Monday, 7 November 2022

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील दोन ते तिन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर तापमानात 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

 

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण किंचित कमी झालेले आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 09 ते 15 नोव्हेंबर, 2022 दरम्यान कमाल तापमान, किमान तापमान व पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

वेळेवर लागवड केलेल्या व वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही. कापूस पिकात लाल्या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 20 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे, पांढरी माशी) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा पायरीप्रॉक्झीफेन 5% +डायफेन्थुरॉन 25% (पूर्व मिश्रित किटकनाशक) 400 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली  किंवा थायोडीकार्ब 75% 400 ग्रॅम प्रति एकर आलटून पालटून फवारावे. कापूस पिकात दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा क्रेसोक्सिम-मिथाइल 44.3% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा  क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकात फुलगळ व्यवस्थापनासाठी एनएए 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रब्बी भुईमूग पिक पेरणी नंतर तिन ते सहा आठवडयांनी दोन कोळपण्या आणि एक खुरपणी करावी. रब्बी मका पिकाची पेरणी नोव्हेंबर पर्यंत करता येते पेरणी 60X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. रब्बी ज्वारी पिकात पेरणी नंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली कोळपणी करावी.  रब्बी सूर्यफूल पिकाची पेरणी करून 20 दिवस झाले असल्यास पहिली कोळपणी करावी.  बागायती गहू वेळेवर पेरणीचा कालावधी हा 01 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर आहे. वेळेवर पेरणीसाठी त्र्यंबक, गोदावरी, फुले समाधान इत्यादी वाणांपैकी निवड करावी. गव्हाची पेरणी करतांना 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे, याकरिता 192 किलो 10:26:26 + युरिया 67 किलो किंवा 109 किलो डायअमोनियम फॉस्फेट + युरिया 66 किलो किंवा 313 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 84 किलो म्युरेट ऑफ पोटॅश + 109 किलो युरिया प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी.

 

 

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. केळी बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.  आंबा बागेत फुलधारणा व्यवस्थित होण्यासाठी 13:00:45 विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्राक्ष बागेत फळधारणा व्यवस्थित होण्यासाठी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या सिताफळाची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी.

भाजीपाला

पुर्नलागवडीसाठी तयार असलेल्या (टोमॅटो, कांदा, कोबी इत्यादी) भाजीपाला पिकांची पुर्नलागवड करावी तसेच गाजर, मेथी, पालक इत्यादी पिकांची लागवड करावी. पुर्नलागवड केलेल्या भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. मिरची पिकावर सध्या फुलकिडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रिड 20 % एस.पी. 100 ग्रॅम किंवा सायअँन्ट्रानिलीप्रोल 10.26 ओ.डी. 600 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एस. जी. 200 ग्रॅम प्रति हेक्टर फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करुन घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी स्कीन रोग चालू आहे. त्यातच चार महिण्याखालील वासरांमध्ये जास्तीचा प्रादूर्भाव आढळत आहे, म्हणून वासरांचे आरोग्य अबाधीत राहून त्यांना लम्पी रोगाशी सामना करता यावा यासाठी त्यांना 1. सात दिवस व त्यापुढील वासरांना जंतनाशकाची प्रथम मात्रा त्वरीत द्यावी. 2. ज्या वासरांनी चरावयास सुरूवात केली आहे, माती चाटत आहेत अथवा आवमिश्रीत रक्ती हगवण आहे अशा सर्व वासरांना तात्काळ पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली कॉक्सीडीओसीस (रक्ती हगवण) रोधक औषधीची मात्रा देउन घ्यावी.

पुढील काळात थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल.

सामूदायीक विज्ञान

कार्यक्षेत्रातील योग्य प्रकारच्या प्रकाश योजनेमुळे डोळ्यावर येणार ताण कमी होतो.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक64/ 2022 - 2023      सोमवार, दिनांक – 07.11.2022

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 04 एप्रिल रोजी बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी जिल्हयात तर दिनांक 05 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 06 ते 08 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील चोवीस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 3 ते 4 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चोविस तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

    हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...