Thursday 12 January 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये दिनांक 13 व 14 जानेवारी रोजी किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होईल. दिनांक 16 व 17 जानेवारी दरम्यान बीड व लातूर जिल्हयात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से ने घट होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये दिनांक 13 व 14 जानेवारी रोजी किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होईल. दिनांक 16 व 17 जानेवारी दरम्यान बीड व लातूर जिल्हयात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से ने घट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 13 ते 19 जानेवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी तर दिनांक 20 ते 26 जानेवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीती ओलाव्याचे प्रमाण किंचित कमी झालेले आहे. 

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे पिकाच्या वाढीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी रब्बी पिकास, फळबागेस, भाजीपाला पिकास, फुलपि कास, रोपवाटीकेस रात्री हलके पाणी द्यावे जेणेकरून जमीन उबदार राहण्यास मदत होईल.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

किमान तापमानात झालेल्या घटीचा परिणाम हरभरा पिकास होऊ नये म्हणून पिकास रात्री हलके पाणी द्यावे. मागील आठवडयातील ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची 200 ग्रॅम 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. किमान तापमानात झालेल्या घटीचा परिणाम करडई पिकास होऊ नये म्हणून पिकास रात्री हलके पाणी द्यावे. मागील आठवडयातील ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  गहू पिकास हलके पाणी द्यावे. मागील आठवडयातील ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे गहू पिकावरील तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे केळी बागेत घड निसवले असल्यास केळीचे गुच्छ सच्छिद्र पॉलिथीन पिशव्याने झाकून घ्यावेत (घडांना सर्क्टींग करावी). केळी बागेत रात्री सिंचन करावे. खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. केळी बागेत करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किमान तापमानात झालेल्या घटीमूळे द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे, जेणेकरून बागेत मणी तडकण्याची समस्या उद्भवणार नाही.  द्राक्ष बागेत घडावर पिंक बेरीची समस्या होऊ नये म्हणून द्राक्ष घड वर्तमान पत्राच्या साहाय्याने झाकून घ्यावेत. खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. किमान तापमानात झालेल्या घटीमूळे द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे.

भाजीपाला

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे भाजीपाला पिकास रात्री सिंचन करावे. भाजीपाला पिकात 2 टक्के 13:00:45 ची फवारणी करावी. रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून कार्बेंडाझीम 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी. मकर संक्रांतीमूळे बाजारपेठेत काही भाज्यांना अधिक मागणी असते काढणीस तयार असलेल्या भाज्यांची काढणी करून बाजारपेठेत पाठवावीत.

फुलशेती

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे फुल पिकास रात्री सिंचन करावे. मकर संक्रांतीमूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजारपेठेत पाठवावीत.

 

पशुधन व्यवस्थापन

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे (तापमान 6 ते 8 अं.से. पर्यंत खाली आल्यामूळे) मुख्यता करडे, कोंबडीची पिल्ले व एकुणच लहान जनावरांच्या प्रकृतीवर त्याचा प्रतिकुल परिणाम होतो. गारठणे (चिलींग) किंवा कधी कधी बर्फाचे चावणे (फ्रॉस्ट बाईट) ई. समस्या उदभवतात. गारठण्यामूळे पुढे घातक न्यूमोनिया (फुफ्फुसाचा दाह) तर बर्फाच्या चावण्यामुळे पुढे गँग्रीन सारख्या समस्या उदभवू शकतात (मुख्यता बर्फाळ प्रदेशामध्ये). मुख्यता कोंबड्यांमध्ये थंडीमूळे कोरायझा हा आजार उदभवतो, तर करडांमध्ये देखील मरतुक वाढण्याची भिती वाढते. आपल्या जनावरांना अधिक उब कशी मिळेल ते पहा जसेकी पोत्यांचे पडदे लावून गोठ्यामध्ये उब निर्माण करणे मोठा बल्ब लावणे, गोठ्यामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घेणे, दिवसा पडदे  काढून उन्हामूळे मिळणारी उष्णता निर्माण करणे, पाण्यामधून रोग प्रतिकार शक्ती वाढवणारी औषधी जसे की ई-केअर सी, ईम्यूनोलाईट पशुवैद्यकाच्या सल्ल्याने देण, शक्यतो उष्ण पाणी (बोरचे ताजे पाणी) देणे.

सामुदायिक विज्ञान

लोहसमृध्द तिळाची वडी 100 ग्रॅम तिळाच्या वडीमध्ये प्रथिने 20.34 ग्रॅम, स्निग्धे 42.93 ग्रॅम, उर्जा 593 कि.कॅ. आणि लोह 14.7मि. ग्रॅम मिळते. 65 ते 100 ग्रॅम तिळा वडया प्रति दिन सलग 90 दिवस सेवन केल्यास रक्तातील  हिमोग्लोबीन आणि प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक83/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 13.01.2023

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...