कमाल
तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची
शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
हरभरा पिकाच्या जोमदार वाढीसाठी पिक
सुरूवातीपासून तण विरहीत ठेवावे. वेळेवर पेरणी केलेल्या हरभरा पिकात पेरणीनंतर 20 ते
25 दिवसांनी पहिली कोळपणी करावी.गहू पिकाच्या वेळेवर पेरणीसाठी 100 ते 120 किलो तर
उशीरा पेरणीसाठी 125 ते 150 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. दोन ओळीतील अंतर
22.5 सेंमी ठेवून पेरणी करावी.वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी भुईमूग पिकाची पेरणी
करुन तीन आठवडे झाले असल्यास पहिली कोळपणी करावी.पूर्व हंगामी ऊसाची लागवड केली
नसल्यास ती लवकरात लवकर म्हणजे 15 नोव्हेंबर पर्यंत करून घ्यावी.हळद पिकात
कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या
अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद
पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत
संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).
फळबागेचे व्यवस्थापन
लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा
प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा
प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम
प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15
दिवसांच्या अंतराने करावी. रसशोषणाऱ्या पतंगामूळे होणारे नूकसान टाळण्यासाठी
फळांना पॉलिप्रोपीलीन नॉन ओव्हन किंवा बटर पेपर बॅगने झाकावे. झाकण्यापूर्वी तेलकट
डागासाठी, पिठया ढेकून किंवा बागेतील किडींचा प्रादूर्भाव विचारात घेऊन योग्य
जिवाणू नाशकाची, किटकनाशकची आणि बूरशीनाशकाची फवारणी करावी.काढणीस तयार असलेल्या
चिकू फळांची काढणी करून घ्यावी.
भाजीपाला
मिरची पिकावर रसशोषण करणाऱ्या किडीचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन
15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून प्रतवारी करावी व
बाजारपेठेत पाठवावी.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या झेंडू फुलांची
काढणी करून घ्यावी. पूर्नलागवडीस तयार असलेल्या शेवंतीच्या रोपांची पूर्नलागवड
करावी.
चारा पिके
रब्बी हंगामासाठी लागवड केलेल्या
ज्वारी, ओट, बरसीम, लसूण घास इत्यादी चारा पिकांना आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
तुती रेशीम उद्योग
बाजारात रेशीम कोषास चांगला भाव
मिळण्यासाठी उत्तम प्रतीची कोष निर्मिती होणे आवश्यक आहे. एका कोषाचे वजन 1.5 ते
2.0 ग्रॅम हवे त्यासाठी 10 परिपक्व अळयांचे वजन 45 ग्रॅम पर्यंत हवे. उत्तम
प्रतीच्या तुती पानाची त्यासाठी गरज असते. गोणपाट पोत्यात किंवा कॅरेट मध्ये भरून
कोष नेत असताना कोष काढणी नंतर प्रतवारी करून घ्यावी. डबल कोष, डागाळलेले कोष, पोचट
कोष आणि ओबडधोबड (वेगवेगळया आकाराचे) असणारे कोष वेगळे करून सर्व चांगले कोष वेगळे
करावेत. सर्व कोष एकत्र असतील तर कमी भाव मिळतो व शेतकऱ्यांचे नूकसान होते. कोष शासकीय खरेदी केंद्रातच विक्री करावे
म्हणजे प्रति किलो 50 रूपये
अनुदानाचा फायदा मिळतो. कडता घेतल्या जात
नाही.
सामुदायिक विज्ञान
गर्भावस्थेत सुरूवातीच्या दोन महिन्यात
गर्भाचे प्रमुख अवयव जसे की ऱ्हदय, मज्जातंतू नलिका, डोळे, नाक, कान, हात, पाय यांच्या
प्राथमिक विकसनास सुरूवात होते. त्यामूळे अगदी सुरूवातीपासून गर्भवतीची सर्वतोपरी
काळजी घेणे नितांत गरजेचे आहे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 65/2021
- 2022 शुक्रवार, दिनांक - 12.11.2021
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तूरळ...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 23 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालन...