Monday, 28 February 2022
मराठवाडयात पुढील पाच दिवस कमाल तापमानात 1 ते 2 अं.सें. ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात दिनांक 02 ते 04 मार्च, 2022 दरम्यान ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस कमाल तापमानात 1 ते 2 अं.सें. ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात दिनांक 02 ते 04 मार्च, 2022 दरम्यान ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग व जमिनीतील ओलावा
कमी झालेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
विस्तारीत
अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 06 मार्च ते 12 मार्च, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी
राहण्याची शक्यता आहे.
पीक व्यवस्थापन
उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व
लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम
12.6 % + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10
लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील चिकटा
व्यवस्थापनासाठी कार्बेंडाझीम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी पिकाची काढणी
करून घ्यावी. वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या
किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रीड 17.8% 2.5 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5% 6 मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% 3 मिली (संयूक्त किटकनाशक) प्रति
10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. उन्हाळी भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार ठिबक किंवा तूषार
सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. उशीरा पेरणी केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव
दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी
पिकात घडांना काठीने आधार द्यावा. बागेतील वाळलेली व रोगग्रस्त पाने काढून नष्ट
करावीत. केळी
बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. आंबा
फळबागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी एनएए 10 पीपीएम
(प्लॅनोफिक्स 2.5 मिली प्रति 10 लिटर पाणी) ची फवारणी करावी. आंबा मोहोर
संरक्षणासाठी 300 मेश गंधकाची धूरळणी करावी म्हणजे भूरी व करपा रोगापासून बागेचे
संरक्षण होईल. आंबा बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस
तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी.
भाजीपाला
कांदा
पिकावरील करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबिन + डायफेनकोनॅझोल 10 मिली
+ स्टीकर 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची पिकावरील फुलकिडे याच्या
व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रिन 30% ईयी 3.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एसएल 3.2 मिली किंवा फिप्रोनिल 5% एससी 20 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 7.7% एससी 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार सूक्ष्म सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे.
फुलशेती
काढणीस
तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनूसार सूक्ष्म सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे.
पशुधन
व्यवस्थापन
पशुधनावर सध्या प्रचंड प्रमाणामध्ये पिसवांचा
प्रादुर्भाव होत आहे. पिसवांचा प्रादुर्भाव आढळल्यास पशुधनास आहे त्या गोठ्यापासून
काही काळासाठी दुर अंतरावर बांधावे. त्या गोठयातील जाळै/जळमटे स्वच्छ करावेत व या
गोठयामध्ये 4% मिठाचे द्रावण सर्वत्र फवारावे. लागण झालेल्या पशुधनावरती 5% निंबोळी अर्क अथवा वनस्पतीजन्य
किटकनाशकाचे द्रावण (15 मिली निंबोळी तेल + 15 मिली कारंज तेल + 2 ग्रॅम साबण + 1
लिटर पाणी) फवारावे अथवा पशुवैद्यक तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली रासायनीक किटकनाशकाची
फवारणी करावी. उन्हाळी हंगामात हवा गरम होऊन तापमान वाढते. पशुधनाच्या शेडच्या
पत्र्यावर गवताचे किंवा ऊसाच्या पाचटाचे आच्छादन केल्यास शेडचा पत्रा तापत
नाही. या प्रक्रियेमुळे शेडमधील तापमान योग्य राहण्यास मदत होते.
सामुदायिक विज्ञान
शरीरातील
सर्व कामे व्यवस्थीत करण्याकरिता
व आपल्या ऱ्हदयाचे
ठोके व्यवस्थीत राहण्यासाठी मिठाचीगरज असते. मिठामुळे
चव चांगली येते पण मिठाचा वापर कमी करावा. कारण
जास्त मिठाचा वापर केल्याने रक्तदाब, ऱ्हदयरोग होतात. जास्त मिठामुळे हाडातील कॅल्शीयमचे
शोषण होते. जागतिक आरोग्य संघटना यांनी
प्रति दिवस 5 ग्रॅम पेक्षा कमी मिठाचा वापर करावा असे सुचविले आहे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 96
/ 2021 - 2022 सोमवार, दिनांक – 28.02.2022
Friday, 25 February 2022
Thursday, 24 February 2022
मराठवाडयात पूढील पाच दिवस हवामान कोरडे राहून पुढील तीन दिवस दूपारनंतर आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. किमान व कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाडयात पूढील पाच दिवस हवामान कोरडे राहून पुढील तीन दिवस
दूपारनंतर आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. किमान व कमाल तापमानात फारशी
तफावत जाणवणार नाही.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयातील सर्व तालूक्यात व जिल्हयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असून पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 2 ते 08 मार्च, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची
शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार
असलेल्या हरभरा पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे
अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी
अर्क किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम किंवा
क्लोरॅंट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फलुबेंडामाईड 20%
5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या गव्हाच्या पिकात उंदरांचा
प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग
गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद
करावीत. उन्हाळी सोयाबीन पिकात
अंतरमशागतीची कामे करावीत व पिकास पाणी द्यावे. उन्हाळी सोयाबीन पिकात रसशोषण
करणाऱ्या किडी (पांढरी माशी व तूडतूडे) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 15 ते
20 पिवळे चिकट सापळे लावावेत व 5% निंबोळी अर्काची फवारणी
करावी. प्रादूर्भाव जास्त दिसून आल्यास थायामिथॉक्झाम 12.6% + लॅबडा सायहॅलोथ्रीन 9.5% झेडसी 2.5 मिली किंवा बिटासायफ्लुथ्रीन
8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% 7 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीनचे बिजोत्पादन घेत असल्यास
शेतकऱ्यांनी शेतात वेगळी दिसणारी झाडे उपटुन टाकावीत. सोयाबीन पिकावर पाने
खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
थायामिथॉक्झाम + लॅम्डा सायहॅलोथ्रीन एकरी 50 मिली (2.5 मिली प्रति 10 लिटर)
पाण्यात मिसळून फवारणी करावी. नविन लागवड केलेलया हंगामी ऊस पिकास पाणी द्यावे. ऊस
पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस
20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात
तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी.
फळबागेचे
व्यवस्थापन
मृगबहार लिंबूवर्गीय पिकांत कोळी
किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2
मिली किंवा प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य
गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी
फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी
द्यावे. काढणीस तयार असलेल्या फळांची काढणी करून घ्यावी. डाळींब बागेत शॉर्ट होल
बोरर/खोड किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास खोडांना लेप लावण्यासाठी लाल माती
4 किलो + क्लोरपायरीफॉस 20% ईसी 20 मिली + कॉपर ऑक्सीक्लोराईड 25
ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून पेस्ट बनवून जमिनीपासून 2 ते 2.5 फुट खोडावर लेप
लावावा. थाईमेथॉक्झाम 25% डब्ल्यूजी 10 ते 15 ग्रॅम +
प्रोपीकोनॅझोल 25% ईसी 15 ते 20 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून
ड्रेनचींग करावी.
भाजीपाला
कांदा पिकावरील करपा रोगाच्या
व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबिन + डायफेनकोनॅझोल 10 मिली + स्टीकर 5 मिली प्रति
10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात
रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यस्थापनासाठी
पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10
मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची पिकावरील फुलकिडे याच्या
व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम किंवा
फेनप्रोपॅथ्रिन 30% ईयी 3.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45%
एसएल 3.2 मिली किंवा फिप्रोनिल 5% एससी 20
मिली किंवा ॲसिटामाप्रीड 7.7% एससी 8 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार सूक्ष्म
सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी
करून घ्यावी.
चारा पिके
चारा
पिकासाठी लागवड केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत
असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची
फवारणी करावी.
तुती रेशीम
उद्योग
रेशीम कोषाचा ए-ग्रेड उत्त्म प्रकारे
मिळवण्यासाठी किटक संगोपन कौशल्य आत्मसात करणे आवश्य्क आहे. खाद्य म्हणून तुती पानात पाण्याचे प्रमाण 80 टक्के
मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. हलक्या जमिनीत 6 ते 7 दिवसाला तर भारी जमीनीत 10-12 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळया द्याव्यात. खत
मात्रा; वर्षातून कंम्पोस्ट खत 2 वेळा
जुन व नोत्हेंबर महिण्यात 4 टन प्रत्येकी (एकूण 8 टन एकरी) द्यावे म्हणजे
वर्षाकाठी एकरी 25 टन पानाचे उत्पादन मिळते. दुस-या वर्षापासून 250 अंडिपूजाची
5 ते 6 पीके घेणे शक्य होते.
200 कि. ग्रा. कोषाच्या
उत्पन्नास रू. 300/- प्रति किलो भाव मिळला तरी 60,000/-
प्रमाणे 5 पिकाचे रू. 3 लक्ष
उत्पन्न शेतक-याला मिळते.
सामुदायिक विज्ञान
बाळाला वयाचया 6 महिन्यानंतरही मानेवर
ताबा आला नसेल, ते तोंडातून कोणतेही आवाज काढत नसेल, सभोवतालच्या व्यक्तीकडे पाहून
हसत नसेल अथवा त्यांना कोणताही प्रतिसाद देत नसेल. बाळाचे हात-पाय हे ताठ/कडक
असतील अथवा शरीर सैल वाटत असेल तर तो बाळाच्या विकासाबाबत धोक्याचा संकेत असू
शकतो. त्यामूळे त्वरीत कुटुंबियांनी याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू
करावे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 95/2021
- 2022 शुक्रवार, दिनांक – 25.02.2022
Tuesday, 22 February 2022
Monday, 21 February 2022
मराठवाडयात पुढील चोविस तासात किमान तापमानात हळूहळू वाढ होईल व त्यानंतर किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चोविस तासात किमान तापमानात हळूहळू वाढ होईल व
त्यानंतर किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग व जमिनीतील ओलावा
कमी झालेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 27 फेब्रूवारी ते 05 मार्च, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी
राहण्याची तर किमान
तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व
लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम
12.6 % + लॅमडा
सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील चिकटा
व्यवस्थापनासाठी कार्बेंडाझीम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी
भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रीड 17.8% 2.5 मिली किंवा लॅमडा
सायहॅलोथ्रीन 5% 6 मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% 3 मिली (संयूक्त किटकनाशक)
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. उन्हाळी भुईमूग पिकास
आवश्यकतेनूसार ठिबक किंवा तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. करडई पिकात माव्याचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 15 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी पिकात घडांना काठीने आधार द्यावा. बागेतील
वाळलेली व रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. केळी बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे. आंबा फळबागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी एनएए 10 पीपीएम (प्लॅनोफिक्स 2.5 मिली प्रति 10 लिटर पाणी) ची
फवारणी करावी. आंबा मोहोर संरक्षणासाठी 300 मेश गंधकाची धूरळणी करावी म्हणजे भूरी
व करपा रोगापासून बागेचे संरक्षण होईल. आंबा बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून प्रतवारी
करावी व बाजारपेठेत पाठवावी.
भाजीपाला
मिरची पिकावरील फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी
इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रिन 30% ईयी 3.5 मिली
किंवा स्पिनोसॅड 45% एसएल 3.2 मिली किंवा फिप्रोनिल 5%
एससी 20 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 7.7% एससी 8
मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. कांदा पिकावरील
करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबिन + डायफेनकोनॅझोल 10 मिली + स्टीकर
5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार सूक्ष्म
सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
फुल पिकास आवश्यकतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
पशुधन
व्यवस्थापन
पशुधनावर सध्या प्रचंड प्रमाणामध्ये पिसवांचा
प्रादुर्भाव होत आहे. पिसवांचा प्रादुर्भाव आढळल्यास पशुधनास आहे त्या गोठ्यापासून
काही काळासाठी दुर अंतरावर बांधावे. त्या गोठयातील जाळै/जळमटे स्वच्छ करावेत व या
गोठयामध्ये 4% मिठाचे द्रावण
सर्वत्र फवारावे. लागण झालेल्या पशुधनावरती 5% निंबोळी अर्क
अथवा वनस्पतीजन्य किटकनाशकाचे द्रावण (15 मिली निंबोळी तेल + 15 मिली कारंज तेल +
2 ग्रॅम साबण + 1 लिटर पाणी) फवारावे अथवा पशुवैद्यक तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली
रासायनीक किटकनाशकाची फवारणी करावी.
