Tuesday, 31 May 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 18 / 2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 31.05.2022


 

दिनांक 31 मे व 01 जून रोजी लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीड, हिंगोली व परभणी जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 31 मे व 01 जून रोजी लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीड, हिंगोली व परभणी जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 05 जून ते 11 जून, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कोरडवाहू कापूस लागवडीसाठी भारी व काळया जमिनीमध्ये दोन-तिन वर्षानी एक वेळा खोल नांगरणी करावी. नांगरणी नंतर मोगडणी करावी. मोगडणीनंतर दोन-तिन वखराच्या पाळया द्याव्यात. शेवटची वखरणी करण्यापूर्वी कोरडवाहू कापूस लागवडीसाठी 5 टन व बागायती लागवडीसाठी 10 टन  चांगले कुजलेले शेणखत शेतात समप्रमाणात पसरावे. तुर पिकाच्या पूर्व मशागतीसाठी एक नांगरणी व वखराच्या 2 ते 3 पाळया द्याव्यात. शेवटच्या पाळी अगोदर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 5 टन जमिनीत मिसळून पाळी द्यावी. मुग/उडीद लागवडीसाठी एक नांगरणी व कुळवाच्या 2 पाळया द्याव्यात. शेवटच्या कुळवणी अगोदर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी 5 टन जमिनीत मिसळून पाळी द्यावी. भुईमूगाच्या पेरणीसाठी बळीराम देशी नांगराची एक ते दोन नांगरणीनंतर वखराच्या दोन ते तिन पाळया द्याव्यात. शेवटच्या वखरपाळी पूर्वी प्रति हेक्टरी 10 गाडया शेणखत/कंपोस्ट खत पसरून जमिन भुसभूशीत करावी. सध्याच्या काळात उशीरा लागवड केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी सुरू आहे, वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, काढणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, शेंगा पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. जमिनीची खोल नांगरट करावी. वखराच्या एक ते दोन पाळया देऊन जमिन तयार करावी.

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळीच्या नवीन लागवडीसाठी लागवड करण्या अगोदर हेक्टरी 90 ते 100 गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत लागवडीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावे.  आंब्याच्या नवीन लागवडीसाठी 1X1X1 मीटर आकाराचे खड्डे घेऊन त्यात अर्धा किलो सूपर फॉस्फेट व 50 किलो शेणखत ‍किंवा कंपोस्ट खत टाकावे व पोयटा मातीने सर्व मिश्रणासहीत खड्डा भरून घ्यावा. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी करून घ्यावी.  वेळेवर एप्रिल छाटणी केलेल्या द्राक्ष बागेत फुटींची विरळणी करावी. सिताफळाच्या नवीन लागवडीसाठी 45X45X45 सें.मी. या आकाराचे खड्डे घेऊन त्यात एक ते दिड घमेले चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत, अर्धा किलो सुपर फॉस्फेट, फॉलीडॉल पावडर घालून व चांगल्या मातीच्या मिश्रणाने ते भरावे.

भाजीपाला

खरीप हंगामात भाजीपाला लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करावी.

फुलशेती

खरीप हंगामात फुलपिकाच्या लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळा ऋतुच्या आगमनासोबतच अनेक आजारांचे देखील आगमन होते. म्हणून पशुधनाच्या आरोग्यासाठी त्रिसुत्री 1) भौतीक सुविधा म्हणजेच व्यवस्थीत गोठा ज्यायोग्य किटक व पावसापसून संरक्षण. 2) जैविक सुविधा जसेकी लसीकरण, जंतनाशकाची मात्रा आणि 3)रासायनीक सुविधा म्हणजे आजाराची लागण झाल्यास तात्काळ पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार  लसीकरण आणि पावसाच्या आगमनासोबतच तात्काळ शेळी मेंढी मध्ये तसच वासरांना वयाच्या सातव्या दिवशी द्यावयाची जंतनाशकाची मात्रा आवश्यक ठरते. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.  

