Tuesday 19 July 2022

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील पाच दिवस आकाश ढगाळ ते पूर्णत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 जुलै रोजी हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हयात तर दिनांक 23 जुलै रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण किंचित कमी झालेले आहे. 

मराठवाडयात दिनांक 22 ते 28 जुलै दरम्यान पाऊस सरासरी एवढा राहण्याची शक्यता आहे.

जास्त पाऊस झालेल्या भागातील पिकात, फळबागेत, भाजीपाला पिकात, फुल पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 24 जुलै ते 30 जुलै, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

जास्त पाऊस झालेल्या भागातील कापूस पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावीकापूस पिकात आकस्मिक मर किंवा मूळकुज दिसून असल्यास कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम + युरीया 200 ग्रॅम + पांढरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणात घेऊन हे द्रावण झाडाच्या मूळाजवळ प्रति झाड 100 मिली द्यावे. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या (मावा, तूडतूडे) किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी 40 ग्रॅम किंवा ॲसिटामाप्रिड 20% 60 ग्रॅम किंवा डायमिथोएट 30% 260 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सध्या बऱ्याच ठिकाणी कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे.  जास्त पाऊस झालेल्या भागातील सोयाबीन पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. सोयाबीन पिक पिवळे पडत असल्यास (क्लोरोसीस) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी व नंतर सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-2 ची 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. पहिल्या फवारणीने पाने हिरवी न झाल्यास परत आठ दिवसांनी दूसरी फवारणी करावी. सध्या बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी सोयाबीन पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. जास्त पाऊस झालेल्या भागातील तुर पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावीतसेच जिथे मर रोगाची सुरूवात होत असल्यास कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम + युरीया 200 ग्रॅम + पांढरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणात घेऊन हे द्रावण झाडाच्या मूळाजवळ प्रति झाड 100 मिली द्यावे. जास्त पाऊस झालेल्या भागातील मूग/उडीद पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. सध्या बऱ्याच ठिकाणी मूग/उडीद पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी मूग/उडीद पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. जास्त पाऊस झालेल्या भागातील भुईमूग पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. सध्या बऱ्याच ठिकाणी भुईमूग पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी भुईमूग पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

जास्त पाऊस झालेल्या भागातील  डाळींब बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. डाळिंब बागेत तेलकट डागाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन (स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट 90% + टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड 10%) 0.5 ग्रॅम प्रति लिटर हे महिन्यातून एकदा आणि सात ते दहा दिवसाच्या अंतराने ब्रोनोपाल नंतर फवारावे. पाऊस झाल्यानंतर लगेचच स्ट्रेप्टोसायक्लीन + कॉपरजन्य बूरशीनाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी जास्त पाऊस झालेल्या भागातील  केळी बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी.  जास्त पाऊस झालेल्या भागातील  द्राक्ष बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. द्राक्ष बागेत करपा आणि डाउनी मिल्ड्यू च्या नियंत्रणासाठी थायोफेनेट मिथाईल 1 ग्रॅम + मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

भाजीपाला

जास्त पाऊस झालेल्या भागात भाजीपाला पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावीकाढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. गादीवाफ्यावर लागवड केलेल्या रोपवाटीकेतील रोपांना बुरशी नाशकाची  आळवणी करावी. सध्या बऱ्याच ठिकाणी भाजीपाला पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी भाजीपाला पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. पाणी साचलेल्या ठिकाणी भाजीपाला पिकात 1 टक्का 13:00:45 ची पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

फुलशेती

जास्त पाऊस झालेल्या भागातील फुल पिकात  अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी.

पशुधन व्यवस्थापन

पावसामूळे चरण्यासाठी गवत सर्वत्र उपलब्ध होत आहे. गवत प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यामूळे रवंथ करणाऱ्या पशुधनामध्ये “पोटफुगी” संभवते. यासाठी टरपेंटाईन तेल 50 मिली + गोडतेल 200 मिली गाय व म्हशींमध्ये तोंडाद्वारे पाजावे. शेळी व मेंढीमध्ये याचे प्रमाण  25 मिली + 100 मिली एवढे असावे.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरेमुख्य प्रकल्प समन्वयकग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 32 / 2022 - 2023      मंगळवारदिनांक – 19.07.2022

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...