सामुदायिक विज्ञान
पळसाच्या फुलांची भुकटी पाण्यामध्ये उकळून त्यापासून
रंग काढता येतो हा रंग सुती, रेशमी आणि उनी धागे रंगविण्यासाठी अनुक्रमे 10%, 2% आणि 4%
या प्रमाणात घेऊन वापरता येतो. पळसाच्या फुलांपासून रंग काढण्यासाठी
व धागे रंगविण्यासाठी 30 मिनिटांचा वेळ प्रमाणित करण्यात आला आहे. सुती धागे
रंगविण्यापूर्वी 10% हरडयाच्या द्रावणात प्रक्रिया करणे
गरजेचे आहे. तुरटी, क्रोम, कॉपर सल्फेट आणि फेरस सल्फेट या रंगबंधकाचा वापर करून
फिका पिवळा ते गडद केशरी अशा विविध रंगछटा मिळतात. धुणे, घासणे, घाम आणि सूर्यप्रकाश या सर्व बाबींसाठी रंगाचा पक्केपणा
अतिशय चांगला आहे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 94
/ 2021 - 2022 मंगळवार, दिनांक – 22.02.2022
Friday, 18 February 2022
Thursday, 17 February 2022
मराठवाडयात पूढील दोन दिवसात किमान व कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर पुढील दोन दिवसात किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान
केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील दोन दिवसात
किमान व कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर पुढील दोन दिवसात
किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे
राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार परभणी जिल्हयात बाष्पोत्सर्जनाचा वेग
वाढलेला आहे व इतर जिल्हयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे. परभणी
जिल्हयातील मानवत, पूर्णा, सेलू व जिंतूर तालूक्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला
आहे तर इतर तालूक्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे. पिकास
आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 23 फेब्रुवारी ते 01
मार्च, 2022 दरम्यान कमाल
तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता
आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार
असलेल्या हरभरा पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे
अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20
पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे
लावावेत व 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा इमामेक्टीन
बेन्झोएट 5% 4.5 ग्राम किंवा क्लोरॅंट्रानिलीप्रोल 18.5%
3 मिली किंवा फलुबेंडामाईड 20% 5 ग्रॅम प्रति
10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. लवकर
पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा पेरणी
केलेल्या गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग
गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद
करावीत. उन्हाळी सोयाबीन पिकात
अंतरमशागतीची कामे करावीत व पिकास पाणी द्यावे. उन्हाळी सोयाबीन पिकात रसशोषण
करणाऱ्या किडी (पांढरी माशी व तूडतूडे) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 15 ते
20 पिवळे चिकट सापळे लावावेत व 5% निंबोळी अर्काची फवारणी
करावी. प्रादूर्भाव जास्त दिसून आल्यास थायामिथॉक्झाम 12.6% + लॅबडा सायहॅलोथ्रीन 9.5% झेडसी 2.5 मिली किंवा
बिटासायफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% 7 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सोयाबीन पिकाची
पेरणी करून 20 ते 25 दिवस झाले असल्यास व पिकात सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता
दिसून येत असल्यास मायक्रोला आरसीएफ (ग्रेड-2) या सूक्ष्म अन्नद्रव्याची 50 ते 75
मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नविन लागवड केलेलया हंगामी ऊस
पिकास पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल
18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस
पिकात पांढरी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
डायमिथोएट 30% ईसी 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. हळद पिकाची पाने पिवळी पडून
जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत
कापून घ्यावी.
फळबागेचे
व्यवस्थापन
मृगबहार लिंबूवर्गीय पिकांत कोळी
किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2
मिली किंवा प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य
गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी
फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. संत्रा/मोसंबी बागेस पाणी द्यावे. डाळींब
बागेत शॉर्ट होल बोरर/खोड किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास खोडांना लेप
लावण्यासाठी लाल माती 4 किलो + क्लोरपायरीफॉस 20% ईसी 20 मिली + कॉपर
ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून पेस्ट बनवून जमिनीपासून 2 ते 2.5
फुट खोडावर लेप लावावा. थाईमेथॉक्झाम 25% डब्ल्यूजी 10 ते 15
ग्रॅम + प्रोपीकोनॅझोल 25% ईसी 15 ते 20 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून
ड्रेनचींग करावी.
भाजीपाला
भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात
रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यस्थापनासाठी
पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10
मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची पिकावरील फुलकिडे याच्या
व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम किंवा
फेनप्रोपॅथ्रिन 30% ईयी 3.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45%
एसएल 3.2 मिली किंवा फिप्रोनिल 5% एससी 20
मिली किंवा ॲसिटामाप्रीड 7.7% एससी 8 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. उन्हाळी हंगामात भाजीपाला पिकाच्या
लागवडीसाठी गादी वाफ्यावर मिरची, कांदे, टोमॅटो इत्यादी पिकांची रोपे तयार करावीत.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी
करून घ्यावी.
चारा पिके
चारा
पिकासाठी लागवड केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत
असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची
फवारणी करावी.
तुती रेशीम
उद्योग
रेशीम कोषाचा ए-ग्रेड उत्त्म प्रकारे मिळवण्यासाठी
किटक संगोपन कौशल्य आत्मसात करणे आवश्य्क आहे. खाद्य म्हणून
तुती पानात पाण्याचे प्रमाण 80 टक्के मर्यादित ठेवणे आवश्यक
आहे. हलक्या जमिनीत 6 ते 7 दिवसाला तर भारी जमीनीत 10-12 दिवसाच्या अंतराने
पाण्याच्या पाळया द्याव्यात. खत मात्रा; वर्षातून कंम्पोस्ट खत 2 वेळा जुन व नोत्हेंबर
महिण्यात 4 टन प्रत्येकी (एकूण 8
टन एकरी) द्यावे म्हणजे वर्षाकाठी एकरी 25
टन पानाचे उत्पादन मिळते. दुस-या वर्षापासून 250 अंडिपूजाची 5 ते 6 पीके घेणे शक्य होते. 200 कि. ग्रा. कोषाच्या उत्पन्नास
रू. 300/- प्रति किलो भाव मिळला तरी 60,000/- प्रमाणे 5 पिकाचे रू. 3 लक्ष
उत्पन्न शेतक-याला मिळते.