सामुदायिक विज्ञान

गर्भधारणेपूर्वी दांपत्यांनी पालकत्वासाठी त्यांची पात्रता पूढील घटकान्वये तपासून घ्यावी : दांपत्या शारीरिक व मानसिक दृष्टया परिपक्व असावे, दांपत्याचे वय 21 ते 30 वर्षा दरम्यान असावे, महिलेचे सर्वसाधारण आरेग्य उत्कृष्ट दर्जाचे असावे, दांपत्याची पालकत्व स्वीकारण्याची मानसिक तयारी असावी, नवजात अर्भकाच्या तथा कुटुंबाच्या गरजा भ्गवण्याची कुटुंबाची योग्य  आर्थिक परिस्थीती असावी.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक18 / 2022 - 2023  मंगळवार, दिनांक – 31.05.2022

Friday, 27 May 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 17/2022 - 2023 शुक्रवार, दिनांक – 27.05.2022


 

दिनांक 30 मे रोजी नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 31 मे रोजी नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली व बीड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 5 दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 30 मे रोजी नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 31 मे रोजी नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली व बीड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 01 ते 07 जून, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन  पिकाच्या पेरणीसाठी दोन ते तिन वर्षात एकदा खोल (30 ते 45 सें.मी.) नांगरणी करावी. नांगरणीनंतर दोन ते तिन वखराच्या पाळया देऊन जमिन समपातळीत करावी. शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी 20 गाडया (5 टन) शेणखत किंवा कंपोस्टखत जमिनीत चांगले मिसळावे. सोयाबीन पिकाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. खरीप ज्वारी पेरणीसाठी एकदा नांगरणी करून 3 ते 4 वखराच्या पाळया देऊन जमिनीची मशागत करावी. शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी 10 ते 15 गाडया चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. बाजरीच्या पेरणीसाठी जमिनीची नांगरट करावी व वखराच्या 2 ते 3 पाळया द्याव्यात. शेवटच्या वखरपाळीपूर्वी हेक्टरी 5 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. अडसाली ऊस लागवडीसाठी जमिनीची उन्हाळयात खोल नांगरट करून जमिन तापल्यानंतर ढेकळे फोडावीत. कूळवाच्या उभ्या-आडव्या पाळयानंतर सपाटीकरण करावे. दूसऱ्या नांगरणीपूर्वी अडसाली लागवडीसाठी प्रति हेक्टरी 25 टन शेणखत जमिनीत ‍मिसळावे. हळद लागवडीसाठी जमिनीची ट्रॅक्टरने 18 ते 22 सें.मी. पर्यंत खोल नांगरट करून घ्यावी. नांगरटीनंतर शेतातील तणांचे अवशेष वेचून जाळून नष्ट करावेत. नांगरीनंतर कुळवणी करावी. त्यानंतर ढेकळे फोडून घ्यावीत आणि चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून घ्यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी लागवडीसाठी 1X1X1 मीटर या आकाराचे खड्डे घेऊन त्यात अर्धा किलो सुपर फॉस्फेट, 3 ते 4 घमेली शेणखत किंवा कंपोस्टखत व पोयटा माती यांनी खड्डे भरून घ्यावे.  डाळिंब लागवडीसाठी घेतलेले खड्डे चांगली माती + चांगले कुजलेले व रापलेले शेणखत + 1 ते 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + पालापाचोळा यांनी जमिनीपासून वर 15 ते 20 सेंमी खड्डे भरून घ्यावेत व मधोमध एक बांबूची काठी लावावी.  चिकू लागवडीसाठी घेतलेले 1X1X1 मीटर आकाराचे खड्डे अर्धा किलो सुपर फॉस्फेट, 1:3 या प्रमाणात शेणखत + माती या मिश्रणाने खड्डे भरावे.

भाजीपाला

टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी जमिन खोलवर नांगरून कुळवणी करावी. कुळवणी करताना चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावेत.  काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना आधार द्यावा.

फुलशेती

खरीप हंगामात फुलपिकांच्या लागवडीसाठी फुलपिकानूसार जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.

चारा पिके

चारा पिकाच्या लागवडीसाठी एक नांगरट करून दोन ते तिन वेळा वखरणी करावी. शेवटच्या वखरणीपूर्वी जमिनीत हेक्टरी 20 ते 25 टन कंपोस्ट खत मिसळावे.

पशुधन व्यवस्थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.  

तुती रेशीम उद्योग

उस, कापूस पिकाच्या तूलनेत तुती लागवड कमी पाण्यात होत असून एक वेळा लागवड केली तर 15 ते 20 वर्ष पून्हा पून्हा लागवड करायची आवश्यकता भासत नाही. मजुरांच्या वाढलेल्या मजुरी मूळे व उपलब्धतेमूळे उस व कापूस पीक पध्दती अडचणीची झाली असताना लहान शेतकऱ्यांने 1.5 ते 2 एकर क्षेत्रावर तुती लागवड करावी. व्हि-1 जातीचे बेणे जून महिण्यात 2 गुंठे क्षेत्रावर गादी वाफे करून लावले तर तिन महिण्यानीं तुती रोपे ऑगस्ट-सप्टेंबर शेतात लावावी. 3 महिण्यांनी पहिले कोषाचे पीक सुरूवात होते. दूसऱ्या वर्षापासून कोषाचे 4 ते 5 पिके निघतात.

सामुदायिक विज्ञान

स्वयंपाकघरात खोलीचे तापमान जास्त असते त्यामुळे या खोलीच्या  भिंतींना थंड रंग द्यावेत उदा. निळा, हिरवा.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक17/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 27.05.2022

 

Tuesday, 24 May 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 16 / 2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 24.05.2022


 

दिनांक 26 मे रोजी हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 27 मे रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तर दिनांक 28 मे रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. मराठवाडयात दिनांक 26 ते 28 मे रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक 26 मे रोजी हिंगोली, नांदेड, लातूर उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 27 मे रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तर  दिनांक 28 मे रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद  जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 29 मे ते 04 जून, 2022 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

मध्यम ते भारी, कसदार व पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये कापूस पिकाची लागवड करावी. हलक्या तसेच पाण्याचा निचरा न होणाऱ्या चिबड जमिनीवर कापूस पिकाची लागवड करू नये. कापूस पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची खोली 60 ते 100 सेंमी असावी, जमिनीचा सामू 5.5 ते 8.5 एवढा असावा. मध्यम ते भारी (30 ते 45 सेंमी खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत तूर पिकाची लागवड करावी. तुरीच्या पिकास चोपन व क्षारयुक्त जमिन मानवत नाही. तुर पिकाच्या वाढीस जमिनीचा सामु 6.5 ते 7.5 योग्य असतो. आम्लयुक्त जमिनीत पिकाच्या मुळांवरील गाठींची योग्य वाढ होत नसल्यामुळे रोपे पिवळी पडतात. योग्य निचऱ्याच्या मध्यम ते भारी जमिनीत मुग/उडीद या पिकांच्या लागवड करावी. एकदम हलक्या प्रतिची मुरमाड जमिन या पिकास योग्य नाही. पाणी साठवूण ठेवणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये. मध्यम ते हलकी, भुसभुशीत, सेंद्रिय पदार्थ आणि कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असलेल्या जमिनीत भुईमूग  पिकाची लागवड करावी. भुसभुशीत जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभरीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे काढणी केलेल्या उन्हाळी भुईमूग शेंगाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मध्यम ते भारी, सुपीक, उत्तम निचऱ्याची जमिनी मका पिकाची लागवड करावी.

 

 

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

काळी व कसदार, भुसभुशीत गाळाची, पोयटयाची, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत केळीची मृग बाग लागवड करावी. लागवडीसाठी क्षारयुक्त जमिनीची निवड करू नये. मध्यम ते भारी प्रतीची पाण्याचा चांगला निचरा होणारी, थोडीशी आम्लयुक्त जमिनीत आंबा पिकाची लागवड करावी. चोपन व चुनखडीयुक्त जमिनीत लागवड करू नये.  वेळेवर एप्रिल छाटणी केलेल्या द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे मध्यम ते हलकी, उत्तम निचरा होणारी, भरपूर सेंद्रिय पदार्थ व सामू 6.5 ते 8.0 दरम्यान असलेल्या जमिनीत सिताफळ लागवड करावी. भारी, पाण्याचा निचरा न होणारी जमिन निवडू नये.

भाजीपाला

खरीप हंगामात भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी जमिनीच्या प्रकारानुसार भाजीपाला पिकाची निवड करावी. वांगी पिकावरील शेंडा व फळ पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा  क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% ईसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम  किंवा फेनप्रोपॅथ्रीन 30% ईसी 5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एससी 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना आधार द्यावा. काढणी केलेल्या कांदा पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.  

पशुधन व्यवस्थापन

तापमान-आर्द्रता-निर्देशांकामध्ये वाढ झाल्याने दुधाळ जनावरावर हिट ट्रेस (उष्णतेचा ताण) होतो. दुधाळ जनावरांमध्ये तापमान-आर्द्रता निर्देशांकात वाढ झाल्याने दुध उत्पादन कमी होते व त्याचबरोबर दुधातील स्निग्ध पदार्थ व प्रथिने कमी यांचे प्रमाण कमी होते. हया पासून दुधाळ जनावरांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या गोठ्याच्या शेड वरील छताला स्प्रिंकलर्स किंवा फॉगर्स ने थंडावा निर्माण करावा, दुपारी जनावरांना धुवून काढावे, जमलेच तर पंखा किंवा कुलर्सची व्यवस्था शेड मध्ये करावी, शेडच्या बाजूला पोत्याचे पडदे बांधून त्यांना भिजवावे. गोठ्याची उंची कमीत कमी मध्यभागी 15 फुट उंच असावी. पिण्यास भरपूर पाणी व कोरडया पदार्थांचे सेवन वाढवावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.  

सामुदायिक विज्ञान

इंग्रजी झेंडूंच्या फुलांची भुकटी पाण्यामध्ये उकळून त्यापासून रंग काढता येतो. हा रंग सुती, रेशमी आणि उनी धागे रंगविण्यासाठी अनुक्रमे 11%, 2% आणि 2% या प्रमाणात घेऊन वापरता येतो. इंग्रजी झेंडूच्या फुलांपासून रंग काढण्यासाठी व धागे रंगविण्यासाठी 30 मिनिटांचा वेळ प्रमाणित करण्यात आला आहे. सुती धागे रंगविण्यापूर्वी, 10% हरडयाच्या द्रावणात प्रक्रिया करणे गरजेचे आहे. तुरटी, क्रोम, कॉपर सल्फेट आणि फेरस सल्फेट या रंगबंधकाचा वापर करून फिका ते गडद केशरी, गडद विटकरी अशा विविध रंगछटा मिळतात. धुणे, घासणे, घाम आणि सूर्यप्रकाश या सर्व बाबीसाठी रंगाचा पक्केपणा अतिशय चांगला आहे.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक16 / 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 24.05.2022

 

 

 

Friday, 20 May 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 15/2022 - 2023 शुक्रवार, दिनांक – 20.05.2022


 

दिनांक 20 मे रोजी नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी व हिंगोली जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच दिनांक 21 मे रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 48 तासात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. दिनांक 20 मे रोजी नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी व हिंगोली जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच दिनांक 21 मे रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 25 ते 31 मे, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकाची पेरणी सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. परंतु अत्यंत हलक्या जमिनीत अपेक्षित उत्पादन मिळत नाही. जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त तथा रेताड जमिनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये. सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी उत्तम निचऱ्याची, सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असलेली जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असणे गरजेचे आहे.  खरीप ज्वारी पेरणीसाठी मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीचा सामु 5.5 ते 8.4 पर्यंत असावा. बाजरी या पिकाच्या पेरणीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. अडसाली ऊस लागवडीसाठी मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची, खोल (60 ते 120 से. मी.) जमिन निवडावी. पूर्व हंगामी व हंगामी लागवड केलेल्या ऊस पिकास पाणी व्यवस्थापन करावे. हळद लागवडीसाठी मध्यम, निचऱ्याची भुसभुशीत जमिन निवडावी. सध्याच्या काळात हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत. सध्‍याच्‍या काळात हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, हळदीची उघडयावर साठवण करू नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी लागवडीसाठी मध्यम ते खोल भारी उत्तम निचऱ्याची व 1 मी. खोलीची चांगली जमिन निवडावी.  अतिआम्ल तथा क्षारयूक्त, चुनखडीयुक्त जमिन निवडू नये.  डाळींब लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी (3 - 5 %) उताराची जमिन निवडावी. हलकी परंतु सामु 7.5 पेक्षा कमी असणारी जमिन योग्य असते.  चिकूच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची खोल, मध्यम काळी जमिन निवडावी, चुनखडीयुक्त जमिनीची निवड करू नये.

भाजीपाला

खरीप हंगामात मिरची, वांगी, टोमॅटो, कांदा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी मध्यम काळी, निचऱ्याची भुसभुशीत जमिन निवडावी. काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज इत्यादींची काढणी करून घ्यावी.

 

फुलशेती

खुल्या शेतातील गुलाब लागवडीसाठी मध्यम ते हलकी तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी.

चारा पिके

खरीप हंगामात ज्वारी या चारा पिकाच्या लागवडीसाठी मध्यम, बाजरीसाठी हलकी ते मध्यम, मका पिकासाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी.

तुती रेशीम उद्योग

उन्हाळयात शक्यतो पट्टा पध्दत तुती लागवडीत शेंद्रिय पदार्थांचे किंवा पॉलिथीन (ब्लॅक) अच्छादन करावे. शेंद्रिय अच्छादनात गवत, काडीकचरा पिकांचे अवशेष झाडांची पाने, उसाचे पाचट इत्यादी किंवा साखर कारखान्यातील मळी (मोलेसीस) चा वापर करावा. आवकाळी पावसाने किंवा उन्हामुळे पाने वाळून त्याचा खत होतो. पट्टा पध्दत तुती लागवडीत एकास आड एक पट्टयात 2 X 2.5X 1.5 फुट आकाराचा चर खदून त्यात वरील शेंद्रिय पदार्थ भरावेत असे केल्याने जमिनीचा पोत सुधारणा होते व कार्बन : नायट्रोजन चे प्रमाणात सुधारणा होते. 200 गेज काळे पॉलिथीन अच्छादनास एकरी आठ हजार रूपये लागतात परंतू 1 ते 1.5 एकर तुती लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी असे अच्छादन करणे म्हणजे 2 ते 3 वर्ष निंदनीच्या खर्चात बचत होऊ शकते.

सामुदायिक विज्ञान

दोन टक्के आवळयाच्या पानाच्या अर्काचा वापर सुती कापडावर केल्यास ग्राम पोझीटिव्ह या सूक्ष्मजीवाची सुती कापडावरील वाढ प्रतिबंघित करता येते. आवळयाच्या पानाच्या अर्कासह 6 % सीट्रिक ॲसिड घेऊन सुती कापडावर संस्करण केले असता ग्राम पोझीटिव्ह या सुक्ष्मजीवाच्या वाढीला होणारा प्रतिबंध कापडाच्या  पाचा धुण्यानंतर कमी झाल्याचा आढळून आला. आवळयाच्या पानाच्या अर्काचे संस्करण काही वैशिष्टयपूर्ण कपडयांना उदा. अवगुंठन, पायमोजे, लंगोट, जखमेवर बांधावयाच्या सुती पटृटया यावर केले असता सूक्ष्मजीवांपासून होणारी हानी टाळता येऊ शकते.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक15/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 20.05.2022

 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 03 ऑक्टोबर रोजी बीड, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 04 ऑक्टोबर रोजी परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 03 व 04 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक 05 ते 07 ऑक्टोबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही व पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...