सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलावा वाढलेला आहे.
मराठवाडयात दिनांक
05 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट
दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
दिनांक 06 ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी
मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पाऊस झाल्यानंतर शेतात साचलेल्या अतिरिक्त
पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कापूस
पिकास नत्रखताची दूसरी मात्रा 60 किलो नत्र (बागायती) व 36 किलो नत्र (कोरडवाहू)
प्रति हेक्टरी द्यावे. कापूस पिकात 19:19:19 100 ग्रॅम किंवा यूरिया 200 ग्रॅम
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात रसशोषण
करणाऱ्या (मावा, तूडतूडे) किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क
किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी 40 ग्रॅम किंवा ॲसिटामाप्रिड 20% 60 ग्रॅम किंवा डायमिथोएट 30% 260 मिली प्रति एकर
पावसाची उघाड बघून फवारणी करावी. तूर पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण
करावे. मूग/उडीद पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. मुग/उडीद पिकात
मावा किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 13
मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. भुईमूग पिकात आंतरमशागतीची कामे करून तण
नियंत्रण करावे. मका पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. मका पिकाची
पेरणी करून एक महिना झाला असल्यास नत्र खताची मात्रा 75 किलो नत्र प्रति हेक्टरी
द्यावे. मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली
किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील
किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना
किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. नविन लागवड
केलेल्या केळी बागेत 13:00:45 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची
उघाड बघून फवारणी करावी. द्राक्ष
बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. द्राक्ष बागेत पानांची विरळणी
करावी व शेंडा खुडावा. द्राक्ष बागेत करपा आणि डाउनी मिल्ड्यू च्या नियंत्रणासाठी
थायोफेनेट मिथाईल 1 ग्रॅम + मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे पावसाची
उघाड बघून फवारणी करावी. द्राक्ष बागेत
जिवाणूजन्य करपा नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून
पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सिताफळ बागेत आंतरमशागतीच कामे करून तण नियंत्रण
करावे. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल
50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात
रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला
पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
फुल पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
पशुधन
व्यवस्थापन
पावसाळा ऋतूमध्ये अनेक वनस्पती सोबतच विषारी वनस्पती उदा. निळी
फुली व माठ/काटेमाठ या देखील वाढतात. या वनस्पती पशुधनाच्या खाण्यामध्ये आल्यास
विषबाधा होते. माठ/काटेमाठ खाण्यात आल्यास त्यातील नायट्रेटची विषबाधा होऊन श्वसन
संस्थेवर परिणाम होऊन मृत्यू ओढवतो. निळीफुली ही वनस्पती खालल्यास किडणीवर परिणाम
होतो म्हणून अशा वनस्पती खाण्यात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, व
खाण्यामध्ये आल्यास तात्काळ औषधोपचार
करावा.
सामूदायीक विज्ञान
पारंपारिक पध्दतीन कपडे धुताना ते थोडा वेळ डिटर्जन्टमध्ये बुडवून
ठेवल्यास कपडे धुण्याच्या वेळेत आणि श्रमात बचत होते. तसेच कपडे स्वच्छ धुतल्या
जातात. पारंपारिक पध्दतीने कपडे धुण्यासाठी
कपडे धुण्याची जागा सावलीत असेल तर वातावरणातील कमी उष्णतेमूळे कपडे
धुणाऱ्या व्यक्तीस थकवा कमी जाणवतो.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 36
/ 2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 02.08.2022
No comments:
Post a Comment