सामुदायिक विज्ञान
बाळाला वयाचया 6 महिन्यानंतरही मानेवर
ताबा आला नसेल, ते तोंडातून कोणतेही आवाज काढत नसेल, सभोवतालच्या व्यक्तीकडे पाहून
हसत नसेल अथवा त्यांना कोणताही प्रतिसाद देत नसेल. बाळाचे हात-पाय हे ताठ/कडक
असतील अथवा शरीर सैल वाटत असेल तर तो बाळाच्या विकासाबाबत धोक्याचा संकेत असू
शकतो. त्यामूळे त्वरीत कुटुंबियांनी याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू
करावे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 93/2021
- 2022 शुक्रवार, दिनांक – 18.02.2022
Tuesday, 15 February 2022
Monday, 14 February 2022
मराठवाडयात पुढील दोन दिवसात किमान तापमानात किंचीत घट होईल व त्यानंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवसात किमान तापमानात किंचीत घट होईल व
त्यानंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. दिनांक 18 व 19 फेब्रुवारी
रोजी आकाश अंशत: ढगाळ राहील.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
मागील आठवडयात पिकास पाणी दिल्यामूळे जमिनितील ओलावाही वाढलेला आहे. पिकास
आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. परभणी जिल्हयातील पालम, मानवत व गंगाखेड तालूक्यात
पिकास पाणी देण्याची आवश्यकता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 20 ते 26 फेब्रूवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान मध्यमप्रमाणात सरासरीपेक्षा कमी
राहण्याची तर किमान तापमान सरासरीएवढे
राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील चिकटा
व्यवस्थापनासाठी कार्बेंडाझीम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5
मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी
भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रीड 17.8% 2.5 मिली किंवा लॅमडा
सायहॅलोथ्रीन 5% 6 मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% 3 मिली (संयूक्त किटकनाशक)
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. करडई पिकात पानावरील
ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब +
कार्बेन्डाझीम संयूक्त बूरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या
व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75%
15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेत 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. केळी पिकात घडांना काठीने आधार द्यावा. बागेतील वाळलेली व
रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. आंबा मोहोर संरक्षणासाठी 300 मेश गंधकाची
धूरळणी करावी म्हणजे भूरी व करपा रोगापासून बागेचे संरक्षण होईल. आंब्याच्या
मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंबा फळबागेत फळगळ दिसून
येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी एनएए 10 पीपीएम (प्लॅनोफिक्स 2.5 मिली प्रति
10 लिटर पाणी) ची फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून
प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी.
भाजीपाला
टोमॅटो पिकावरील फळ पोखरणा-या अळीच्या
व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा
क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा इन्डोक्झाकार्ब 14.5% एससी 10 मिली
किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
पशुधन
व्यवस्थापन
पशुधनावर सध्या प्रचंड प्रमाणामध्ये पिसवांचा
प्रादुर्भाव होत आहे. पिसवांचा प्रादुर्भाव आढळल्यास पशुधनास आहे त्या गोठ्यापासून
काही काळासाठी दुर अंतरावर बांधावे. त्या गोठयातील जाळै/जळमटे स्वच्छ करावेत व या
गोठयामध्ये 4% मिठाचे द्रावण
सर्वत्र फवारावे. लागण झालेल्या पशुधनावरती 5% निंबोळी अर्क
अथवा वनस्पतीजन्य किटकनाशकाचे द्रावण (15 मिली निंबोळी तेल + 15 मिली कारंज तेल +
2 ग्रॅम साबण + 1 लिटर पाणी) फवारावे अथवा पशुवैद्यक तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली
रासायनीक किटकनाशकाची फवारणी करावी.
सामुदायिक विज्ञान
बालविकासाला चालना देण्यासाठी निसर्गात उपलब्ध
असलेल्या गोष्टी जसे की वाळू, शंख, शिंपले, बिया, पाने, फुले, माती, काडया, खडे,
गारगोट्या इ. सोबत बालक खेळत असतांना त्यांच्या विविध रचना करणे, वर्गीकरण करणे,
लहान-मोठेपणा, हलके व जडपणा त्यांचे रंग, आकार याविषयी माहिती द्यावी.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 92
/ 2021 - 2022 मंगळवार, दिनांक – 15.02.2022
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तूरळ...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 23 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालन...