Friday, 5 August 2022

मराठवाडयात दिनांक 05 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट व दिनांक 12 ते 18 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 05 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 06 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 07 ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्हयात तसेच दिनांक 08 ऑगस्ट रोजी औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 09 ऑगस्ट रोजी औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी मूसळधार ते खूप मूसळधार पावसाची शक्यता आहे.


सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून तूरळक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर सोयाबीन,  खरीप ज्वारी, बाजरी,  ऊस,  हळद पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून तूरळक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर संत्रा/मोसंबी,  डाळींब,  चिकू  बागेत साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. बागेत फवारणीची कामे पुढे ढकलावीत. नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी,  डाळींब,  चिकू झाडांना काठीचा आधार द्यावा.

भाजीपाला

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून तूरळक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर भाजीपाला पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या भाजीपाला पिकांना काठीचा आधार द्यावा.

फुलशेती

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून तूरळक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर फुल पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या फुल पिकांना काठीचा आधार द्यावा.

तुती रेशीम उद्योग

यशस्वी कोष उत्पादन घेण्यासाठी तुती लागवडीनंतर दर दिड महिण्यात तुती छाटणी करावी. लागवडीच्या दूसऱ्या वर्षापासुन पुढे 15 ते 20 वर्षा पर्यंत मिळू शकते. पण तुतीच्या वाढीसाठी आवश्यक अन्नघटक नत्र, स्फुरद, पालाश या रासायनीक खताची मात्रा 140 कि.ग्रॅ. अमोनियम सल्फेट 170 कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट आणि 19 कि.ग्रॅ. म्यूरेट पोटॅश प्रति एकर प्रति कोषाचे पीक याप्रमाणे देणे. जुन व नोव्हेंबर महिण्यात 4 क्विंटल प्रमाणे एकूण 8 क्विंटल कुजलेले शेणखत टाकणे आवश्यक आहे. इतर जैविक खते व हिरवीचे खते टाकणे त्याचबरोबर जून व जानेवारी महिण्यात पट्टा पध्दत लागवडीत बरू किंवा ढेंचा हे द्विदल पीके पेरणी करून फुलोरा येण्याच्या वेळी (दिड महिण्या नंतर) जमीनीत गांडूळ टाकणे.

पशुधन व्यवस्थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.  

सामुदायिक विज्ञान

पारंपारिक पध्दतीने कपडे धुण्याचे काम हे जड कामांमध्ये अंतर्भूत असल्या कारणाने ते सकाळच्या वेळेत करावे. कारण सकाळच्या वेळेत काम कारणाऱ्या व्यक्तीची ऊर्जा उपलब्धी जास्त असल्याकारणाने व्यक्ती उत्साही असते आणि कामाचे श्रम कमी पडतात.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक37/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 05.08.2022 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 03 ऑक्टोबर रोजी बीड, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 04 ऑक्टोबर रोजी परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 03 व 04 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक 05 ते 07 ऑक्टोबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही व पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...