Friday 12 August 2022

मराठवाडयात दिनांक 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट व दिनांक 19 ते 25 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 12 व 13 ऑगस्ट रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या तर  दिनांक 15 व 16 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.


सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी सोयाबीन संशोधनालय इंदौर यांच्या शिफारसीनूसार थायामिथॉक्झाम 25% 40 ग्रॅम प्रति एकर पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारावे. सोयाबीन पिकावरील शेंगा करपाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी फुलोरा अवस्थेतील सोयाबीन पिकावर टेब्यूकोनॅझोल 10% डब्ल्यूपी + सल्फर 65% डब्ल्यूजी 15 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  खरीप ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. बाजरी पिकात वापसा आल्यानंतर आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. ऊस पिकावर पायरीला (पाकोळी) याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी किंवा मेटारायझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. रासायनिक व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% 200 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. हळद पिवळी पडत असल्यास पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर 2% यूरियाची फवारणी करावी. हळद पिकात पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर बायोमिक्सची आळवणी करावी. आळवणीसाठी 25 ते 50 लिटर पाण्यात 4 किलो (पावडर)/ 4 लिटर (लिक्वीड) बायोमिक्स याप्रमाणे द्रावण तयार करावे व ते ठिबक सिंचनाद्वारे पिकास सोडावे किंवा पंपाचा नोझल काढून 200 ग्रॅम (पावडर) / 200 मिली (लिक्वीड) प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रोपरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्‍य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्‍यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. डाळिंब बागेत तेलकट डागाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन (स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट 90% + टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड 10%) 0.5 ग्रॅम प्रति लिटर हे महिन्यातून एकदा आणि सात ते दहा दिवसाच्या अंतराने ब्रोनोपाल नंतर फवारावे. पाऊस झाल्यानंतर लगेचच स्ट्रेप्टोसायक्लीन + कॉपरजन्य बूरशीनाशकाची फवारणी करावी. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे फुलकळीची गळ होऊ नये म्हणून बागेत 19:19:19 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. चिकू बागेत वापसा आल्यानंतर आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

 

भाजीपाला

भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

यशस्वी कोष उत्पादन घेण्यासाठी तुती लागवडीनंतर दर दिड महिण्यात तुती छाटणी करावी. लागवडीच्या दूसऱ्या वर्षापासुन पुढे 15 ते 20 वर्षा पर्यंत मिळू शकते. पण तुतीच्या वाढीसाठी आवश्यक अन्नघटक नत्र, स्फुरद, पालाश या रासायनीक खताची मात्रा 140 कि.ग्रॅ. अमोनियम सल्फेट 170 कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट आणि 19 कि.ग्रॅ. म्यूरेट पोटॅश प्रति एकर प्रति कोषाचे पीक याप्रमाणे देणे. जुन व नोव्हेंबर महिण्यात 4 क्विंटल प्रमाणे एकूण 8 क्विंटल कुजलेले शेणखत टाकणे आवश्यक आहे. इतर जैविक खते व हिरवीचे खते टाकणे त्याचबरोबर जून व जानेवारी महिण्यात पट्टा पध्दत लागवडीत बरू किंवा ढेंचा हे द्विदल पीके पेरणी करून फुलोरा येण्याच्या वेळी (दिड महिण्या नंतर) जमीनीत गांडूळ टाकणे.

सामुदायिक विज्ञान

पारंपारिक पध्दतीने कपडे धुण्याचे काम हे जड कामांमध्ये अंतर्भूत असल्या कारणाने ते सकाळच्या वेळेत करावे. कारण सकाळच्या वेळेत काम कारणाऱ्या व्यक्तीची ऊर्जा उपलब्धी जास्त असल्याकारणाने व्यक्ती उत्साही असते आणि कामाचे श्रम कमी पडतात.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक39/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 12.08.2022

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...