Friday, 1 April 2022

पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 04 व 05 एप्रिल रोजी मराठवाडयात आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 04 व 05 एप्रिल रोजी मराठवाडयात आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 06 एप्रिल ते 12 एप्रिल, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

काढणीस केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी.  वेळेवर पेरणी केलेलया गहू पिकाची कापणी व मळणी करावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे उन्हाळी सोयाबीन पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. उन्हाळी सोयाबीन पिकात आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. उन्हाळी सोयाबीन पिकात रसशोषण करणाऱ्या किडी (पांढरी माशी व तूडतूडे) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे लावावेत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादूर्भाव जास्त दिसून आल्यास थायामिथॉक्झाम 12.6% + लॅबडा सायहॅलोथ्रीन 9.5% झेडसी 2.5 मिली किंवा बिटासायफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% 7 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीनचे बिजोत्पादन घेत असल्यास शेतकऱ्यांनी शेतात वेगळी दिसणारी झाडे उपटुन टाकावीत. सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 50% ईसी 20 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा थायामिथॉक्झाम + लॅम्डा सायहॅलोथ्रीन एकरी 50 मिली (2.5 मिली प्रति 10 लिटर) पाण्यात मिसळून फवारणी करावि. उन्हाळी सोयाबीन पिकात शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 या द्रवरूप रासायनिक खताची 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. नविन लागवड केलेलया हंगामी ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे संत्रा/मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत पाणी व्यवस्थापन करावे, फळगळ दिसून येत असल्यास 13:00:45 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मृगबहार लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या मृग बहार फळांची काढणी करून घ्यावी.  काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे डाळींब बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. डाळींब बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

 

 

 

भाजीपाला

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी सकाळी लवकर करावी. भाजीपाला पिकात (मिरची, वांगी, भेंडी) रसशोषन करणा-या किडींच्या व्यवस्थापनासाठी पायरीप्रॉक्झीफेन 5 % + फेनप्रोपॅथ्रीन 15 % 10 मिली किंवा डायमिथोएट 30 % 13 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  उन्हात फवारणी करू नये.  

फुलशेती

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे फुल पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर करावी.

चारा पिके

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे उन्हाळी चारा पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. चारा  पिकासाठी लागवड केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. 

तुती रेशीम उद्योग

किटक संगोपन गृहालगत 10 फुट अंतरावर चारही बाजूने तुती वृक्ष लागवड किंवा मोठे झाडे लावावी. त्यामूळे 5 अं. से. तापमान कमी मदत मिळते. कच्च्या शेडनेट गृहातील तापमान 28 अं.से. च्यावर जाता कामा नये. हिवाळयात 20 अं.से. च्या खाली व उन्हाळयात 35 अं.से. च्या वर तापमान गेल्यास रेशीम किटक पाने खात नाहीत. तुती पाने खाण्याची ‍क्रिया मंदावते. किटक उपाशी राहतात व जास्त काळ उपाशी राहिले तर रोगास बळी पडतात. त्यामूळे उन्हाळयात 3 ते 4 वेळा तुती फांद्या खाद्य द्यावे व रॅकवर निळी नायलॉन जाळी किंवा निळी पॉलीथीन पट्टी आच्छादन करावे. आतील चारही बाजूने 22.5X 15 सेंमी लांबी खोलीची नाली असावी. वरच्या बाजूस सिमेंट पत्रे किंवा बेंगलोर टाईल्स टाकून त्यावर कोल्ड गार्ड पांढरा रंग द्यावा म्हणजे तापमान 5 ते 7 अं.से ने कमी होते.

सामुदायिक विज्ञान

वाढत्या गर्भाच्या आहाराची गरज भागविण्यासाठी समतोल आहेर घ्यावा. रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी कमीतकमी दोन तास अगोदर करावे. डाळी, मोड आलेली कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध व दूधाचे पदार्थ यांचा दररोजच्या आहारात योग्य प्रमाणात समावेश करावा. मांसाहारी गर्भावती महिला अंडी, मास, मासे इत्यादी खाऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार पोषक आहारासोबत कॅल्शियम, लोह तथा बहू जीवनस्त्वाच्या गोळया/औषधी घ्याव्या.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक01/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 01.04.2022

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 व 15 एप्रिल रोजी मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 12 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 13 व 14 एप्रिल रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

    हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...