Tuesday 14 February 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 24 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही त्यानंतर तीन दिवस किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 3 ते 4 दिवसात कमल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 24 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही त्यानंतर तीन दिवस किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 3 ते 4 दिवसात कमल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे

मराठवाडयात दिनांक 17 ते 23 फेब्रूवारी 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या मका पिकाची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे रब्बी ज्वारी पिकात कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात. उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या  रब्बी ज्वारी पिकाची काढणी करून घ्यावी. वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी सूर्यफुल पिकाची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे गहू पिकास दाण्यात दुधाळ पीक अवस्था (पेरणी नंतर 80 ते 85 दिवस) व दाणे भरताना (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. गहू पिकावरील तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे केळी बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. मृग बाग जून लागवड केळी बागेत बोधांना माती लावावी व केळी बागेस आधार द्यावा. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे  आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. सध्या आंबा बागेत वटाणा व सुपारीच्या आकाराच्या आंबा फळांची गळ दिसून येत आहे. याच्या व्यवस्थापनासाठी बागेत एनएए 15 पीपीएम ची फवारणी करावी.कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या गुलाब फुलांची काढणी कडून बाजार पेठेत पाठवावी.   कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे मुख्यता करडे, कोंबडीची पिल्ले व एकुणच लहान जनावरांच्या प्रकृतीवर त्याचा प्रतिकुल परिणाम होतो. थंडीमुळे पुढे न्यूमोनिया (फुफ्फुसाचा दाह) सारख्या समस्या उदभवू शकतात. मुख्यता कोंबड्यांमध्ये थंडीमूळे कोरायझा हा आजार उदभवतो, तर करडांमध्ये देखील मरतुक वाढण्याची भिती वाढते. पहाटे आपल्या जनावरांना अधिक उब कशी मिळेल ते पहा जसेकी पोत्यांचे पडदे लावून गोठ्यामध्ये उब निर्माण करणे मोठा बल्ब लावणे, गोठ्यामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घेणे, दिवसा पडदे  काढून उन्हामूळे मिळणारी उष्णता निर्माण करणे, पाण्यामधून रोग प्रतिकार शक्ती वाढवणारी औषधी जसे की ई-केअर सी, ईम्यूनोलाईट पशुवैद्यकाच्या सल्ल्याने देण, शक्यतो उष्ण पाणी (बोरचे ताजे पाणी) देणे.

सामुदायिक विज्ञान

बालविकासाला चालना देण्यासाठी निसर्गात उपलब्ध असलेल्या गोष्टी जसे की वाळू, शंख, शिंपले, बिया, पाने, फुले, माती, काडया, खडे, गारगोट्या इ. सोबत बालक खेळत असतांना त्यांच्या विविध रचना करणे, वर्गीकरण करणे, लहान-मोठेपणा, हलके व जडपणा त्यांचे रंग, आकार याविषयी माहिती द्यावी.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक92/ 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 14.02.2023

No comments:

Post a Comment

दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात व दिनांक 15 मे रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दिनांक 14 मे रोजी लातूर, धाराशिव, जालना व परभणी जिल्हयात तर दिनांक 15 मे बीड, धाराशिव व जालना जिल्हयात तर दिनांक 16 मे रोजी धाराशिव, लातूर, बीड जिल्हयात व दिनांक 17 मे रोजी धाराशिव, लातूर व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर ज...